Friday, September 27, 2024

Latest Posts

राशी भविष्य – २९ सप्टेंबर २०२२ – आपल्याला ऊर्जा पुरविणारी व्यक्ती …

पारिवारिक सौख्य उत्तम लाभेल. कोणाच्याही आर्थिक व्यवहाराची हमी घेऊ नका . लहान भावंडांकडून काही आदर्श शिकायला मिळतील.

मेष : पारिवारिक सौख्य उत्तम लाभेल. कोणाच्याही आर्थिक व्यवहाराची हमी घेऊ नका . लहान भावंडांकडून काही आदर्श शिकायला मिळतील. तुमची कीर्ती वाढेल. आर्थिक व्यवहारात नियोजन करावे लागेल. संगती संग दोष: हे वचन सिद्ध आहे. आपण कुणाच्या संगतीत वावरत आहोत त्याचे शुभाशुभ परिणाम नक्की मिळणार, त्यामुळे कोणतेही पाऊल टाकताना काळजीपूर्वक टाका . नोकरदारांसाठी फायदा वाढवणारा काळ आहे.

वृषभ : उच्च विचारांची वाढ होईल. मात्र बदलत्या विचार सरणीचा इतर लोक गैर फायदा घेऊ शकतात. आपले मत आणि निर्णयावर ठाम रहा . आप्तेष्टांचे सहकार्य लाभेल. नेत्र विकारापासून त्रास वाढू शकतो. कामानिमित्त ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचे नियोजन ठरू शकते. वाणीतून अमोघ शब्दांचा वर्षाव करू शकाल. शब्द सामर्थ्य वाढेल . साहसी निर्णय घ्याल. केवळ ऐकिवातील गोष्टीवर विश्वास ठेवू नका . विशेषतः: अप्पर पदाच्या लोकांकडून मानहानी होण्याची शक्यता आहे.

मिथुन : आर्थिक व्यवहाराबाबत व्यवस्थापन आवश्यक आहे. उधार देऊ नका आणि घेऊही नका . कोणत्याही व्यवहारात गुप्तता राखणे हिताचे ठरेल. येऊ घातलेल्या संकटांवर मार्ग निघेल. आपल्या कला कौशल्याने त्यावर सहज मत कराल. शेतकऱ्यांसाठी अत्यन्त दिलासादायक काळ आहे. अन्नधान्याची भरभराट होईल. शेती विषयक कोणतेही काम करताना उत्साह वाढेल. भावंडांच्या संगोपनाची जबाबदारी वाढू शकेल.

कर्क : नव्या उमेदीने कामाला लागाल . आपल्याला ऊर्जा पुरविणारी व्यक्ती भाग्योदयाच्या वाटेतील मैलाचा दगड बनेल. योग्य संधीचा फायदा घेण्याची तसदी घ्या. खर्चाचे प्रमाण वाढेल. अकारण होणाऱ्या दोषारोपामुळे मानसिक संतुलन ढळण्याची शक्यता आहे. व्यसनाधीनतेकडे वळत तर नाही ना याबाबत सतर्क रहा. चतुष्पाद प्राण्यांच्या खरेदी विक्रीत फायदा होईल. शेतीतील उत्पादनाच्या सुरक्षेची काळजी घ्या. पारंपरिक उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करा.

सिंह : अधिकार प्राप्तीचे योग आहेत. पदोन्नती – पगारवाढ यासारख्या समाधानकारक गोष्टी घडायला सुरुवात होईल. परदेशातील व्यवहार सुरळीत होतील . कामकाजासाठी प्रवास करावा लागेल. स्वधर्मावर निष्ठा वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक येणाऱ्या जबाबदाऱ्या सहज पेलवू शकाल. नवा कीर्तिमान स्थापित करू शकाल. काही अप्रिय घटना कानावर येऊ शकतात. गुडघे दुखीचे विकार त्रासदायक ठरतील.

कन्या : भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अचूक क्रम मांडू शकाल. त्यातून परिवर्तनही दिसून येऊ लागेल. काही मंडळी दबाव तयार करण्याचा प्रयत्न करतील मात्र सर्व कुविचारांवरआपल्या सद्विचारांनी मात करू शकाल. समाजामध्ये आपल्याबद्दल आदरभाव निर्माण होईल. पीडितांना न्याय मिळवून द्याल. राजदरबारात सन्मानित केले जाईल. आपण आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून सामाजिक घडी सुस्थितीत आणण्यासाठी केलेले प्रयत्न प्रभावी ठरतील.

