spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य १६ ऑक्टोबर २०२२ , आपल्या व्यवहाराबाबतची गुप्तता पाळणे तुमच्या हिताचे ठरेल

मेष : आज आपण खोट्या प्रतिष्ठेसाठी जीवाचा आटापिटा कराल. काहीही झाले तरी भरपूर पैसा कमावून श्रीमंत होण्याची मानसिकता बनेल. आपल्याला सहकार्य करणारा अथवा सोबती मित्र समूह देखील अशाच विचारसरणीचा असेल. कृत्रिम पद्धतीने उपयोगात येतील अशा नवीन यंत्रणेचा शोध लाऊ शकाल. आर्थिक व्यवहारात धोका देणाऱ्या मंडळींना ओळखण्याचा प्रयास करा.

वृषभ : बाजारात येणाऱ्या नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा तुमचा कल असेल. आर्थिक बाबतीत आज चुकीचे निर्णय होऊ शकतात. सावकारी क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल तर आज देवाण घेवाणीच्या व्यवापारात आज फायदा होईल. पारिवारिक स्नेहसंबंधात बेगडी प्रेम दिसून येईल. डोळ्याच्या विकारासंबंधी त्रास वाढू नये म्हणून काळजी घ्या.

मिथुन : आजच्या दिवसासाठी मनात ठरवलेल्या कामात काहीशी मरगळ येईल. कामकाजात अकारण विलंब झाल्याने मनःस्ताप देखील होण्याची शक्यता आहे. नकारात्मकता दूर करण्यासाठी शिवशंकराची आराधना करावी. मनाची चंचलता कमी करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. आजच्या दिवसाला आपल्यावर अवलंबून असेल्या लोकांना दिलासा मिळेल अशी कृती करण्याचा प्रयत्न करा.

कर्क : आजचा दिवस आपणास फायदा वाढवणारा आहे. दुय्यम दर्जाच्या व्यवसायात अथवा लॉटरी सारख्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळू शकेल. सकाळपासूनच मोठया अपेक्षेने धावपळीस सुरुवात कराल. आपले साथीदारही याच पद्धतीने आपल्याशी व्यवहार करतील. कायद्याच्या फासात अडकले जाऊ नये याबाबत काळजी घ्यावी.

सिंह : आज आपल्या विचारांना ग्रहण लागल्यासारखी स्थिती निर्माण होईल. अनेक लोक आपल्या वैचारिक कमजोरीचा फायदा घेऊ शकतात. आपण राजकारणात कार्यरत असाल तर विविध प्रकारची आमिष दाखवली जाण्याची शक्यता आहे मात्र आजचा निर्णय उद्यावर ढकलणे हिताचे ठरेल. घरंदाज अथवा परंपरांचा सन्मान राखणाऱ्या मंडळींनी आजचा दिवस अज्ञातवासात राहणे सोयीचे ठरेल.

कन्या : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणारा आहे. अनेक दिवसांपासून रेंगाळत पडलेल्या कामास आज गती मिळेल. तुमच्या विचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. महत्वाची कामे उरकून घेण्याचा प्रयत्न करा. आप्तेष्ठांसोबत स्नेह वाढेल. खाण्यापिण्याच्या पदार्थाबाबत विशेष रुची निर्माण होईल. बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

तुला : ज्यांच्या विषयी कधी कल्पनादेखील केली नसेल अथवा विचारही मनाला शिवला नसेल अशा मंडळींकडून आज आपणांस अनमोल सहकार्य मिळेल. आजचा दिवस आपल्या जीवनातील ऐतिहासिक कामगिरीचा ठरू शकतो. तुमच्या कलागुणांना वाव /संधी प्राप्त होतील. तसेच त्यांना सामाजिक मान्यता देखील प्राप्त होऊ शकेल.

वृश्चिक : आज तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम रहाल. पूर्वशापाचे दुष्परिणाम आज आपणास व्यत्यय निर्माण करू शकतात. आपण कितीही विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या पात्रतेबाबत साशंकता दूर करताना दमछाक होईल. आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदाचा उपयोग होऊ शकेल. मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतील.

धनु : आपण ठरवलेले उद्दिष्टाचा पाठलाग करा . आज आपण यशाच्या जवळ जाऊन पोहोचत आहात. तुमचे कलाकौशल्य आणि उत्साह इतरांनाही प्रोत्साहित करेल. चित्रकला, रांगोळी, संगीत स्पर्धा यांची पूर्व तयारी उत्तमरितीने झाल्याने समाधान लाभेल. आज कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ अथवा देऊ नका. प्रकटपणे व्यक्त होण्याचा प्रयत्न करा.

मकर : आज कोणतेही कामकाज करताना त्यात्या विषयातील तज्ज्ञ अथवा अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळल्याचा फायदा होईल. सहलीच्या ठिकाणी मनाला प्रसन्नता मिळेल. प्रवासामुळे थोड्याप्रमाणात थकवा जाणवू शकेल. आपल्याशी संवाद साधत असलेल्या व्यक्तीचे विचार नीट समजून घेऊन त्यावर अंमल करण्याचा प्रयत्न करा.

कुंभ : आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज बांधता येईल. ज्याप्रकारचे संकेत मिळतील त्याप्रमाणे व्यवहारिक व वैचारिक परिवर्तन घडवल्यास नक्कीच फायदा होईल. अचानक झालेल्या ओळखीचा फायदा होईल. नवीन स्नेहसंबंध जोडण्यास अथवा नक्की करण्यास आजचा दिवस उत्तम राहील. आजचा दिवस आपणांस ऐशवर्य संपन्नतेकडे घेऊन जाणारा राहील.

मीन : तुमच्या अधिकाराचा पूर्ण वापर करण्याची संधी आज तुम्हाला मिळेल. आपण जर सैन्यदल, पोलीस अशा क्षेत्रात कार्यरत असाल तर आज तुमच्या पदाचा अभिमान वाटावा अशी कामगिरी तुमच्या हातून घडेल . राष्ट्रीय स्तरावर तुमचा कीर्तिमान स्थापित होऊ शकेल. आपल्या व्यवहाराबाबतची गुप्तता पाळणे तुमच्या हिताचे ठरेल.

Latest Posts

Don't Miss