राशी भविष्य – १६ सप्टेंबर २०२२ – मीन राशीच्या लोकांना आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो…

राशी भविष्य – १६ सप्टेंबर २०२२ – मीन राशीच्या लोकांना आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो…

मेष : आज तुमच्यासाठी चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवसआहे. अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. आजी- आजोबा किंवा तत्सम वयोवृद्ध व्यक्तींची सेवा करा.

वृषभ : काहीही न करता बसून राहण्याची सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते त्यामुळे स्वत:ला कामात गुंतवून घ्या. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल.

मिथुन : अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभवती असलेल्या लोकांना प्रभावित करील. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे – त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल.

कर्क : आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. आज तुम्हाला आर्थिक उत्पन्नाचे श्रोत मिळू शकतात. इतरांना दुखावून नका आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. चोरापासून सावधान असावे. आध्यत्मिक गुरूंचे उत्तम मार्गदर्शन लाभेल.

सिंह : आजचा दिवस मित्रमंडळीं समवेत साजरा कराल. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंदवार्ता मिळेल. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका.

कन्या : आपले संतुलन ढळू देऊ नका. अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषत: आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही. आजुबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. कार्यालयीन कामात प्रगती दिसून येईल. सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम सहकार्य लाभेल.

तुला : हास्यविनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल आणि तुम्हाला आत्यंतिक गरज असणारा आराम मिळेल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. दागदागिने किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. जीवनामध्ये संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका, त्याऐवजी स्वत:हून नव्या संधींचा शोध घ्या.

वृश्चिक : आशावादी रहा आणि चांगल्या सकारात्मक बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते. तुम्ही भागीदारांच्या/जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर आणखीच उपद्रवी बनू शकतात.

धनु : आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल तुमच्या कामाचा उरक वाढेल. आज तुम्ही घरातून बाहेर पडताना खूप सकारात्मकतेने निघाल परंतु, कुठल्या किमती वस्तूची चोरी होण्याने तुमची मनस्थिती खराब होऊ शकते. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य असे निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी आणि घरगुती तणा वापासून मुक्ती मिळण्यास सुकर करील.

मकर : तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलं घेऊ शकतात. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे.

कुंभ : आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाºया लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी युक्त स्थिती तुम्हाला मानसिक आनंद देणारी असेल.

मीन : आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. व्यावसायिक बैठकांमध्ये स्पष्टवक्तेपणा आणि भावनांना आवर घाला.

Exit mobile version