राशी भविष्य १२ ऑक्टोंबर २०२२, तुमच्या जवळ आज पैसा आणि मनःशांती एकत्र नांदतील

राशी भविष्य १२ ऑक्टोंबर २०२२, तुमच्या जवळ आज पैसा आणि मनःशांती एकत्र नांदतील

मेष : तुमच्या सभोवतीचे तुमच्याकडून लोक खूप कामाचा अपेक्षा करतील. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती विचलित होईल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जावं लागेल. प्रतिष्ठीत व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस आहे.

वृषभ : आज तुम्हाला उत्तम प्रकारे अर्थार्जनाची संधी प्राप्त होईल. मात्र वस्तू गहाळ होण्याची देखील शक्यता आहे त्याबाबत काळजी घ्यावी. भागीदार तुम्हाला मदत करतील. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे – म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते.

मिथुन : आजचा दिवस प्रसन्नतेचा असल्याने कोणतीही कामे झटपट करू शकाल. तुमच्या जवळ आज पैसा आणि मनःशांती एकत्र नांदतील. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास प्रोत्साहन देतील. आपणांस जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.

कर्क : सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आजच्या दिवशी धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून देवाण-घेवाण करताना सतर्क असावे. ताणतणाव, दडपणावर मात करता येईल. आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तुमच्या कामाला आज दाद मिळेल.

सिंह : आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने नुकसानाला फायद्यात बदलू शकाल.

कन्या : तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतील. वाचनाची गोडी वाढेल. आपण पूर्वी जी गुंतवणूक केली होती आज त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत आज भरपूर वेळ घालवता येईल.आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे.

तुला : तुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. प्रवासात धनाची चोरी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पुऱ्या करण्याची काळजी घेईल. अन्य व्यक्तीमुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालावा.

वृश्चिक : जवळच्या नातेवाइकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकाल. आपल्या मनावर खूपच दडपण असेल तर आपल्या नातेवाईकांशी अथवा जवळच्या मित्रांशी बोला, त्यामुळे आपल्यावरील ताण काहीसा हलका होईल. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील.

धनु : करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत असे वाटेल. तुम्ही वेळेचा सदुपयोग कराल. बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकता ही बाब ध्यानात घेऊन व्यवहार करावेत.

मकर : उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. घरातील लहान-लहान गोष्टींवर खर्च होऊ शकेल. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे.

कुंभ : आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजनाचा लाभ होईल. कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी काळजी घ्या.

मीन : आळस झटकून कामाला लागा. आजच्या दिवशी आपल्या कुंटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे ही तुमची प्राथमिकता असेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना महत्त्वाची सूचना मिळून जाईल. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. दैवी प्रसादाची अनुभूती येईल.

Exit mobile version