spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य १२ जुलै २०२२

मेष : मनोव्यथेचा भार काहीसा हलका होईल. तापाचा विकार उद्भवण्याची शक्यता आहे. धर्माचरणाने अनेक संकटांवर मात करण्याची ऊर्जा प्राप्त होईल. आपल्या हातून सत्कर्म घडेल. योग्य ठिकाणी दानधर्म करण्याची मानसिकता तयार होईल. जल तत्वांशी संबंधित उद्योग व्यवसायात फायदा होईल.
वृषभ : विवाह इच्छूकांसाठी आनंददायी काळ आहे. नववराला साजेशी वधू तर नववधूला साजेसा वर प्राप्त होऊ शकेल. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. आरोग्यविषयक तक्रारी चालूच रहातील. मनाला वेदनादायक घटना ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन : मामा- मावशी किंवा आजोळचे नातेवाईक सहकार्य करतील. शरीर पीडा मानसिक चलबिचल वाढवणारी ठरेल. कोणाशीही अकारण शत्रुत्व वाढवून घेऊ नका. आठवड्याच्या उत्तरार्धात सुखद घटना घडतील.  काही कारणाने स्थानांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बदलीचे योग संभवतात.
कर्क : विद्यार्थ्यांसाठी अत्यन्त सकारात्मक वातावरण तयार होईल. नवीन पद्धतीचा अभ्यासक्रम सुलभतेने हाताळाल . संतती विषयक समस्या दूर होतील. लेखक – पत्रकार मंडळींकडून समाजाला पोषक लेखन घडून येईल. संतती विषयक संख्येचा जरूर विचार करावा. काही प्रमाणात पोटाच्या विकाराने मनाला उद्विग्नता येऊ शकते.
सिंह : मातृ देवो भव: या वैदिक सूत्राचा प्रत्यक्ष उपयोग जीवनात कराल. आई हे महान दैवत आहे हा आदर्श समाजापुढे जाईल असे कार्य आपल्या हातून घडेल. चतुष्पाद प्राण्यांच्या देखभाली विषयी जागरूक रहावे. वाहन खरेदी करताना भविष्यातील साद पडसादाचे अवलोकन करूनच पाऊल उचलावे.
कन्या : आपण वर्षानुवर्षे घेतलेल्या अथक परिश्रमाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग होईल. स्वकर्तुत्वाने मोठे होण्याबद्दलचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. साहसी खेळ -योगशास्त्र याविषयातील स्वारस्य वाढेल. नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी करीत असलेले प्रयत्न यश मिळवून देतील.
तुळ : पारिवारिक सौख्य उत्तम लाभेल. कोणाच्याही आर्थिक व्यवहाराची हमी घेऊ नका. लहान भावंडांकडून काही आदर्श शिकायला मिळतील. तुमची कीर्ती वाढेल. आर्थिक व्यवहारात नियोजन करावे लागेल. संगती संग दोष: हे वचन सिद्ध आहे. आपण कुणाच्या संगतीत वावरत आहोत त्याचे शुभाशुभ परिणाम नक्की मिळणार.
वृश्चिक : उच्च विचारांची वाढ होईल. मात्र बदलत्या विचार सरणीचा इतर लोक गैर फायदा घेऊ शकतात. आपले मत आणि निर्णयावर ठाम रहा. आप्तेष्टांचे सहकार्य लाभेल. नेत्र विकारापासून त्रास वाढू शकतो. कामानिमित्त ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचे नियोजन ठरू शकते.
धनु : या आठवड्यात आर्थिक व्यवहाराबाबत व्यवस्थापन आवश्यक आहे. उधार देऊ नका आणि घेऊही नका. कोणत्याही व्यवहारात गुप्तता राखणे हिताचे ठरेल. येऊ घातलेल्या संकटांवर मार्ग निघेल. आपल्या कला कौशल्याने त्यावर सहज मत कराल. शेतकऱ्यांसाठी अत्यन्त दिलासादायक काळ आहे.
मकर : नव्या उमेदीने कामाला लागाल. आपल्याला ऊर्जा पुरविणारी व्यक्ती भाग्योदयाच्या वाटेतील मैलाचा दगड बनेल.  योग्य संधीचा फायदा घेण्याची तसदी घ्या. खर्चाचे प्रमाण वाढेल. अकारण होणाऱ्या दोषारोपामुळे मानसिक संतुलन ढळण्याची शक्यता आहे. व्यसनाधीनतेकडे वळत तर नाही ना याबाबत सतर्क रहा.
कुंभ : अधिकार प्राप्तीचे योग आहेत. पदोन्नती – पगारवाढ यासारख्या समाधानकारक गोष्टी घडायला सुरुवात होईल .परदेशातील व्यवहार सुरळीत होतील . कामकाजासाठी प्रवास करावा लागेल. स्वधर्मावर निष्ठा वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक येणाऱ्या जबाबदाऱ्या सहज पेलवू शकाल.
मीन : भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अचूक क्रम मांडू शकाल. नवंनवीन संकल्पना सुचतील. परिवर्तन दिसून येऊ लागेल. काही मंडळी दबाव तयार करण्याचा प्रयत्न करतील मात्र सर्व कुविचारांवरआपल्या सद्विचारांनी मात करू शकाल. समाजामध्ये आपल्याबद्दल आदरभाव निर्माण होईल.
–  रविंद्र भगवान पाठक गुरुजी ठाणे ८१०८२६६६७२

Latest Posts

Don't Miss