राशी भविष्य – 2 September 2022 – काही प्रमाणामध्ये मनाची चलबिचल…

दिवसाच्या सुरुवातीचा काळ हा साधारण आहे. काही प्रमाणामध्ये मनाची चलबिचल राहील. कोणत्याही धोकादायक किंवा उंच जागेवरती जाण्याचा प्रयत्न करू नका.

राशी भविष्य  –  2 September 2022 – काही प्रमाणामध्ये मनाची चलबिचल…

मेष : दिवसाच्या सुरुवातीचा काळ हा साधारण आहे. काही प्रमाणामध्ये मनाची चलबिचल राहील. कोणत्याही धोकादायक किंवा उंच जागेवरती जाण्याचा प्रयत्न करू नका. राजकारणात आपण कार्यरत असाल तर आपल्या सोबत अन्याय होऊ शकतो. साधारण भाग्य उदयासाठी आवश्यक त्या प्रमाणात आपल्याला सहकार्य करणारे मंडळी भेटतील.

वृषभ : आपणांस सहयोगी मित्र परिवाराकडून उत्तम प्रकारे सहकार्य मिळेल. भागीदारीमध्ये फायदा होईल अथवा आपण जर भागीदारीमध्ये व्यवसाय करू इच्छित असाल तर आपल्याला त्यात सुद्धा यश मिळेल. आरोग्यविषयक काळजी घेण्याची आवश्यकता आहे . गुडघेदुखी किंवा कमरेपासून खालचा तो पायाचा भाग त्याठिकाणी पिडा होऊ होऊ शकते.

मिथुन : अत्यंत प्रभावीपणे आणि मानवी जीवनास उपयुक्त आशा विषयात आपण प्रगती कराल. परदेशस्थ व्यवहार सुरळीत होण्यासाठी हा काळ अत्यंत सुलभ आहे. भावंडाकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.  न्यायालयीन कामकाजात यश संपादन करा कराल.  आपल्याल प्रचलित उद्योग व्यवसायामध्ये अनपेक्षित धनलाभ होतील.

कर्क : नवीन उत्पादन बाजारात आणले तर त्या उत्पादनावर आपल्याला अनमोल लाभ होईल. अचानक धनलाभ होऊ शकतील. लॉटरी सारख्या व्यवसायामध्ये लाभ होऊ शकतो.  भागीदाराकडून सहकार्याची भूमिका घेतली जाईल .

सिंह : विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. घरातील वयोवृद्ध मंडळींच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे . आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा होईल . कलाकौशल्याची आवड वाढेल. गायन-वादन करमणुकीच्या कार्यक्रमांकडे आपली ओढ जास्त राहील. जुने येणे वसूल होऊ शकेल. वाहन चालवणे टाळा.

कन्या : आज आपणास नवीन नवीन संकल्पना सुचतील त्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करा. आर्थिक सुबत्ता येण्यासाठी आज घडणाऱ्या घडामोडी महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरतील. तसेच सावकारी व्यवसाय किंवा पैशाच्या जेवण घेण्याचे व्यवहारात आपण जर कार्यरत असाल तर त्या कामांमध्ये आपणास यश संपादन होईल.

तुळ : आपले विचार प्रकटपणे मांडा. असे केल्याने आर्थिक उन्नती होऊ शकेल. जुने शरीर विकार असतील तर ते विकार त्रासदायक ठरू शकतील. अशा विकारावर योग्यवेळी उपचार करणे आवश्‍यक आहे.स्नेहीजण मित्रमंडळी कडून उचित असेच सहकार्य मिळेल. मंगल कार्यात आर्थिक व्यय होईल.

वृश्चिक : आज आपणांस घरगुती व्यवहाराकडे लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील तसेच आपण घर घेण्याचा विचार करत असाल तर त्या त्या कामी प्रगती दिसून येईल. वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. विद्यार्थी दशेतील मुलांना नवीन शिक्षण पद्धती सहज आणि सुलभ होईल.

धनु : कर्जासाठी मागणी केली असेल तर ते काम होऊ शकेल. हितशत्रूंच्या विळख्यात अडकणार नाहीत याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात अत्यंत टोकाची भूमिका घेणे घातक ठरेल. जीवघेणी स्पर्धा टाळा. आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी प्रभावी शब्दांची योजना करावी लागेल.

मकर : नोकरीमध्ये आपण केलेल्या कार्याची स्तुती होईल. समाजामध्ये आपण केलेल्या कामाची पोचपावती म्हणून पारितोषक मिळू शकेल. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. हितशत्रूवर आपण सहज मात करून त्यांच्या कल्पनेतील विश्वाला सहज सहज कडा पाडू शकाल

कुंभ : आपण मांडलेल्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी अथक प्रयत्नांची आवश्यकता आहे. विघ्नसंतोषी लोकांपासून आपण सावध रहावे. तीर्थक्षेत्राच्या यात्रा करण्याचे निर्णय घ्याल. उच्चपदस्थ व्यक्तींना सन्मानाने तसेच आत्मीयतेने वागणूक मिळेल .

मीन : ध्यान योग यासारख्या विषयात रुची वाढेल . पूर्व संचित कर्म योगाने अनायास काही फल प्राप्ती होईल. संतती साठी प्रयत्न करीत असाल तर आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. जवळच्या प्रवासाचे बेत आखले जातील. स्पर्धा परीक्षेत सहभागी झाल्यास अपेक्षित यश प्राप्त होऊ शकेल.

Exit mobile version