राशी भविष्य १२ सप्टेंबर २०२२, तूल राशीच्या लोकांना लॉटरीसारख्या क्षेत्रातून आर्थिक उत्पन्न वाढेल

राशी भविष्य १२ सप्टेंबर २०२२, तूल राशीच्या लोकांना लॉटरीसारख्या क्षेत्रातून आर्थिक उत्पन्न वाढेल

मेष : तुमच्या मतप्रवाहाच्या विरोधी लोकांचा त्रास सहन करावा लागेल. कामाची सुसूत्रता किंवा व्यावहारिक गणित न पाळल्यामुळे तुमची फजिती होऊ शकते. तुमच्या प्रकृतीला उपचार लागू पडतील असा उपाय मिळेल. विरोधी मानसिकतेच्या लोकांचा सहवास टाळल्यास अति उत्तम. दूरचे प्रवास टाळावेत. भागीदारीत अति विश्वास ठेवणे घातक ठरेल.

वृषभ : तुमचे ध्येय ध्यान आणि दातृत्व यांची साखळी उत्तम प्रकारे जोडून राहील. समाजमनावर तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. इतरांचा सन्मान करण्याची तुमची वृत्ती भावी पिढीला आदर्श घालून देईल. आई वडिलांची सेवा किंवा त्यांच्याप्रती असलेली आदर भावना तुमच्या जीवनाला आशीर्वाद प्रदान करेल. तुमच्या संततीकडून तुम्हाला स्नेह प्रेमाची वागणूक मिळेल.

मिथुन : आपण आपल्या व्यवसायावर करीत असलेल्या प्रेमामुळे अनेक पद्धतीने त्याला नवे रूप देऊ शकता. तुम्ही स्वीकारलेल्या जीवन पद्धतीतून अनेकांना दिशा प्राप्त होतील. घर खरेदी किंवा वाहन खरेदी यासारख्या विषयावर सकारात्मक चर्चा होईल. कुटुंबातील लोकांचे तुम्हाला अनमोल सहकार्य लाभेल. तुमच्या उत्पादनाला मोठी मागणी वाढू शकेल.

कर्क : तुमची धार्मिक भावना जागृत होईल. धर्मावरील श्रद्धा अधिक वृद्धिंगत होईल. समाजसेवा अथवा सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थेचे कार्य करणे अथवा विश्वस्त पदावर नियुक्ती होणे अशाप्रकारच्या घटना आज घडू शकतात. नोकरदारांना अपेक्षेप्रमाणे बदली होण्याची स्थिती निर्माण होईल. देशविदेशातील व्यवहार सुरळीत मदतगार स्थिती आहे.

सिंह : विचलित मानसिकतेमुळे तुम्हाला व्यक्त होण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. आपले म्हणणे मांडण्यातील अडचणी तुमच्या नोकरी संबंधातील नियुक्तीत अडचणी वाढवू शकतात. आर्थिक व्यवहारात व्यावहारिक गणित जुळणार नाहीत. त्यामुळे आर्थिक संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कन्या : आज तुमच्या मित्रपरिवाराच्या सहयोगाने काही निश्चित ध्येय धोरणे आखण्यास मदत होईल. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस कल्पना विलासात रमण्याचा आहे. भागीदारीतून फायदा होईल. तुमच्या परिवारातील वातावरण आनंददायी तसेच स्नेहवर्धक राहील. नवीन लोकांच परिचय वाढून तुमच्या प्रत्यक्ष जीवनास उपयुक्त धोरनात्मक निर्णय देखील घेतले जाऊ शकतात.

तूला : आप्तेष्ट लोंकाच्या भेटीगाठी होतील. उत्तम संवाद आणि अप्रतिम सादरीकरण केल्याने तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा समाजमनावर उमटू शकेल. बाजारात केलेली गुंतवणूक तुमच्या पथ्यावर पडेल. लॉटरीसारख्या क्षेत्रातून आर्थिक उत्पन्न वाढेल. आजोळच्या लोकांच्या सहकार्याने अनेक अडचणीवर मात करून यशाच्या दिशेनं वाटचाल सुरु कराल.

वृश्चिक : नवीन शिक्षणास सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आपण जर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असाल तर गुरुशिष्य स्नेहात वाढ होईल. आपण शिकवत असलेल्या विषयात विद्यार्थ्यांना रुची निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. जवळचे प्रवास करावे लागतील. भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज बांधण्यात यशस्वी व्हाल.

धनु : कुटुंबातील लोकांसाठी वेळ द्याल. घरच्या मंडळींच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी असलेली तुमची तळमळ तुमच्या परिवारास उन्नतीकडे नेण्यास मदतगार ठरेल. तुम्ही स्वीकारलेल्या उद्योग व्यवसायास अनुकूल स्थिती आहे. संधीचा फायदा घेणे हे उत्तम व्यावसायिकाचे लक्षण मानले जाते, त्यामुळे व्यवहार चातुर्य बाळगून ग्राहकाशी संवाद साधनं हिताचे ठरेल.

मकर : आज आपण आपल्या जीवनाला उंच शिखराकडे झेपावण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी ठरेल. देशविदेशातील हितसंबंध अधिक बळकट होण्यासाठी आज तुम्ही वापरलेले हातकंडे अत्यन्त उपयुक्त ठरतील. समोरच्या व्यक्तीचा विश्वास सहजपणे संपादन कराल. भविष्यातील घडणाऱ्या घटनांचा अचूक वेध घेण्यात यशस्वी व्हाल.

कुंभ : आज तुम्हाला आपल्या परिवारासाठी वेळ द्यावा लागेल. जर छोट्यामोठ्या कारणाने कौटुंबिक मतभेद निर्माण झाले असतील त्यावर तोडगा शोधून काढण्यास तुम्हाला यश मिळेल. आपल्या आचरणातून परंपरांचा अभिमान वाढेल अशी कृत्ये घडतील. घरात जर वयोवृद्ध आणि आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी तात्काळ वैद्यकीय उपचाराची गरज भासू शकते.

मीन : तुमचे सात्विक विचार आणि उन्नत समाजाकडे बघण्याची आत्मीयता अधिक वृद्धिंगत होईल. संत – साधू – महात्मा यांच्याविषयी आत्मीयतेने समाज प्रबोधन करण्याचा प्रयास केला जाऊ शकतो. देवावरील विश्वास श्रद्धा अधिक वृद्धिंगत होईल. आपण आद्र्रपूर्वकी आपल्या पूर्वजांसाठी केलेलं अन्नदान अथवा तत्सम कोणतेही कर्म मानसिक आनंदसोबतच पितरांना मुक्तीचा मार्ग प्रशस्त करेल.

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Time Maharashtra |Marathi news

Exit mobile version