spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य – १९ सप्टेंबर २०२२ – अडचणींवर मात करण्यासाठी…

तुमचे कर्तृत्व तुम्हाला उंच भरारी मारण्यास समर्थ बनवेल. न्यायालयीन लढाईमध्ये यश प्राप्त होऊ शकेलं . प्रमाणपत्र परीक्षा / स्पर्धा परीक्षा यासारख्या विषयात केलेला अभ्यास तुम्हाला यशप्राप्तीकडे घेऊन जाणारा असेल.

मेष : तुमचे कर्तृत्व तुम्हाला उंच भरारी मारण्यास समर्थ बनवेल. न्यायालयीन लढाईमध्ये यश प्राप्त होऊ शकेलं . प्रमाणपत्र परीक्षा / स्पर्धा परीक्षा यासारख्या विषयात केलेला अभ्यास तुम्हाला यशप्राप्तीकडे घेऊन जाणारा असेल. धार्मिक उपक्रमात सहभागी व्हाल. परमेश्वरावर श्रद्धा अधिक वृद्धिंगत होईल. अनेक समस्यांवर सहजपणे मात करू शकाल.

वृषभ : कौटुंबिक जीवनात विविधांगी प्रश्न उपस्थित होऊ शकतात. थोरामोठ्यांचा सल्ला ऐकला तर निर्माण झालेल्या समस्येवर मार्ग निघू शकतात. आर्थिक व्यवहारात दिलासादायक स्थिती निर्माण होईल. काही प्रमाणात उत्पनाची नवे मार्ग प्रकाश झोतात येतील. भागीदारीतील कोणतेही विषय तुम्हाला फायद्याचे नाहीत ही बाब ध्यानात घेऊनच पाऊल उचलावे.

मिथुन : आज तुम्ही ठोस निर्णय घ्याल. तुमचे मत सामाजिक उन्नतीसाठी पोषक ठरेल. तुमचे व्यापारी मित्र तुम्हाला व्यवसायात मदतगार ठरतील. भागीदारीतून फायदा होईल. विवाह इच्छूकांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी देणारा असेल. गर्भवती स्त्रियांनी आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुमचे मन तुम्हाला आज काहीतरी संकेत देईल त्याचा अवलम्ब जीवनात आवश्य करावा.

कर्क : अति घाई संकटात नेई या म्हणीची प्रचिती येईल. पोकळ आत्मविश्वास घातकी ठरू शकेल. आर्थिक व्यवहारात कुणाचीही मध्यस्थी करू नका. आरोग्याची काळजी करण्याची आवश्यकता आहे. जुने विकार त्रासदायक ठरतील. दोंषारोपाने मन विचलीत होऊ शकते. विरोधकांवर केलेला घणाघाती हल्ला तुम्हाला अडचणीत आणणारा ठरू शकेल.

सिंह : आपण आज महत्वपूर्ण विषयावर चर्चा करून न्याय्य असा सकारात्मक तोडगा काढू शकाल. तुमचे सल्लागार तुम्हाला उचितच सल्ला देतील तरीही कोणत्याही विषयाची शहनिशा केल्याशिवाय त्याबाबतीत क्रियाशील बनू नका अथवा तशी जबाबदारी घेऊ नका. आज तुम्हाला सौजन्यशील लोकांचा सहवास लाभेल. वात प्रकृतीचा त्रास होऊ शकतो.

कन्या : तुमच्या परोपकारी वृत्तीत वाढ होईल. इतरांच्या सहयोगाने तुम्ही प्रगतीकडे वाटचाल कराल. दूरचे नातेवाईक भेटतील. नोकरदारांना आज आपल्या पदाचे कवच वापरावे लागेल. राजकारणात आपणांस सन्मानाचे पद प्राप्त होऊ शकेल. काही क्रांतिकारक निर्णय देखील घेतले जाऊ शकतात. पदोंन्नतीची संधी चालून येईल.

तुळ : संतती विषयक प्रश्न हाताळताना भावुक व्हाल. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे तुम्हाला आनंद होईल. गुरुशिष्य संवाद उत्तमप्रकारे होईल. शैक्षणिक क्षेत्रात एका पेक्षा अनेक आणि विविधांगी विषयाचा अभ्यास वाढेल . कामानिमित्त जवळच्या परिसरात प्रवास करावा लागेल. पूर्वजांची पूर्ण कृपादृष्टी लाभेल. भविष्यात घडणाऱ्या घटनांची पूर्व कल्पना मांडून त्यास चालना देऊ शकाल.

वृश्चिक : आजचा दिवस महत्वपूर्ण उलाढालीचा राहील. अनेक विषयाचे खल घडून वातावरण ढवळून निघेल. आर्थिक व्यवहारात अडकू नका . जवळ असलेले पैसे देखील सांभाळून वापरावा . चोरापासून सावध असावे. तुमच्यावर केल्या गेलेल्या दोषारोपामुळे मनस्थिती कमजोर होण्याची शक्यता आहे. यश तुमच्या बाजूने उभे राहील.

धनु : आजचा दिवस मनाला पीडा देणारा राहील. तरीही आर्थिक स्थिती भक्कम होत राहिल्याने मानसिक समाधान देखील मिळत राहील. सूर्यनारायणाची उपासना अथवा नित्य सूर्य नमस्कार केल्याने पीडेचे शमन होण्यास मदत होईल. आपले उत्पनाचे साधनाबाबत गुप्तता ठेवणे हिताचे ठरेल. कोणावरही अतिविश्वास ठेवणे  घातक ठरेल. अपारंपरिक विषयाला हात घालताना सखोल चर्चा करूनच निर्णय घ्यावा.

मकर  : पैसा हे एक साधन आहे ते साध्य नाही.  काळाच्या गती बरोबर चालताना जीवन मूल्ये पायदळी तुडवली तर जात नाही ना याबाबत विचार करावा.
अडचणींवर मात करण्यासाठी ईश्वरीय साधना मार्ग प्रशस्त राहील. आपल्या यशकीर्तीसाठी अकारण कोणाचा तोटा होणार याची काळजी घ्या. अविचाराणे बोकाळलेल्या वारूला  संयमित करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करील.

कुंभ : आपल्या संयमाची परीक्षा पहाणारा आजचा दिवस आहे. आपली कामगिरी सत्याची चाड असणारी आणि मालकांसाठी फायदेमंद ठरेल. तरीही फळाची खूप मोठी अपेक्षा ठेवू नका. उद्योजकांसाठी हा काळ प्रगतीचा आलेख वाढवणारा राहील . राजकारणात स्वतःला सावरून रहाणे हिताचे ठरेल. कोणत्याही विषयाची व्यवस्थित पूर्णपणे शहनिशा केल्याशिवाय कोणावरही दोषरोप करू नका .

मीन : पैसा हे एक साधन आहे ते साध्य नाही.  काळाच्या गती बरोबर चालताना जीवन मूल्ये पायदळी तुडवली तर जात नाही ना याबाबत विचार करावा.  अडचणींवर मात करण्यासाठी ईश्वरीय साधना मार्ग प्रशस्त राहील. आपल्या यशकीर्तीसाठी अकारण कोणाचा तोटा होणार याची काळजी घ्या. अविचाराने बोकाळलेल्या वारूला  संयमित करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करील.

Latest Posts

Don't Miss