राशी भविष्य 21 ऑगस्ट 2022

विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल काळ आहे

राशी भविष्य 21 ऑगस्ट 2022

मेष : ‌आपण केलेल्या कार्याची स्तुती होईल. उच्चपदस्थ व्यक्तींना सन्मानाने वागणूक मिळेल. आपण केलेल्या कामाची पोचपावती म्हणून सन्मान प्राप्त होऊ शकेल. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. हितशत्रूवर सहज मात करून त्यांच्या कल्पनेतील विश्वाला सहज कडा पाडू शकाल. आपण मांडलेल्य संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी अथक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

वृषभ : कुटुंबातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर पडतील. छोट्या-मोठ्या विकाराने मानसिक स्थैर्य ढासळू शकेल. नवीन कामाचा निर्णय घेताना थोडं सांभाळून विचार करून घ्यावा. वाढीव कामाची जबाबदारी घेताना आपली शारीरिक आणि आर्थिक क्षमता याचा जरूर विचार करावा. आर्थिक उन्नती होईल. अचानक धनलाभही होऊ शकेल.  विवाह इच्छुकांचे विवाह ठरण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.

मिथुन: आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी राहील. शेतामध्ये अन्नधान्य चांगल्या पद्धतीने उगवल्याने चेहऱ्यावर आनंद उन्मळून येईल. हॉटेल व्यवसायात तेजी आणून देणारा हा दिवस असेल. कर्ज घेण्याचे टाळावे. आज कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल स्थिती नाही.  कौटुंबिक जीवनातील वातावरण आनंदी राहील. घरासाठी आवश्यक नवीन चीज-वस्तूंची खरेदी करू शकाल. शस्त्रक्रिया ठरली जाऊ शकते.

कर्क : आपण सुरक्षित ठेवलेली रक्कम नित्य उपयोगासाठी खर्च करावी लागेल. पारिवारिक स्नेहसंबंध सुधारण्यास मदत होईल.  नयनरम्य ठिकाणच्या सहलीचे आयोजन कराल,  न्यायालयीन कामकाजात अपेक्षित प्रगती दिसून येईल. विरोधकांचे नामोहरण होण्याची शक्यता आहे . सरकार दरबारी सन्मानाने सन्मानित होण्याचे  योग आहेत .

सिंह : आर्थिक सुबत्ता येउ शकेल. वडिलोपार्जितधन दौलतीविषयी सुरू असलेली  चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जाईल.  वडीलधाऱ्या मंडळीसाठी आपणाकडून दिलासादायक कार्य घडेल . त्यांच्या वयाच्या सन्मान वाढेल असे कर्म घडू शकते.  संतती विषयक समस्यांवर सहज मात करू शकाल.  तीर्थक्षेत्राच्या यात्रा करण्याविषयी चर्चा होईल.  विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल काळ आहे . वैज्ञानिक क्षेत्रामध्ये नवा किर्तीमान स्थापन करू शकाल.

कन्या : आज कामाचा तणाव अधिक राहू शकतो . आपण घेतलेल्या जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील.  राजदरबारामध्ये किंवा आपल्या वरिष्ठांकडून आपल्या विचारांची पायमल्ली केली जाऊ शकते.  आर्थिक विवंचनेमुळे पैशाची लालसा वाढू शकते. शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी प्रयत्न केलयास त्यात यश संपादन होईल. धाडसीपणा  वाढेल.

तूला : कल्पक -संशोधक बुद्धीमत्ता वाढेल. मात्र विलासी वृत्ती वाढू नये याबाबत काळजी घ्यावी. लेखन -काव्य – गायन- वादन अशाप्रकारच्या शिक्षणासाठी अनुकूल काळ आहे.  विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधारण्यासाठी दिलेली संधी आणि शिकवण अत्यंत उपयुक्त ठरेल. नोकरीमध्ये नवीन पदभार मिळण्याची शक्यता आहे . स्त्रियांनी फसवणुकीपासून सावध असले पाहिजे.

वृश्चिक : आजचा दिवस साधारण आहे. काही प्रमाणामध्ये मनाची चलबिचल राहील. वाहन चालवताना काळजी घ्यायची आहे. कोणत्याही धोकादायक किंवा उंच जागेवरती जाण्याचा प्रयत्न करू नका. राजकारणातआपल्या सोबत अन्याय होऊ शकतो.  कौटुंबिकसौख्य उत्तम राहील. कामकाजासाठी नवीन संकल्पना राबविण्यात यशस्वी व्हाल .

धनु :  मित्रपरिवाराकडून उत्तम प्रकारे सहकार्य मिळेल. भागीदारीमध्ये फायदा होईल अथवा आपण जर भागीदारीमध्ये व्यवसाय करू इच्छित असाल तर त्यातही यश मिळेल.  आरोग्यविषयककाळजी घेण्याची आवश्यकता आहे . गुडघेदुखी किंवा कमरेपासून खालच्या भागास पिडा होऊ होऊ शकते.  तीर्थक्षेत्राच्या यात्रा करण्याचे निर्णय घ्याल. मानवी जीवनास उपयुक्त अशा विषयात आपण प्रगती कराल.

मकर : आज अचानक धनलाभ होऊ शकतील. लॉटरीसारख्या व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो. भागीदाराकडून सहकार्याची भूमिका घेतली जाईल . विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. घरातील वयोवृद्ध मंडळींच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे . आर्थिकस्थिती मध्ये सुधारणा होईल . कलाकौशल्यची आवड निर्माण होईल.

कुंभ : आज आपणास नवनवीन संकल्पना सुचतील.  त्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करा. विघ्नसंतोषी लोकांपासून आपण सावध रहावे. आर्थिक सुबत्ता येण्यासाठी आजच्या घडामोडी महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरतील. तसेच सावकारी व्यवसाय किंवा पैशाच्या देवाण घेण्याचे व्यवहारात आपण जर कार्यरत असाल तर त्यात आपणास यश संपादन होईल.

मीन : घरगुती व्यवहाराकडे लक्ष द्यावे लागेल . कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील. आपण घर घेण्याचा विचार करत असाल तर त्यात यशस्वी व्हाल. वाहन खरेदीसाठी सध्या अनुकूल स्थिती नाही.  शिक्षणासाठी योग्य काळ आहे. हितशत्रूंच्या विळख्यात अडकणार नाहीत याची काळजी घ्या.  वैवाहिकजीवनात अत्यंत टोकाची भूमिका घेणे घातक ठरेल. जीवघेणी स्पर्धा टाळा.

Exit mobile version