राशी भविष्य २६ सप्टेंबर २०२२, आज तुमच्या जीवनातील मोठ्या निर्णयाचा दिवस आहे

राशी भविष्य २६ सप्टेंबर २०२२, आज तुमच्या जीवनातील मोठ्या निर्णयाचा दिवस आहे

मेष : क्रीडा क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस लौकिक वाढवणारा आहे. आपला कीर्तीचा आलेख वाढेल. सामाजिक तसेच कौटुंबिक स्नेह टिकवणे हि तुमच्या जीवनासाठी साठी अत्यन्त महत्वाची बाब आहे. शेती करणे किंवा वृक्षाची लागवड करणे यासारखे विषय मनाला आनंददायी ठरतील. शाब्दिक वाद टाळण्याचा प्रयत्न करा.

वृषभ : तुम्ही आज उदात्त अंत:करणाने केलेलं कार्य समजात तुमच्याबद्दल आदर वाढविल. अर्थार्जनासाठी समोरून संधी चालून येतील परंतु तयारी इष्टानिष्ट काय ते विचारकरूनच त्या व्यवहारात पाऊल टाका. मित्रमंडळीसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल, वाहन चालविताना खूप काळजी घ्या. विचलितता वाढू नये म्हणून काळजी घ्या.

मिथुन : आपण आपल्या सद्गुणांना सामान्यांसाठी मुक्त केल्यास तो एक समाज उपयोगी कार्यक्रम ठरू शकतो. कोणत्याहि प्रसंगाला सामोरे जाताना जास्त हळवेपणा कामाचा नाही. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. व्यवहारात पारदर्शकता ठेवा. विद्यार्थी-विद्यार्थिनींना अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

कर्क :  तुमची कामाची पद्धत इतरांना हेवा वाटेल अशी असेल. स्वतःहून केलेले प्रयोग यशस्वी होतील. तुमचे क्षितीज व्यापक बनेल – तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मन सुखावेल. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर, आज तुम्हाला पैश्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल.

सिंह : तुम्ही स्वीकारलेल्या व्यसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न आणि कौटुंबिक जीवनातील जरुरी या बाजू पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत हि बाब तुम्हास आज अग्निपरीक्षेचे दिव्य परीक्षा द्यायला भाग पडेल. अनुभवी किंवा तज्ज्ञ लोकांचा सहवास लाभेल. अश्या स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या.

कन्या : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन त्यांच्या सकारात्मक परिणामांचा अनुभव घ्या. जीवनातील अडचणीच्या वेळी बचत केला पैसा तुमच्या कामी येईल म्हणून, आज पासूनच आपल्या पैश्याची बचत करण्याचा विचार करा. दैवी उपासनेने आत्मिक बळ वाढेल. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या.

तुला : त्रयस्थ व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल. कौटुंबिक जीवनात काही समस्या उदभवू शकतात. कौटुंबिक जबाबदा-यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कुटुंबाच्या रागाला आमंत्रण देण्यासारखे आहे. भावनिक होऊन अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आपले मन द्विधा मनस्थितीत राहील.

वृश्चिक : आज तुमचा वेळ सत्कारणी लागल्याने तसेच दैवी अनुभूतीने मन प्रसन्न होईल. तुम्हास आज तुमच्या जवळची व्यक्ती महत्वपूर्ण सल्ला देऊ शकेल. त्याने दिलेला हा सल्ला जीवनाचा कायापालट करणारा असेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. घर शेती यांच्या वाटण्याचा विषय चर्चेला येऊ शकेल.

धनु : नावीन्य पूर्ण विषय हाताळण्याबाबत रुची वाढेल. आज विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याबद्दल विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

मकर :तुमच्यासाठी मनाप्रमाणे स्थळ येईल. जवळच्या व्यक्तीच्या मध्यस्थीमुळे मनस्ताप वाढू शकेल. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला उच्च पातळीवर नेण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबाच्या बाबतीत सर्व काही सुरळित असेल,

कुंभ : आज मिळालेले शिक्षण जीवनाची दशा आणि दिशा बदलविणारे असेल. आज तुमच्या जीवनातील मोठ्या निर्णयाचा दिवस आहे. तुम्ही करीत असलेली स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल.

मीन : तुमच्याबद्दल सामाजिक विश्वासार्हता वाढेल. तुमच्या शब्दाखातर अनेक लोक सहकार्य करण्यास प्रवृत्त होतील. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. जुने येणे बाकी असंल्यास त्याबाबतीत आज सफलता प्राप्त होऊ शकेल. मात्र त्यासाठी प्रयत्न देखील करायलाच हवेत. मनाला समाधान मिळून आत्मविश्वास देखील वाढेल.

Exit mobile version