spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य – 7 September 2022 – महत्वाचे निर्णय घेताना…

राजकारणात कार्यरत असाल तर अधिक परिश्रमाची आवश्यकता आहे. आज अनेक दिलासादायक गोष्टी ऐकायला मिळतील.

मेष : राजकारणात कार्यरत असाल तर अधिक परिश्रमाची आवश्यकता आहे. आज अनेक दिलासादायक गोष्टी ऐकायला मिळतील. अथक प्रयत्न करूनही ज्या कामांना गती मिळत नव्हती ती गती वाढेल. कर्ज घेणे -देणे यासारखे व्यवहार सफल होतील. भागीदाराकडून अनपेक्षित सहकार्य प्राप्त होऊ शकेल. धार्मिक ग्रंथ वाचन अथवा श्रवण केल्याने अनेक संकटांवर मात करण्याचे मार्ग प्रशस्त होतील.

वृषभ : महत्वाचे निर्णय घेताना तात्कालिक गोष्टीला महत्व न देता त्याचे दूरगामी परिणामाचा जरूर विचार करावा. शिक्षण-कला -क्रीडा या विषयाला धरून अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडल्याचे अनुभवायला मिळेल. आपण प्रकट केलेलं मत सामाजिक परिवर्तन करणारे ठरू शकते. आर्थिक व्यवहारात केलेल्या गुंतवणूकिचा फायदा उचलता येईल.

मिथुन : घर – जमिन खरेदी यासारखे विषय सकारात्मक चर्चेने निकाली निघतील. शिक्षकीय पेशा असणाऱ्या व्यक्तींना मानसन्मान प्राप्त होईल. जवळपासचे प्रवास करावे लागतील. दैवी उपासना केल्याने मानसिक बाळाची प्राप्ती होईल. आयात निर्यातिचा व्यवहारात मध्यस्थीतून फायदा होईल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

कर्क : न्यायालय -पोलीस – सैनिक या क्षेत्राची निगडित विषयाशी संबंध असल्यास देशाला आपले अनमोल योगदान  मिळेल. तुम्ही घेतलेले ठोस निर्णय , कामातील आक्रमकपणा याची चर्चा सार्वजनिक ठिकाणावर होईल. नवा कीर्तिमान स्थापित करू शकाल. अचानक होणारे स्थानांतर दगदग वाढविणारे ठरू शकेल. भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल.

सिंह : आज कोणताही व्यवहार करताना काळजीपूर्वक करा. तुमचा आदर करणारे मंडळी भेटतील. समाजामध्ये मानसन्मान प्राप्त होईल. भाग्योदयासाठी पूरक ग्रहस्थिती आहे. कमी परिश्रमात अधिक लाभ मिळू शकेल. तुमच्या बुद्धी कौशल्याने अशक्य ते शक्य करून दाखण्यात यशस्वी व्हाल . संतती विषयक समस्या दूर होण्यास सुरुवात होईल.

कन्या : आपण जर आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर हा काळ फायदा वाढवून देणारा आहे. ठोस निर्णय घ्यायची क्षमता निर्माण होईल. जमिनीची खरेदी करण्यासाठी अत्यन्त अनुकूल काळ आहे. पारिवारिक स्नेह संबंध सुधारतील. नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर त्या कामी आपणास यश प्राप्त होईल. लोखंडाच्या व्यापारात फायदा होईल.

तुळ : आजचा दिवस महत्वपूर्ण उलाढालीचा राहील. अनेक विषयाचे खल घडून वातावरण ढवळून निघेल. आर्थिक व्यवहारात अडकू नका . जवळ असलेले पैसे देखील सांभाळून वापरावा . चोरापासून सावध असावे. तुमच्यावर केल्या गेलेल्या दोषारोपामुळे मनस्थिती कमजोर होण्याची शक्यता आहे. यश तुमच्या बाजूने उभे राहील.

वृश्चिक : आजचा दिवस मनाला पीडा देणारा राहील. तरीही आर्थिक स्थिती भक्कम होत राहिल्याने मानसिक समाधान देखील मिळत राहील. सूर्यनारायणाची उपासना अथवा नित्य सूर्य नमस्कार केल्याने पीडेचे शमन होण्यास मदत होईल. आपले उत्पनाचे साधनाबाबत गुप्तता ठेवणे हिताचे ठरेल. कोणावरही अतिविश्वास ठेवणे  घातक ठरेल. अपारंपरिक विषयाला हात घालताना सखोल चर्चा करूनच निर्णय घ्यावा.

धनु : पैसा हे एक साधन आहे ते साध्य नाही. काळाच्या गती बरोबर चालताना जीवन मूल्ये पायदळी तुडवली तर जात नाही ना याबाबत विचार करावा.
अडचणींवर मात करण्यासाठी ईश्वरीय साधना मार्ग प्रशस्त राहील. आपल्या यशकीर्तीसाठी अकारण कोणाचा तोटा होणार याची काळजी घ्या. अविचाराणे बोकाळलेल्या वारूला  संयमित करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करील.

मकर : आपल्या संयमाची परीक्षा पहाणारा आजचा दिवस आहे. आपली कामगिरी सत्याची चाड असणारी आणि मालकांसाठी फायदेमंद ठरेल. तरीही फळाची खूप मोठी अपेक्षा ठेवू नका. उद्योजकांसाठी हा काळ प्रगतीचा आलेख वाढवणारा राहील . राजकारणात स्वतःला सावरून रहाणे हिताचे ठरेल. कोणत्याही विषयाची व्यवस्थित पूर्णपणे शहनिशा केल्याशिवाय कोणावरही दोषरोप करू नका .

कुंभ : कुंभ राशीच्या मंडळींनी संवेदनशील विषयावर भाष्य टाळावे. सामाजिक क्षेत्रात वावरताना आपल्या कार्यशैलीवर अंगुली निर्देश केले जाईल असे कोणतेही विषय हाताळू नयेत. आपण करीत असलेल्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत साधारण अस्वस्थता जाणवेल. दूरचे प्रवास टाळावेत.

मीन : मंगल कार्याविषयी बोलणी सुरु होतील. मानसिक अस्थिरता कामास विलंब वाढणारी ठरू शकेल. आपल्यापेक्षा वयाने अथवा मानाने लहान व्यक्तीकडून अनादर होण्याचाही शक्यता आहे. घरातील धार्मिक आयोजनात विषयात प्रत्यक्ष सहभागी व्हाल. दुसऱ्याच्या व्यवहारात मध्यस्थी करणे अथवा प्रत्यक्ष सहभागी होण्याचे टाळावे.

Latest Posts

Don't Miss