मेष : आपल्या वैचारिक पातळीत सुधारणा होईल. मात्र बदलत्या विचार सरणीचा इतर लोक गैर फायदा घेऊ शकतात. आपले मत आणि निर्णयावर ठाम रहा . कामानिमित्त ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचे नियोजन ठरू शकते. आपल्या वाणीतून अमोघ शब्दांचा वर्षाव करू शकाल. केवळ ऐकिवातील गोष्टीवर विश्वास ठेवू नका . शरीर पीडा वाढू शकते काळजी घ्यावी
वृषभ : पारिवारिक सौख्य उत्तम लाभेल. कोणाच्याही आर्थिक व्यवहाराची हमी घेऊ नका .लहान भावंडांकडून काही आदर्श शिकायला मिळतील.तुमची कीर्ती वाढेल. आर्थिक व्यवहारात नियोजन करावे लागेल. आपण कुणाच्या संगतीत वावरत आहोत त्याचे शुभाशुभ परिणाम नक्की मिळणार, त्यामुळे कोणतेही पाऊल टाकताना काळजीपूर्वक टाका .न्यायालयीन प्रक्रियेत यश संपादन कराल.
मिथुन : स्वकर्तुत्वाने मोठे होण्याचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. शेतकऱ्यांनी शेत मशागतीच्या कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे. जमिनीपासून फायदा होईल. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या विचारांना साथ देणाऱ्या लोकांच्या भेटीगाठी होतील . आपण निवडलेल्या व्यवसायिक क्षेत्रात करताना सुखद अनुभव येईल.
कर्क : आई हे महान दैवत आहे हा आदर्श समाजापुढे जाईल असे कार्य आपल्या हातून घडेल . चतुष्पाद प्राण्यांच्या देखभाली विषयी जागरूक रहावे. वाहन खरेदी करताना भविष्यातील साद पडसादाचे अवलोकन करूनच पाऊल उचलावे. विविधांगी वाचनाची आवड वाढेल. तीर्थयात्रा आदींचे प्रसंगवर्णन उत्तमप्रकारे करू शकाल. कीर्तन प्रवचनादी प्रबोधनात्मक अनमोल मार्गदर्शन करू शकाल.
सिंह : विद्यार्थ्यांसाठी अत्यन्त अनुकूल वातावरण तयार होईल. लेखक -पत्रकार मंडळींकडून समाजाला पोषक लेखन घडून येईल. पोटाच्या विकाराने मनाला उद्विग्नता येऊ शकते. जलमार्गाने केलेल्या प्रवासातून लाभ होईल. घरातील आनंदी वातावरण बनेल. तुमच्याकडून धर्म संस्कृती बद्दल अभिमानास्पद कार्ये घडतील.
कन्या : आजोळचे नातेवाईक सहकार्य करतील . शरीर पीडा मानसिक चलबिचल वाढवणारी ठरेल. अकारण कोणाशीही अकारण शत्रुत्व वाढवून घेऊ नका. काही कारणाने स्थानांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय क्षेत्रात अधिक जबाबदाऱ्या वाढतील. संतुलित आणि सकस आहार घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मित्रपरिवाराच्या भेटीगाठी होतील.
तुला : कामानिमित्त प्रवासाचे बेत ठरतील .आरोग्यविषयक तक्रारी चालूच रहातील. मनाला वेदनादायक घटना ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. दूरच प्रवास टाळावा. पारंपरिक व्यवसायातून आर्थिक लाभ होतील. विरोधकांच्या कारवाया विचलित करू शकतात. आर्थिक मदत मिळू शकेल.पाठ-कंबर दुखीचे विकार वाढणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी .
वृश्चिक : आपणास निर्माण झालेली मानसिक दुर्बलता आज काही प्रमाणात हलकी होईल. तापाचा विकार उद्भवण्याची शक्यता आहे. आपल्या हातून सत्कर्म घडेल. योग्य ठिकाणी दानधर्म करण्याची मानसिकता तयार होईल. मत्स्य व्यवसाय किंवा तत्सबंधी उद्योग व्यवसायात फायदा होईल. राजाश्रय मिळेल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावी.
धनु : आपण केलेल्या विचारांना सामाजिक अधिष्ठान प्राप्त होईल. सामाजिक सुधारणे विषयी नवंनवीन संकल्पना सुचतील. काही मंडळी दबाव तयार करण्याचा प्रयत्न करतील मात्र सर्व कुविचारांवरआपल्या सद्विचारांनी मात करू शकाल. समाजामध्ये आपल्याबद्दल आदरभाव निर्माण होईल. पीडितांना न्याय मिळवून द्याल. राजदरबारात सन्मानित केले जाईल.
मकर : आज तुम्हाला सन्मानाने वागणूक मिळेल. पदोन्नती – पगारवाढ यासारख्या समाधानकारक गोष्टी घडायला सुरुवात होईल. परदेशातील व्यवहार सुरळीत होतील. कामकाजासाठी प्रवास करावा लागेल. स्वधर्मावर निष्ठा वाढेल. अधिकचा कार्यभार आपणांस व्यस्त करील. नवा कीर्तिमान स्थापित करू शकाल. भविष्यातील इष्ट परिणामासाठी कठीण निर्णय घ्यावे लागतील , मन कठोर करावे लागेल.
कुंभ : नवा उत्साह नव्या उमेदीने कामाला लागाल. अनुभवासारखा अन्य कोणताही महान गुरु नाही. योग्य संधीचा फायदा घेण्याची मानसिकता बनवावी लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. अकारण होणाऱ्या दोषारोपामुळे मानसिक संतुलन ढळण्याची शक्यता आहे. व्यसनाधीनतेपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा. चतुष्पाद प्राण्यांच्या खरेदी विक्रीत फायदा होईल.
मीन : आज आपणांस आर्थिक व्यवहाराबाबत व्यवस्थापन आवश्यक आहे. उधार देणें घेणे टाळावे. कोणत्याही व्यवहारात गुप्तता राखणे हिताचे ठरेल. प्रसंगाचा सामना करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. अचानक उदभवणाऱ्या संकटांवर आपल्या कला कौशल्याने सहज मत कराल. शेतकऱ्यांसाठी अत्यन्त दिलासादायक काळ आहे. शेती विषयक कोणतेही काम करताना उत्साह वाढेल.