spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य १५ नोव्हेंबर २०२२, आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता

मेष : आज तुम्हाला सन्मान प्राप्त होतील. पारिवारिक स्नेहसंबंध अधिक दृढ होतील. कोणतयाही परिस्थितीत कर्ज घेणे टाळा. पोटाचे विकार बळावण्याची शक्यता वाटते. त्यासाठी वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकेल. आपण केलेले वक्तव्य सामाजिक परिवर्तन करणारे ठरेल. कौटुंबिक कलह वाढू नये याबाबत काळजी घ्यावी.

वृषभ : महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज कोणतेही काम हाती घ्याल त्याला झटपट गती मिळेल. मात्र आपण आपला उत्साह देखील कायम ठेवायची गरज आहे. मित्र परिवाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. विवाह इच्छूकांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी देणारा असेल. भागीदारीतून फायदा होईल. शिक्षकांना सन्मानाची वागणूक मिळेल.

मिथुन : मंगल कार्यासाठी खर्चाची तरतूद करावी लागेल. अचानक होणारी खर्चाची वाढ- जवळच्या विश्वासू व्यक्तीकडून केला जाणारा विश्वासघात, अशा अनेक कारणांनी आजचा दिवस चर्चेत राहील. दोषारोपाने विचलित होऊ नका. मोजके शब्द प्रयोग करा. आजचा दिवस संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल.

कर्क : तुमची कीर्ती वाढेल असे कार्य आज तुमच्या हातून घडेल. आजचा दिवस आपण मित्रांच्या हितासाठी द्याल. इतरांबद्दलची आस्था वृद्धिंगत करणारा असेल. काही विषय लौकिक प्राप्तीसाठी देखील हाताळावे लागतील. चेहऱ्यावरील भाव लपून रहाणार नाहीत. स्रियांबद्दल अनास्था निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्योतिष शास्त्र किंवा गूढ विद्या याबाबद्दलची ओढ निर्माण होईल .

सिंह : वैचारिक ताणतणाव दिसून येईल. तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव असणे गरजेचे आहे. अकारण जास्त भावनिक होऊन आपण आपली फसगत करून घेऊ नका. गृहसौख्य उत्तम राहील. आपल्या स्वकर्तृत्वाने नवा कीर्तिमान स्थापन करू शकाल. गृह सजावटीसाठी नवीन वस्तूची खरेदी करू शकाल. मानसिक दुर्बलता कमी होईल.

कन्या : आजचा दिवस तुम्हास संस्मरणीय ठरेल असाच आहे. वैचारिक सकारात्मकता तुम्हाला ऐच्छिक फळ प्राप्त करून देण्यास सहाय्यभूत राहील. परदेश गमनासाठी जर प्रयत्न करीत असाल तर आज तुम्हाला अपेक्षित पत्रव्यवहार होऊ शकेल. मंगल कार्यात सहभागी व्हाल. न्याय विभागातून दिलासा मिळेल.

तुला : आज तुम्हास प्रत्येक विषय हाताळताना संयमाची आवश्यकता आहे. तसेच काही कठोर निर्णय देखील घ्यावे लागतील. ऐतिहासिक विषयावर चर्चा करताना कोणत्याही व्यक्ती विशेष यांची अवमानना होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. दिवसाचा उत्तरार्ध काही प्रमाणात मानसिक आधार देणारा राहील.

वृश्चिक : तुमच्या शब्दाला सामर्थ्य प्राप्त होईल. अनेक दिवसांपासून प्रयत्नात असलेल्या कामाला गती मिळाल्याची बातमी ऐकायला मिळेल. आपण जर आर्थिक देवाण घेवाणीचे व्यवहार करीत असाल तर आज आपणाला पैसा देताना उचित तारण घेतल्याशिवाय व्यवहार करणे नुकसानीचे ठरू शकते. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दुय्यम व्यवसायातून चांगली आर्थिक आय होऊ शकेल.

धनु : आरोग्यविषयक उपचार लागू होतील. आई कडील नातेवाईकांचा सहवास लाभेल. जवळचे प्रवास घडून येतील. साथीच्या रोगाचा त्रास होऊ शकेल. कर्जाची मागणी केली असलयास त्या कामात तुम्हाला यश मिळेल. हितशत्रुंच्या कारवाया मनस्ताप वाढवू शकतात. मंगल कार्यासाठी खर्च करावा लागेल. वैवाहिक जीवनात अधिक समस्या उदभवू शकतील.

मकर : वाजवी आणि किफायतशीर व्यवहार करण्याची मानसिकता बनेल. आज तुम्ही नवीन ध्येयधोरणांचा अवलंब करून कामकाजाची सुरुवात कराल. अभ्यासाला नवीन दिशा मिळेल. उत्तम शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्याने अनेक शंकांचे निरसन होईल. लेखक – पत्रकार यांच्या लेखणीतून आज प्रभावी लेखन होऊ शकेल. धर्मासाठी आपण आपले सर्वस्व अर्पण करण्याची मानसिकता तयार कराल.

कुंभ : तुमच्या अधिकारात आणखी वाढ होईल. कामात अधिक जबाबदारपणाने वागावे लागेल. नवीन व्यवसायाचे नियोजन उत्तमप्रकारे कराल. वाहन खरेदी – घर खरेदी-घरातील सजावटीच्या वस्तूंची खरेदी यासारख्या विषयात आज व्यस्त रहाल. अचानक धनप्राप्तीचे योग संभवतात. दुसऱ्याकडून काम करून घेण्याची तुमची हतवटी इतरांना सहज लक्षात येणार नाही.

मीन : वैचारिक दुर्बलतेपासून स्वतःला सावरायला शिका. मनातील शन्का कुशंका व्यक्त करा जेणेकरून जीवनात सहजता येईल. विघातक कृत्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. एकमेकांविषयीचा स्नेहभाव वृद्धिंगत होईल. आयकर विभाग अथवा हवाई विभाग यासंबंधी क्षेत्राशी निगडित असाल तर आज तुम्हाला अत्यन्त समाधान लाभेल.

Latest Posts

Don't Miss