राशी भविष्य २६ऑगस्ट २०२२, भविष्यातील गरज ओळखून गुंतवणूक कराल

राशी भविष्य २६ऑगस्ट २०२२, भविष्यातील गरज ओळखून गुंतवणूक कराल

मेष : उन्नत लोकांचा सहवास लाभेल. भविष्यातील गरज ओळखून गुंतवणूक कराल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. वरिष्ठ पदावर नियुक्ती होऊ शकेल. अन्य कोणाच्याही आर्थिक व्यवहारात न पडणे हिताचे ठरेल. घर बदलीसह योग्य संभवतात. वाहन खरेदी करू शकाल. समाजात तुमच्या भावनांची कदर केली जाईल.

वृषभ : भविष्यातील परिणामांचा सखोल अभ्यास करूनच कोणताही अंतिम निर्णय घ्यावा. व्यवहार सुरळीत झाल्याचा आनंद प्राप्त होईल. सौजन्याने अनेक प्रश्न मार्गी लागतील. न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. सामाजिक स्तरावर नाव लौकिक वाढेल. शस्त्राचा उपयोग करू नये. कुलाचारातील दैवी उपायाने अडचणींवर मत करता येईल. सामोपचाराने सर्वकाही सुरळीत होईल.

मिथुन : दिवसाची सुरुवात आल्हाददायक होत आहे. मनासारखे निर्णय होतील. कामकाजात अपेक्षित पल्ला गाठल्याने समाधान वाटेल.ठोस निर्णयासाठी आग्रही रहाल. किरकोळ आरोपाने विचलित होऊ नका. नोकरी व्यवसायात नवीन टप्पा गाठला जाईल. व्यावहारिक जबाबदारी वाढेल. कलागुणांनां वाव मिळून दूरवर कीर्ती वाढेल.

कर्क : स्वतः: हुन घेतलेल्या निर्णयाबाबत संभ्रम निर्माण होईल . टोकाची भूमिका घेऊ नका. वडिलोपार्जित दोष दुष्परिणामांचा धडा गिरवू शकतात. हळूहळू संभ्रम दूर होईल. कला कौशल्याला न्याय मिळेल. वाणीतील सामर्थ्य काय असते याची प्रचिती येईल. कचरा पाळणे हितकारक ठरेल. नव्या उमेदीने अभ्यासास सुरुवात कराल.

सिंह : अचानक झालेल्या लाभामुळे आनंद प्राप्त होईल. सात्विक मार्गाने मिळालेलं यश समाजात कारात्मक संदेश देऊन जाईल. अचानक खर्चातही वाढ होऊ शकते. व्यवस्थापनात कमी पडू नका. शब्द प्रभुत्वाने समाज मन जिंकाल. व्यावसायिक संधी चालून येतील. गुप्त विकारावर योग्य उपचार घेणं फायदेशीर ठरेल. व्यवस्थापन क्षेत्रात प्रगती कराल.

कन्या : उद्योग धंद्यात आघाडी घ्याल. नवचैतन्याने कामाची गती पकडून ठेवाल. अनेक प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. उधारी वसूल होऊ शकेल. अधिक परिश्रमाने अधिक लाभ उठवता येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवहार सांभाळून करावेत. स्त्रियांसाठी : थोरांचे आशीर्वाद कमी येतील. विद्यार्थ्यांसाठी : कला गुणांना न्याय मिळेल.

तुला : आज अडकून पडलेली कामे मार्गी लागण्यास पुरेसा वाव मिळेल. यशाच्या दिशेने वाटचाल सुरु होईल. उद्योग धंद्यात वाढ होईल. वडिलोपार्जित परंपरांचा मन राखल्याने फायदा होईल. शेती विषयक कामात रस वाढेल. आर्थिक व्यवहारात सुबत्ता येईल. पशुपक्षांची देखभाल करण्यात आनंद अनुभव कराल. आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतील. गणित विषयाचा अभ्यास वाढवा.

वृश्चिक : सामाजिक कार्यात रुची वाढेल. आर्थिक उत्पन्नाचे श्रोत निर्माण होतील .व्यापार व्यवसायात फायदा होईल. नेत्रविकारापासून त्रास संभवतो. कलाक्षेत्रात नावलौकिक वाढेल. प्रदर्शनसारख्या व्यवहारात संधी निर्माण होतील. नव्या उमेदीने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. स्त्रियांसाठी सौजन्य राखणे फायद्याचे राहील. अभ्यासात प्रगती कराल .

धनु : मित्रपरिवारकडून व्यावहारिक संधी उपलब्ध होतील. भागीदारीसारख्या व्यवहारात सहभागी होण्यासाठी चांगला काळ आहे. मनात चलबिचल निर्माण होऊ शकेल. विश्वासास तडा जाईल असे वर्तन घडणार नाही याची काळजी घ्यावी. दिवसाच्या सरतेशेवटी अपेक्षित लाभदायक वातावरण तयार होईल. दूरचे प्रवास करावे लागतील. दैवी मार्गाने अडचणीवर उपाय मिळेल. दुरावा वाढणार नाही याची काळजी घ्यावी. चांगल्या लोकांची साथ मिळेल.

मकर : आईकडील नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. रक्त दोष निर्माण होऊ शकतात. छोटेमोठे ऑपरेशन देखील होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर महत्वाचे निर्णयात सहभागी व्हाल. मित्राकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. खोल पाण्यात जाणे टाळावे. सद्गुरुंच्या आज्ञेचे पालन करावे. टोकाची भूमिका घेऊ नये. गूढशास्त्र ,विज्ञान विषयाचा अभ्यास वाढवावा.

कुंभ : ठरलेले प्रवास रद्द करावे लागतील. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. घरगुती प्रश्न चव्हाट्यावर येणार नाहीत याची काळजी घ्या. हितशत्रूंच्या कारवायापासून सतर्क रहावे. आरोग्यविषयक काळजी घेणे आवश्यक आहे. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील . भागीदारीतील व्यवसाय मध्यम गतीने चालेल. टोकाची भूमिका घेऊ नका. शेतकऱ्यांनी शेती विषयक अभ्यास वाढवावा.

मीन : नवीन व्यवहाराबाबतचे निर्णय तूर्तास लांबणीवर टाकावेत. प्रवासाचे बेत ठरतील. परदेशातील हितसंबंध उपयोगी पडतील. काही प्रमाणात धावपळ वाढू शकेल. अभ्यासात्मक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. गुंतवणुकीसाठी हा काळ फारसा फायदेशीर नाही. पित्त प्रकृती त्रासदायक ठरू शकेल. मनासारख्या घटना घडतील. क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल.

Exit mobile version