spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य १८ सप्टेंबर २०२२, मीन राशीच्या लोकांच्या अधिकारात वाढ होईल

मेष : आपण जर कला क्षेत्राशी निगडित असाल तर तुमचा उदय काळ सुरु होत आहे. आपल्या कलागुणांतून उत्तम लोकसंदेश देऊ शकाल. आज आपण आपल्या आराध्य देवतेची उपासना जरूर करा. थोरामोठ्यांचा सल्ला जीवनात परिवर्तन घडवून आणणारा असेल. सरकार दरबारी आपण कार्यरत असाल तर तुमच्या अधिकारात उत्तम कार्य करू शकाल.

वृषभ : आज आपणांस नेत्रदीपक यश प्राप्त होऊ शकेलं . पारिवारिक संबंधाबरोबरच व्यावसायिक संबंध देखील वृद्धिंगत होतील. मंगल कार्य ठरताना तुम्ही यशस्वी पुढाकार घेऊ शकाल. ज्यांना नेत्रविकार असेल अशांनी आरोग्याची काळजी घेण्याची नितांत गरज आहे. वैचारिक मतभेद चव्हाट्यावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी.

मिथुन : आपले मत प्रकट करताना कोणत्याही प्रकारे संकोच मनात नसावा. तुमचे नियोजन आणि न्यायप्रिय व्यावहारिक स्थिती या दोन्ही गुणांमुळे इतरांपेक्षा वेगळेपण दिसून येईल . भाग्योदयासाठी साशंकित असलेले मन आज समाधानाने भरून उरेल. मनाची घालमेल कमी झाल्याने तुमची व्यवसायिक स्थिती सुधारण्यास देखील मदत होईल.

कर्क : कंजूष माणसाची भेट होऊ शकेल. अशा वृत्तीच्या लोकांवर विश्वास टाकल्याने तुमची फसगत देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राकृतिक कारणाने तुमची मानसिक विचलितता वाढण्याची शक्यता आहे. कुठल्यातरी दोषाचे बळी आपणांस दिले जाऊ शकता. विरोधकांच्या आरोपाने आपण विचलित होऊ शकता.

सिंह : आज आपणांस पूर्व संचिताचा लाभ होण्याची शक्यता आहे. आंदण किंवा दत्तक विधानातून अनायास कमी मेहनतीत अधिक लाभ प्राप्त होण्याचे योग्य संभवतात. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती कराल. आपण वर्तविलेले भाकीत सत्याचा अनुभव देऊन जातील. वाणीतून अविचाराने कोणतेही खोचक शब्दप्रयोग करू नयेत.

कन्या : आपले अपार कष्टाचे उत्तम फलित आज मिळण्याची शक्यता आहे. मात्र तरीही आपणास विवादास्पद लोकांपासून दूर राहणेच हितावह राहील. आपल्या मुखातून कोणीतरी काहीतरी वदवून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. अशावेळी आपण आपल्या पायरीचा विसर न पडू देणे उत्तम ठरेल. भावंडांकडून उत्तम सहकार्य लाभू शकेल.

तुला : आज आपण पारिवारिक आप्तेष्ट किंवा समूहात एकत्र राहून दिवस व्यतीत कराल. आपल्या वाणीने किंवा वागण्याने इतरांना कष्ट अथवा पीडा होणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दूरचे प्रवास टाळणे अधिक श्रेयस्कर राहील. दुर्जनांचा संग टाळणे हितकारक राहील. कोणत्याही विषयात कृत्रिम भाव प्रकट केल्याने तुमची प्रतिष्ठा मातीमोल होऊ शकेल.

वृश्चिक : आज आपण भांडवली बाजारात गुंतवणूक करताना खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे. प्राकृतिक कारणाने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यातच कर्जबाजारीपणा देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आज कोणतेही पाऊल उचलताना खूपच काळजीपूर्वक उचलण्याची आवश्यकता आहे. मामाकडील परिवारामधून काहीतरी वेदनादायी बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.

धनु : आज आपण काहीतरी नव्या संशोधनाची सुरुवात करू शकाल. तुमच्या संशोधनाला शास्त्रीय अधिष्ठान लाभू शकेल. तुमची ऊर्जा वाखणण्यासारखीच असेल. शिक्षक – माता-पिता आदींचा सन्मान करण्याची तुमची वृत्ती इतरांसाठी आदर्श बनेल. दैनंदिन जीवनात दैवी शक्तीचे अधिष्ठान लाभेल. त्याकृपेने तुमच्या बदलत्या स्थितीला सामोरं जाण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास वृद्धींगत होईल.

मकर : आजचा दिवस तुम्हाला शारीरिक परिश्रमाचा आहे. तुमचे दैव बलवत्तर असल्याने गंडांतर योगातून मुक्त व्हाल. वाहन दुर्घना घडू नये यासाठी आवश्यक ती काळजी जरूर घ्यावी. आर्थिक बाबतीत जर तुम्ही पूर्वी कुठं गुंतवणूक केलेली असेल तर त्याचा फायदा आज दिसून येईल. अन्नातून विषबाधा होणे, हिंस्त्र पशूने डंख मारणे यासारख्या घटनांपासून स्वतःला सांभाळावे.

कुंभ : तुमच्या घरात आज मांगलिक वातावरण बनून राहील. विवाह, घर-वाहन खरेदी यासारख्या विषययावर प्राथमिक चर्चा होतील. त्यातून काही प्रमाणात सकारात्मकता देखील वाढेल. तुम्ही स्वतःचा व्यवसाय करीत असाल तर त्यासाठी आवश्यक अशा जागेची तरतूद करण्यात आज यश मिळेल. काया – वाचा – मनाने केलेले संकल्प सिद्धी होईल.

मीन : तुमच्या अधिकारात वाढ होईल. जनसामान्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमचे कर्म आणि कर्तव्य यांशी असलेली नाळ अबाधित ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी तुम्ही रामबाण उपायाची योजना आखू शकाल. नवनाथ किंवा दत्तसंप्रदायातील कोणतीही उपासना आज तुम्हाला अधिक ऊर्जा प्रदान करील.

Latest Posts

Don't Miss