राशी भविष्य – २३ सप्टेंबर २०२२ – आजचा दिवस आपणासाठी …

आज नवीन विषयाचा अभ्यास सुरु करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रायोगिक तत्वावर काही कामे समोर येत असतील तर त्यास सकारात्मक दुजोरा द्यावा.

राशी भविष्य – २३ सप्टेंबर २०२२ – आजचा दिवस आपणासाठी …

मेष – आज नवीन विषयाचा अभ्यास सुरु करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रायोगिक तत्वावर काही कामे समोर येत असतील तर त्यास सकारात्मक दुजोरा द्यावा. कौटुंबिक जीवनात भौतिक सुखे मिळतील. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, त्याने मन प्रसन्न राहील. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. संततीची काळजी घेणे गरजेचे आहे.

वृषभ – इतरांची चिंता किंवा विचार करण्यात फारसा रस नसेल. आपण आपल्या कामातच आत्ममग्न व्हाल. अकारण काहीतरी चूक झाल्याची मनाला हुरहूर वाटेल. अशाच क्रमाने मन अस्वस्थ राहू शकते. त्यातच कौटुंबिक जबाबदाऱ्या अधिक वाढतील. व्यवसायातून आर्थिक लाभ होतील. तातडीची गरज म्हणून खरेदी करावी लागेल.

मिथुन – आजचा दिवस आपणासाठी अत्यंत लाभदायक आहे. अकारण वेळ दवडू नका. मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न करा. दुर्जनांच्या संगतीपासून दूर रहा. प्रेमी लोकांना प्रेमात यश मिळेल. नोकरीविषयक शुभ समाचार समजतील. न्यालयीन विषयात आपण जमवत असलेल्या साक्षी पुराव्याची आज पूर्तता करू शकाल.

कर्क – तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र फलित देणारा आहे. शक्यतो वादविवाद टाळा. कोणाशीही बोलताना सुसंवादाचा विसंवाद होणार नाही याची काळजी घ्या. मन शांत ठेवा. कामाच्या ठिकाणी यश सन्मान मिळेल. व्यवसायामध्ये वाढ होईल. परिवारातील मंडळींकडून उत्तम सहकार्य देखील लाभेल. मात्र आपण त्यांच्या भावना समजून न घेता अर्थाचा अनर्थ होणार नाही याची काळजी घ्यावी.

सिंह – मोर्चा / आंदोलन/ सभा यासारख्या क्षेत्रात नेतृत्व कराल. सामाजिक स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. कामानिमित्त प्रवास घडेल. आज आपणांस पूर्वजांसाठी व्यक्त केलेल्या कृतज्ञता भावामुळे आत्मानुभूती प्राप्त होईल. आजचा दिवस उत्साह वर्धक राहील.

कन्या – आजचा दिवस आपणांस संमिश्र फळं देणारा आहे. अचानक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. अतिविश्वासाच्या लोकांकडूनही आपणास सहकार्य होणार नाही. शारीरिक कमजोरी जाणवत असल्यास विश्रांती घ्या. भावनेच्या आहारी जाऊन व्यसनाधीनता तर वाढत नाही ना याबाबत सकारात्मक विचार करा.

तुळ – आज तुम्ही केलेलं लेखन प्रभावी ठरेल. विशेषकरून कवी/लेखक/ प्राध्यापकांना उत्तम यश मिळेल. कलाकार मंडळींसाठी आजचा दिवस कलागुणांना संधी देणारा आहे. तुमच्या कर्तृत्वाला यश देणारा कालावधी आहे. समाजामध्ये लौकिक मान सन्मान मिळतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता विषयक विषय ऐरणीवर येतील.

वृश्चिक – आज तुमच्या व्यवहारात अनिश्चततेचे वातावरण बनून राहील. आर्थिक बाबतीत संमिश्र दिवस आहे. जर आपण आजचा दिवस सहनशीलता ठेवून संयमाने राहिलात तर दीर्घकालीन फायदा होईल. तुम्ही हातात घेतलेल्या कामात मन रमेल. नोकरदारांना स्थानांतराची टांगती तलवार भेडसावत राहील.

धनु – अध्यात्मिक वातावरणाने भारावलेला आजचा दिवस तुम्हाला आत्मिक आनंद देईल. अचानक जुने मित्र भेटतील. पित्याकडून लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल. व्यावसायिक हितसंबंध अधिक दृढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होऊ शकेल. तुम्ही जर उच्च पदावर कार्यरत असाल तर तुमच्या पदाची गरिमा वाढेल असे कार्य तुमच्या हातून घडेल.

मकर – आज तुम्ही केलेलं व्यवस्थापन उत्तम असेल. थोड्याफार प्रमाणात मानसिक विचलितपणा जाणवेल. तरीही केलेल्या मेहनतीतून तुम्हाला उत्तम आर्थिक लाभ होतील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्यावर खर्च कराल. आरोग्यविषयक तक्रारी वाढू शकतील. वैद्यांचा सल्ला माना. कर्जाऊ रक्कम परतावा करण्यासाठी दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करा.

कुंभ – तुमच्यासाठी आज अनुकूल दिवस आहे. मनात केलेल्या संकल्पनांना मूर्तरूप प्राप्त होतील. स्वप्ने साकार होतील.बऱ्याच दिवसापासून तळ्यातमळ्यात असलेली महत्वाची कामे आज पूर्ण करा. भागीदारीत जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. मानसिक द्विधा कमी झाल्याने अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

मीन – सामाजिक क्षेत्रात उत्तम लाभ होतील. आज आपण केलेल्या मध्यस्थीतून दीर्घकालीन फायदा होईल. व्यवसाय उद्योगात नवीन लोकांच्या ओळखी होतील. नोकरीत मनाला समाधान देणारी एखादी घटना घडण्याची संभावना आहे. जुने विकार त्रासदायक ठरू शकतात. वैवाहिक जीवनास नजर लागेल. अकारण कोणलाही शब्द देऊन त्यात अडणार नाहीत याची काळजी घ्या.

Exit mobile version