spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य 16 जुलै 2022 

मेष : आरोग्यविषयक तक्रारी जरी असल्या तरी जास्त चिंतेचे कारण नाही. उपचाराने बरे वाटेल . नवीन उद्योग व्यवसायाची आखणी करत असाल तर तुमच्या संकल्पना राबविण्यात यश प्राप्त होईल. मात्र आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, त्यापैकी नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील.

वृषभ : दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आज ठरवलेल्या कामाचा आजच निपटारा करा. कदाचित उद्या हि संधी आपल्या हातातून निघून गेलेली असेल. आपण केलेल्या अधिकच्या कष्टाचे फळं निश्चित मिळेल.

मिथुन : आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. आजचा दिवस विविध घटनाक्रमानी व्यस्ततेत जाण्याची शक्यता आहे. जुने येणे वसूल करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश मिळण्यासारखी ग्रहस्थिती आहे. कौटुंबिक कलह रस्त्यावर येणार नाही काळजी घ्यावी.

कर्क : आजचा दिवस निर्भेळ आनंदाचा असेल . तुमच्याकडून अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. अनपेक्षितपणे गोड बातमी समजल्याने तुमचा उत्साह वाढेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे.

सिंह : तुमच्याबरोबर असायला हवी अशा व्यक्ती सोबत नसल्याची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल. आर्थिक उलाढाली मोठ्याप्रमाणात घडतील . तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. कलाक्रीडा क्षेत्रातील लोकांसाठी अत्यन्त महत्वपूर्ण बदल घडवून आण्णा दिवस आहे.

कन्या : पारिवारिक स्नेहसंबंध वृद्धिंगत करणारा दिवस आहे. नेत्र विकार असणारांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर सन्मान मिळाल्याने तुमचा आनंद द्विगुणित होईल . जीवनातील बऱ्याच समस्यांचे निराकरण आज तुम्हाला स्वतःला शोधण्याची आवश्यकता आहे.

तुला : लांबचे प्रवास टाळा. इतरांसाठी अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल परंतु जगाच्या रीतीभाती सुद्धा समजून घेऊन काही वेळा वागले पाहिजे याची जाणीव असावी. आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देऊ शकतात.

वृश्चिक : गरोदर स्त्रियांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. घेतलेल्या कर्जाची फेड करणे अनिवार्य आहे. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. गृह सजावटीच्या वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक संसाधन खरेदी करण्याचा विचार अधिक घट्ट होऊ शकतो.

धनु : वाहवत चाललेल्या विचारांवर नियंत्रण मिळण्यास सुलभ होईल .व्यसनाधीनता वाढणार नाही याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हा विषय तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस.

मकर: अन्नातून बाधा होण्याची शक्यता असल्याने बाहेरील खाणे टाळावे. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. मुलांच्याबाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्या पेक्षा कमी अनुभवी व्यक्तींबाबत धैर्याने घ्या. क्षमतेपेक्षा अधिक केलेले काम करणे तुमच्यासाठी नुकसानदायक सिद्ध होईल.

कुंभ : योग्य ती विश्रांती घेण्याची आठवण ठेवा. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. बालपणीच्या आठवणी जाग्या होतील. चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल.

मीन : आनंदाची बातमी ऐकायला मिळाल्याने उत्साह शिगेला पोहोचेल. उत्तम अर्थार्जन झालेले मानसिक आणि आत्मिक समाधान लाभेल . घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष होणार नाही याबाबत काळजी घ्या. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल.

– रविंद्र भगवान पाठक गुरुजी ठाणे ८१०८२६६६७२

Latest Posts

Don't Miss