तूळ : गेल्या आठवड्यातील मनोव्यथेचा भार काहीसा हलका होईल. तापाचा विकार उद्भवण्याची शक्यता आहे. धर्माचरणाने अनेक संकटांवर मात करण्याची ऊर्जा प्राप्त होईल. आपल्या हातून सत्कर्म घडेल. योग्य ठिकाणी दानधर्म करण्याची मानसिकता तयार होईल. दुसऱ्याच्या कामाच्या जबाबदाऱ्या पडतील . राजाश्रय मिळेल. नोकरदारांना वरिष्ठाकडून सन्मानाची वागणूक मिळेल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावी .

वृश्चिक : विवाह इच्छूकांसाठी आनंददायी काळ आहे. नववराला साजेशी वधू तर नववधूला साजेसा वर प्राप्त होऊ शकेल. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील . आरोग्यविषयक तक्रारी चालूच रहातील. मनाला वेदनादायक घटना ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. शक्यतो वाहन चालवणे टाळा . धार्मिक सण व्रतामध्ये सहभागी व्हाल. पारंपरिक व्यवसायातून आर्थिक लाभ होतील.

धनु : मामा- मावशी किंवा आजोळचे नातेवाईक सहकार्य करतील. शरीर पीडा मानसिक चलबिचल वाढवणारी ठरेल. कोणाशीही अकारण शत्रुत्व वाढवून घेऊ नका. स्थानांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय क्षेत्रात अधिक जबाबदाऱ्या वाढतील. ”अन्न तारी अन्न मारी” या म्हणीची आठवण ठेवून संतुलित आणि सकस आहार घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मित्रपरिवाराच्या भेटीगाठी होतील.

मकर : विद्यार्थ्यांसाठी अत्यन्त सकारात्मक वातावरण तयार होईल. नवीन पद्धतीचा अभ्यासक्रम सुलभतेने हाताळाल. संतती विषयक समस्या दूर होतील.
लेखक -पत्रकार मंडळींकडून समाजाला पोषक लेखन घडून येईल. काही प्रमाणात पोटाच्या विकाराने मनाला उद्विग्नता येऊ शकते. जलमार्गाने केलेल्या प्रवासातून लाभ होईल. विवाह इच्छूकांसाठी योग्य स्थळ येण्याची शक्यता आहे.

कुंभ : मातृ देवो भव: या वैदिक सूत्राचा प्रत्यक्ष उपयोग जीवनात कराल. आई हे महान दैवत आहे हा आदर्श समाजापुढे जाईल असे कार्य आपल्या हातून घडेल . चतुष्पाद प्राण्यांच्या देखभालीविषयी जागरूक रहावे. वाहन खरेदी करताना भविष्यातील साद पडसादाचे अवलोकन करूनच पाऊल उचलावे.
संततीच्या कर्तृत्वाने आत्मिक समाधान लाभेल. विविधांगी वाचनाची आवड वाढेल . तीर्थयात्रा आदींचे प्रसंगवर्णन उत्तमप्रकारे करू शकाल.

मीन : आपण वर्षानुवर्षे घेतलेल्या अथक परिश्रमाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग होईल. स्वकर्तुत्वाने मोठे होण्याबद्दलचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. साहसी खेळ -योगशास्त्र याविषयातील स्वारस्य वाढेल. नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी करीत असलेले प्रयत्न यश मिळवून देतील. वयोवृद्ध मंडळींनी प्रकृतीची काळजी घेण्याची अत्यन्त आवश्यकता वाटते. शारीरिक विकारावर मात करण्यासाठी भगवान महामृत्युंजयाची साधना केल्याने संकटांवर मत करण्यात यश मिळेल. जमिनीपासून फायदा होईल.

हे ही वाचा:

‘देवदूत बस घोटाळाप्रकरणी’ मोठा खुलासा, लाखांची बस केली करोडोत खरेदी, फडणवीसांनी घेतली दाखल

पीएफआयवर बंदी घालण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही- असदुद्दीन ओवैसी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss