spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य १४ सप्टेंबर २०२२, मिथुन राशीच्या लोकांनी पारंपरिक उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करा

मेष : समाजातील बदलत्या विचार सरणीचा विचार करून कोणतीही जबाबदारी घ्यावी. आपण करीत असलेल्या कामात परताव्याची जास्त अपेक्षा ठेवणे तुमच्यासाठी मनस्ताप वाढविणारे ठरेल. इतर लोक तुमचा गैर फायदा घेऊ शकतात. कामानिमित्त ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचे नियोजन ठरू शकते. शब्द सामर्थ्य वाढेल.

वृषभ : आपण संरक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकाल. कोणत्याही व्यवहारात गुप्तता राखणे हिताचे ठरेल. व्यावसायिक क्षेत्रात येऊ घातलेल्या संकटांवर मार्ग निघेल. आपल्या कुलदैवताचे कृपाछत्र आपणांस प्राप्त होईल. अनेक दिव्य अशा दैवी चमत्काराने जीवन नौका सुलभ आणि सरलतेने हाकण्याची ऊर्जा प्राप्त होईल.

मिथुन : पारंपरिक उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करा. मनातील विचारांना मूर्त रूप देण्यासाठी कार्यरत रहा. योग्य संधीचा फायदा घेण्याची तसदी घ्या. ग्राहक आणि मृत्यू केव्हाही तुमची परवानगी घेऊन येत नाही याची जाणीव असावी. व्यसनाधीनतेकडे पाऊल पडण्याची शक्यता आहे. प्राण्यांच्या खरेदी विक्रीत फायदा होईल. चोरीपासून सावधान असावे.

कर्क : स्वतंत्र कारभार सोपवला जाण्याची शक्यता आहे, तुमच्या कलागुणांना संधी प्राप्त होतील. देश विदेशातील व्यवहार फायद्याचे ठरतील. आज अधिकचा प्रवास करावा लागेल. स्वधर्मावर निष्ठा वाढेल. पूर्व सुकृताचे अर्थात संचित फळाची प्राप्ती होईल. निनावी संपत्तीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. अचानक येणाऱ्या जबाबदाऱ्या सहज पेलवू शकाल.

सिंह : भविष्यामध्ये घडणाऱ्या शुभाशुभ घटनांचा अंदाज बांधता येईल. समाजामध्ये आपल्याबद्दल आदरभाव निर्माण होईल. आपण आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून सामाजिक घडी सुस्थितीत आणण्यासाठी केलेले प्रयत्न प्रभावी ठरतील. आपल्या हातून अन्नदानासारखे सत्कर्म घडेल. दैवी शक्तीची दिव्य अनुभूती प्राप्त होईल.

कन्या : आपण ठरवलेल्या व्यवहाराच्या पूर्तीसाठी कर्जाऊ रक्कम घेण्याची आवश्यकता भासू शकते. हीं दिन गोरगरिबांसाठी दानधर्म करण्याची मानसिकता तयार होईल. जल तत्वांशी संबंधित उद्योग व्यवसायात फायदा होईल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावी. आपल्या वाक्प्रहाराने घडत आलेले काम बिघडणार नाही याबाबत काळजी घ्यावी.

तुला : भागीदारीतून व्यवसायाला प्रगतीपथाकडे घेऊन जाण्यात यशस्वी व्हाल. विवाह इच्छूकांसाठी आनंददायी दिवस आहे. नववराला साजेशी वधू तर नववधूला साजेसा वर प्राप्त होऊ शकेल. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. शक्यतो वाहन चालवणे टाळा . धार्मिक सण व्रतामध्ये सहभागी व्हाल. पारंपरिक व्यवसायातून आर्थिक लाभ होतील.

वृश्चिक : राजकीय क्षेत्रात अधिक जबाबदाऱ्या वाढतील. संतुलित आणि सकस आहार घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मित्रपरिवाराच्या भेटीगाठी होतील. मामा- मावशी किंवा आजोळचे नातेवाईक सहकार्य करतील. शरीर पीडा मानसिक चलबिचल वाढवणारी ठरेल. कोणाशीही अकारण शत्रुत्व वाढवून घेऊ नका.

धनु : लेखक -पत्रकार मंडळींकडून उत्तम दर्जाचे स्तंभलेखन घडून येईल. विद्यार्थ्यांसाठी अत्यन्त सकारात्मक वातावरण तयार होईल. नवीन पद्धतीचा अभ्यासक्रम सुलभतेने हाताळाल . संतती विषयक समस्या दूर होतील. काही प्रमाणात पोटाच्या विकाराने मनाला उद्विग्नता येऊ शकते. द्रव पदार्थाच्या संबंधित क्षेत्रातून आर्थिक लाभ होतील.

मकर : संततीच्या कर्तृत्वाने आत्मिक समाधान लाभेल. विविधांगी वाचनाची आवड वाढेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन भक्ती वृद्धिंगत होण्यासाठी कीर्तन प्रवचनादी प्रबोधनात्मक अनमोल मार्गदर्शन करू शकाल.
जमीन किंवा स्थावर इस्टेट खरेदी विषयाला चालना मिळेल. मध्यस्थीतुन घेतलेल्या निर्णयावर आपण ठाम असायलाच हवे.

कुंभ : स्वकर्तुत्वाने मोठे होण्याबद्दलचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध होतील. चित्रपट निर्मितीसारख्या विषयाकडे वाटचाल सुरु कराल. नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी करीत असलेले प्रयत्न यश मिळवून देतील. वयोवृद्ध मंडळींनी प्रकृतीची काळजी घेण्याची अत्यन्त आवश्यकता वाटते. जमिनीपासून फायदा होईल.

मीन : तुमच्या अभ्यासू वृत्तीमुळे जीवनातील पुढचे पाऊल टाकताना त्याचा फायदा होईल. व्यवहारात नियोजन करावे लागेल. न्यायालयीन प्रक्रियेत यश संपादन कराल. भाऊबंदकीत आपण सरस ठराल. तुमच्या शब्दाला दर्जा प्राप्त होईल. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेच्या वाटाघाटी यशस्वी होतील.

Latest Posts

Don't Miss