राशी भविष्य – १ ऑक्टोबर २०२२ – मित्रांचा आधार…

आपल्यासंपर्कातील लोकांच्या सहाय्याने उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. आवडीनिवडी असलेल्या व्यक्तींसोबत तुमची भेट घडेल.

राशी भविष्य – १ ऑक्टोबर २०२२ – मित्रांचा आधार…

मेष : आपल्यासंपर्कातील लोकांच्या सहाय्याने उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. आवडीनिवडी असलेल्या व्यक्तींसोबत तुमची भेट घडेल. आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देऊ शकतात. आज तुमचा आत्मविश्वास कमजोर राहू शकतो. याचे कारण तुमची खराब दिनचर्या आहे.

वृषभ : आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. कोणाच्याही हेतूबद्दल शंका घेऊ नका, कदाचित त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेण्याची, सहानुभूतीची गरज असू शकते. एकटेपणा बऱ्याच वेळा चिंतेचा राहू शकतो. आपल्या मित्रांसोबत थोडा वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करा.

मिथुन: नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे नवीन अर्थपुरवठा होईल. घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष होणार नाही याबाबत काळजी घ्या. आजचा नवीन दिवस खरेदी करण्यासाठी उत्तम आहे.

कर्क: कल्पनेतील जग प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अधिक मेहनतीची गरज आहे. आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काही तरी करणे गरजेचे आहे. मोठ्यांचे आशीर्वाद कामाला येतील. योग्य मार्गदर्शन लाभेल.

सिंह : ध्यानधारणेने आत्मशांती लाभू शकेल. आप्त स्वकीयांसाठी मध्यस्थी करावी लागेल. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जातील याबाबत सतर्क असावे. दुर्जनांचा संग टाळण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांसाठी पदोन्नती किंवा बदलीचे योग संभवतात.

कन्या : पारिवारिक स्नेह संबंध टिकवून ठेवणे परंपरांचा सन्मान राखणे अशा विषयात अधिक रस वाढेल. आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता आहे. जुने येणे वसूल होऊ शकेल. आत्मिक समाधान लाभेल.

तुळ: आल्हाददायक वातावरणाचा सुखद अनुभव प्राप्त कराल. मौजमजा कराल. अकारण वाढणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. जवळचे प्रवास घडून येतील. विवाह इच्छूकांसाठी आजचा दिवस गोड बातमी देणारा ठरेल.

वृश्चिक : प्राकृतिक कारणाने अस्वस्थता जाणवेल. वैद्यकीय उपचाराने बरे वाटेल. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुमची आर्थिक चिंता वाढू शकते. व्यसनाधीनतेपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा. अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता आहे.

धनु : शब्दांचा गैर अर्थ घेऊन आपण केलेल्या मेहनतीला निरस्त करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेविषयी चर्चा घडून येण्याची शक्यता आहे. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल.

मकर: आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उत्तम दिवस आहे. सिनेमा पहाणे , नयन रम्य स्थळांच्या सहलीचे नियोजन करण्यात वेळ दवडला जाईल .

कुंभ : मित्रांचा आधार मिळेल. व्यापारात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागणे शांततेला मारक ठरू शकते. तुमच्या उणिवा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहेत त्यामुळे पोकळ आत्मविश्वासाने शब्दाचे खेळ करणे टाळा.

मीन : अतिशय प्रभावी व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य उंचावेल. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घ्या. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे. परंतु, आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्या जवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल.आपल्या सामर्थ्य पेक्षा जास्त काम करणे तुमच्यासाठी नुकसानदायक सिद्ध होईल .

Exit mobile version