Tuesday, October 1, 2024

Latest Posts

राशी भविष्य – ११ ऑक्टोबर २०२२ – शिक्षण विषयात तुमची कल्पकता

आज तुम्ही अत्यन्त भावुक व्हाल. मनाचा अस्वस्थपणा तुमच्या दैनंदिन कामकाजात अडथळा बनू शकेल. नकळत व्यसनाधीनता वाढण्याची शक्यता वाटते.

मेष: आज तुम्ही अत्यन्त भावुक व्हाल. मनाचा अस्वस्थपणा तुमच्या दैनंदिन कामकाजात अडथळा बनू शकेल. नकळत व्यसनाधीनता वाढण्याची शक्यता वाटते. अशा विषयाच्या मोहापासून स्वतःला सावरले पाहिजे. प्रेम, सहानुभूती आणि आदर या गोष्टी तुम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटतील. आपण आज फक्त निरीक्षक म्हणून भूमिका बजावली तर ते हिताचे ठरेल.

वृषभ : आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही कष्टाळू असून आज सकारात्मक आणि योग्य निर्णय घ्याल. प्रेमाविषयी तुमचा दृष्टीकोन भावनिक राहील. तुम्ही मोठ्या पदावरील जबाबदारीच्या जागेचा पदभार स्वीकाराल आणि यशस्वी व्हाल. तुमचा स्वभाव शांत असला तरी स्वतःच्या मनाशी तडजोड करणार नाहीत.

मिथुन :आज तुम्ही अतिशय हळवे बनून फार लवकर मनातून अस्वस्थ व्हाल. कोडे सोडवणे, लॉटरी खेळणे या सारख्या विषयात आजचा दिवस व्यस्त राहील. जुगारापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. स्वतःच्या वयापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींकडे तुम्ही आकर्षित व्हाल. संख्यात्मक प्रगतीपेक्षा गुणात्मक प्रगतीकडे विशेष लक्ष द्यावे.

कर्क : तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही समाजप्रिय बनाल . तुम्हाला नाविन्याची आवड असल्याने तसेच प्रवासाची आवड असल्याने पुढील काही काळासाठी अशाठिकाणी रहाणे पसंद कराल. विनाकारण काळजी करण्याच्या स्वभावामुळे तुम्ही दुःखी कष्टी व्हाल. दैवी विषयावरील तुमचे चिंतन मनन तुम्हाला तारक ठरेल.

सिंह : मित्रपरिवारासाठी वेळ द्यावा लागेल. भाषण करणे / ऐकणें , लेख लिहिणे , रेडिओ/टीव्ही मालिका लेखन यांची तुम्हाला आवड निर्माण होईल. तुम्ही इतरांच्या सूचनांप्रमाणे कृती केली तरी स्वतःच्या कौशल्याने त्या विषयाला न्याय द्याल. आजचा दिवस परोपकारासाठी खर्ची होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनाशी संबंधीत विषयात संवेदनशीलता ठेवावी.

कन्या : तुमच्या अंगच्या गुणाने इतरांना तुमचा सहवास प्रेरणादायक वाटेल. तुमच्या बोलण्यात आकर्षकपणा राहील. वैवाहिक विषयी निर्णय घ्यायला आजचा दिवस अनुकूल राहील. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार कराल. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील. पारखण्याची तुमची बुद्धिमत्ता आज कामी येईल.

तूळ : रेंगाळलेल्या कामांना गती देण्याचा प्रयत्न कराल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. शास्त्राघातापासून स्वतःचे संरक्षण कसे होईल याबाबतीत काळजी घ्यावी. अपघाताची शक्यता असल्याने कोणताही अतीताईपणा टाळावा. आर्थिक व्यवहारात सहजता येईल. तुमच्यावर विश्वास टाकणाऱ्या मंडळींचा सहवास लाभेल.

वृश्चिक : तुम्ही बुद्धिमान, तल्लख, आणि शास्त्राची आवड असणारे आहात. आजचा दिवस सत्संगात जाईल. चांगले आणि वाईट यामध्ये तुम्ही उत्तम प्रकारे फरक समजू शकाल. आपण स्वीकारलेला मार्ग जीवनाच्या वाटेवर सफलतेकडे घेऊन जाणारा असेल. न्यायालयीन कामकाजात तुमची बाजू वरचढ ठरेल.

धनु : तुम्हाला कायद्याचे पालन करणे बाबत संवेदनशील असाल. तुमचा स्वभाव कल्पनारम्य आणि उत्साही तसेच ममताळू आणि स्वातंत्र्यप्रिय देखील बनेल. सतत कार्य मग्न राह्ल्याने अनेकविध विषयाचा अभ्यास देखील वाढेल. इतर लोक तुमच्यातील विनम्रता आदि गुणवैशिष्ट्यांचे कौतुक करतील. इतरांसाठी केलेल्या मदतीचा फायदा तुमचा लौकिक वाढण्यात मदतगार ठरेल.

मकर : आपण आपली महानता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. आजचा दिवस जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या श्लोकाचे स्मरण ठेवावे. तुमचे अधिकार अबाधित रहातील तसेच अनेक जबाबदाऱ्या देखील वाढतील. मात्र त्यामानाने आर्थिक उन्नती साधता येणार नाही. आपण जर बांधकाम व्यावसायिक असाल तर आज नवीन ग्राहकांशी हितसंबंध जोडले जातील.

कुंभ : वरिष्ठाकडून मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. आज तुमचे मन प्रसन्न राहील. बऱ्याच काळापासून करीत असलेल्या मेहनतीला न्याय मिळाल्याचा आनंद साजरा कराल. जमिनीचे व्यवहार सुरळीत होण्याचा आजचा दिवस आहे. शिक्षण विषयात तुमची कल्पकता उपयुक्त ठरेल. ध्यान-उपासना-पूजन यासारख्या विषयी श्रद्धा दृढ होईल.

मीन : आज कोणतेही पाऊल उचलताना काळजीपूर्वक उचला. तुमच्या शब्दाचा गैर अर्थ काढला जाऊ शकतो. देणेकरी पैशासाठी तगादा लावू शकतात. अकारण खर्च किंवा पूर्वी केलेली पैशाची युद्धपळपट्टी आज तुमच्या मनस्तापाचे कारण बनू शकेल. बाजारात गुंतवणूक करताना काळजीपूर्वकच करा. विरोधकांचे नामोहरम करू शकाल.

Latest Posts

Don't Miss