राशी भविष्य – 3 September 2022 – चांगल्या घटना ऐकायला…

एकाच वेळी अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे अधिक आशा पल्लवीत होऊन त्या पूर्णत्वास गेल्याचा आनंद देखील अनुभवाल.

राशी भविष्य – 3 September 2022 – चांगल्या घटना ऐकायला…

मेष : एकाच वेळी अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे अधिक आशा पल्लवीत होऊन त्या पूर्णत्वास गेल्याचा आनंद देखील अनुभवाल. विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या बाजूने सकारात्मक चर्चा करतील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उन्नती होईल. स्थिर लक्ष्मीचा लाभ होईल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे.

वृषभ : आज तुम्हाला चांगल्या घटना ऐकायला मिळतील. मित्रमंडळी भेटायला येतील. तुमचा नावलौकिक वाढेल. कायदेविषयक घटनेमध्ये यशस्वी व्हाल. प्रवास सफल आणि यशदायी होईल. कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण बनून राहील. कामाच्या शोधात असलेल्याना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील।

मिथुन : तुमच्या व्यवहारात सहकार्य करणारे लोक भेटतील. भागीदारीसाठी पोषक वातावरण तयार होईल. प्रेमी युगुलासाठी दिलासा देणारा काळ आहे. शारीरिक कमजोरी दुर्लक्ष करण्यासारखी नाही, वेळीच उपचार करून घ्या. व्यापार उद्योगात फायदा होईल. सात्विक मार्गाने भरभराट होईल. नव्या परिवाराशी सलगी वाढेल.

कर्क : मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रूंच्या प्रभावाने नुकसान संभवते. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. भावनिक होऊन अनभ्यासाने कोणतेही निर्णय घेऊ नका. भागीदारी व्यवसायात मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात आनंद शोधा म्हणजे तो सापडेल.

सिंह : मानसिक सौख्य लाभेल. संतती विषयक चिंता कमी होईल . दुर्लभ गोष्टींचा आनंद मिळेल. जवळच्या लोकांमुळे मनस्ताप सहन करावा लागेल. तुम्ही बोललेल्या शब्दाचे विपरीत अर्थ निघून गैरसमज वाढू शकेल. मित्रपरिवारासोबत काळ व्यतीत कराल. कौटुंबिक पातळीवर जबाबदाऱ्या वाढतील. पवित्र कार्य घडून येईल.

कन्या : विरोधकांच्या शब्द प्रहराला आपण जहाल भाषेत उत्तर द्याल. थोड्याप्रमाणात मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्जाची मागणी केली असल्यास त्या प्रकरणात सकारात्मक प्रतिसाद मिळेल. किडनी, मूत्रपिंड संबंधित भागात विकार जाणवत असल्यास त्वरित वैद्यकीय उपचार करून घ्यावा.

तुळ : कोणत्याही व्यवहारात सन्मानाने सहभागी करून घेतले जाईल. समाजात वावरताना सुखद अनुभव येतील. राजकीय क्षेत्रात वैमनस्य वाढण्याची शक्यता आहे. स्त्री विषयक प्रश्न उपस्थित होतील. चरित्र हनन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या युक्तिवादावर न्यायालयात आव्हान दिले जाईल. पित्त प्रकृती त्रासदायक ठरेल.

वृश्चिक : आर्थिक आवक वाढेल. व्यवहारात काही प्रमाणात अस्थिरता निर्माण होईल. सामाजीक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. घरातील वातावरण संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहावे. वाहन खरेदी करण्यासाठी उत्तम काळ आहे. कुटुंब जोडून ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडाल.

धनु : मनातील संकल्पनाना मूर्त स्वरूप प्राप्त होऊ शकेल. यशाकडे वाटचाल सुरू होईल. देशभक्तीने ओतप्रोत भारावून जाल. आर्थिक नियोजन करण्यात यशस्वी व्हाल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे. प्रतिष्ठित लोकांचा सहवास लाभेल. गृहकलह वाढू नये याबाबत काळजी घ्या. सामाजिकतेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.

मकर : भावनिक होऊन कोणतेही निर्णय करू नये. व्यवहारात आर्थिक नुकसान संभवते. मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली कराल. स्वप्नांचा पाठलाग करताना उद्याच्या दिवसाची आस वाढेल. व्यापार जगतात नवा विक्रम स्थापित करू शकाल. कौटुंबिक स्तरावर हितसंबंध टिकून राहण्यासाठी प्रयत्न करा.

कुंभ : मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल. आर्थिक आवक वाढेल. मात्र कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना फायदेशीर आहे की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. अचानक खर्च उद्भवू शकतात. मशिनरी किंवा अन्य उपयोगी साधनसामग्री खरेदी कराल. संतती विषयक प्रश्नावर चर्चा करून मार्ग निघतील.

मीन : कौशल्याला न्याय मिळेल. नवीन एजन्सी चालू करण्यासाठी संधी उपलब्ध होतील. व्यापार जगतात प्रगती होईल . परदेशात व्यापार वृद्धी होईल. नोकरी व्यवसायासाठी परदेशात जाणे होईल. अडकून पडलेल्या कामांना गती मिळेल. व्यावसायिक संतुलन राखण्यासाठी सक्षम निर्णय घ्यावा लागेल.

Exit mobile version