spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य १३ ऑक्टोंबर २०२२, पवित्र आणि ख-या प्रेमाचा सुखद अनुभव येईल

मेष :  मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुमच्यात चिडचिड पणा वाढेल. तुमच्या ज्ञानच्या लालसेपोटी नवीन मित्र जोडाल. प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळेल. आत्मविश्वास निर्माण होईल. फायदा तोट्याचा विचार न करता व्यवहारात उडी घेणे नुकसानीचे ठरू शकेल. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी, दूरचे प्रवास टाळावेत.

वृषभ : कामाचे सुटसुटीत वेळापत्रक तयार करून घेतल्यास फायदा होईल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कार्यालयामध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे . त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो.

मिथुन : शारीरिक व्यायाम करा. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत होईल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता निर्माण होऊ शकेल. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि कामात उत्साह शेवटपर्यंत दाखवला तर तुम्ही फायद्यात राहाल. तुम्ही रिकाम्या वेळचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी घर्चा करा.

कर्क : आज तुम्हाला स्वत:साठी पुरेसा वेळ देता येईल, तुमचा आर्थिक स्थितीत उत्तम राहील. तुमचे व्यक्तिमत्व विकसित होऊन त्यातून मिळालेली सामाजिक प्रतिष्ठा सामाजिक यामुळे नवे मित्र जोडाल. पवित्र आणि ख-या प्रेमाचा सुखद अनुभव येईल. सावधतेने वाहन चालवले पाहिजे अन्यथा दुर्घटना होऊ शकते.

सिंह : आज मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस असेल. परदेशातील तुमचे व्यवहार काळजीपूर्वक हाताळण्यात यश मिळेल. तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते . =आज तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. नावीन्याने परिपूर्ण अशा विकासात्मक कामाच्या दिशेने वाटचाल सुरु होईल.

कन्या : दैनंदिन व्यस्ततेतून स्वतःसाठी थोडा वेळ काढाल. मित्रमंडळींसमवेत आनंद साजरा कराल. आपण जर परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर अर्ज करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आळसामुळे होणारा वेळेचा अपव्यय टाळा. आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करून वेळेत उपचार घ्यावेत.

तुला : आज तुमच्या वैचारिक हुशारीने गुंतवणूक करा.गरजेच्या वेळी आवश्यकतेनुसार आप्तस्वकीय सहकार्य करतील. कायदेशीर बाबतीत कोणताही ठोस पुराव्या अभावी केलेलं वक्तव्य अडचणीत आणू शकेल. काळाची गरज ओळखून आपले आचरणात तात्पुरता बदल करावा लागेल. संयमी विचारधारा तुमच्या लौकिकास प्रतिष्ठा मिळवून देईल.

वृश्चिक : तुमच्या मनातील विचार प्रकट केल्याने सहजपणे त्यास अनुमोदन मिळू शकेल. सुप्त गुणांना संधी प्राप्त होईल. आपणांस पोटदुखीसारखे विकार असल्यास आज त्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यता आहे. दोन समूहांचा महत्वाचा दुवा म्हणून भूमिका बजावल्यास त्यातून मोठा अनर्थ टाळण्यास मदत होईल.

धनु : ज्यावेळी काहीच सुचत नसते अथवा विषय लक्षात येत नाही अशावेळी त्या त्या विषयातील अनुभवी तज्ज्ञ लोकांशी विचारविनिमय करणे केव्हाही हितकारक ठरते. यासाठी आपण भय अथवा संशय न ठेवता अशा लोकांशी समन्वय साधने तुमच्या भविष्यासाठी हिताचे ठरेल. आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे करू शकाल.

मकर : भाग्योदयासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुमच्या मेहनतीला योग्य न्याय मिळून समाजात लौकिक देखील वाढेल. स्पर्धा परीक्षेसाठी करीत असलेल्या तयारीत आजचा दिवस महत्वाचा टप्पा ठरू शकतो. न्यायालयीन लढाई अंतिम टप्प्यात येईल. तुमची सकारात्मक विचारसरणी तुम्हाला चांगल्या लोकांच्या सानिध्यात नेवून ठेवीन.

कुंभ : आज कमी मेहनतीत अधिक कामाचा उरक होईल. मनःशांतीसाठी केलेल्या साधनेचा फायदा होईल. जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांचे म्हणणे जाणून घ्या. व्यसनाधितेपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

मीन : कल्पनाविलास कामाचा नसतो याची जाणीव ठेवा. स्वप्नांचा पाठलाग करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. कोर्टाची पायरी चढताना काळजीपूर्वक सर्व बाबींचा विचार करा. तुम्हाला सुचलेले विचार अथवा सुविचार प्रत्यक्ष जीवनासाठी उपयुक्त ठरू शकतील. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करा.

Latest Posts

Don't Miss