राशी भविष्य – ५ नोव्हेंबर २०२२ – आज कोणत्याही विषयावर बोलताना…

स्फोटक वक्तव्य टाळावेत. आज कोणत्याही विषयावर बोलताना तोलामोलाचे बोलणेच हिताचे राहील. शस्त्रापासून दूर रहावे. डोकेदुखी सारखे विकार असतील तर त्यासाठी तज्ज्ञ वैद्याचाच सल्ला घ्यावा.

राशी भविष्य – ५ नोव्हेंबर २०२२ – आज कोणत्याही विषयावर बोलताना…

मेष : स्फोटक वक्तव्य टाळावेत. आज कोणत्याही विषयावर बोलताना तोलामोलाचे बोलणेच हिताचे राहील. शस्त्रापासून दूर रहावे. डोकेदुखी सारखे विकार असतील तर त्यासाठी तज्ज्ञ वैद्याचाच सल्ला घ्यावा. संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, सुरक्षा रक्षक अशा मंडळींनी आजच्या दिवशी अत्यंत चाणाक्ष बुद्धीचा वापर करण्याची आवश्यकता आहे. तेलाचे व्यापारी – कारखानदार अशा ठिकाणी अग्निभय संभवते.

वृषभ : तुमच्यात आज सौजन्यशिलता वाढेल. मनात अपराधीकभावना जागृत होऊ शकते. उपजत कलागुणांना संधी प्राप्त होऊ शकेल. तुमचे धैर्य तुम्हाला आदर्श जीवन पद्धती जगण्यासाठी प्रेरित करील. शैक्षणिक क्षेत्रात कलाकौशल्याला वाव मिळेल. विद्यार्थ्यांना दिलेले शिक्षण त्य्नाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यास मदतगार ठरेल.

मिथुन : व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. उद्योग व्यवसायात तेजी राहील. भविष्यात घडणाऱ्या चढ उताराचा अंदाज बांधता येईल. तुमच्या मनस्थितीत उत्तमप्रकारे परिवर्तन घडून येईल. पित्तप्रकृतीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवहारात भावनिक बनणे धोक्याचे संकेत आहेत हीबाब ध्यानात ठेवणे हिताचे ठरेल.

कर्क : आज तुमचे मन कल्पनाविलासात रमेल. अनेक काम पूर्ण करण्याबाबतचा कयास लावाल मात्र कल्पना करणे आणि प्रत्यक्ष कृती यात फरक असतो ही बाब ध्यानात असणे गरजेचे आहे. इतरांबाबत मनात शंका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. विश्वासघातकी गुणांची वृद्धी होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. अन्नातून विषबाधा संभवते. तेलकट पदार्थ खाण्याचा छंद त्रासदायक ठरू शकेल.

सिंह : आजचा दिवस कामाची गती मंदावलेली अनुभवायला मिळेल. अतिविश्वास घातक ठरू शकेल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. पितापुत्रांमधील वाटाघाटी असफल ठरतील. दत्तक जाणेबाबत सकारात्मक संकेत मिळतील. लॉटरी किंवा तत्सम क्षेत्रातून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनाठायी पैसे खर्च होणे किंवा परतावा न होऊ शकणारे व्यवहार टाळणे हिताचे ठरेल.

कन्या : भौतिक कारणांनी आपल्या प्रगतीचा वेग जरी मंदावल्याने जाणवत असले तरी तुमचे मित्र – सहकारी यांच्या सहयोगाने तुम्ही समाधानी व्हाल. वैवाहिक जीवनात आनंद देणाऱ्या गोष्टी घडतील. भागीदारीतील व्यवसायात फायदा होईल. पोट दुखीचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जबाबदारीस सक्षमपणे पूर्ण करण्याचा प्रयास कराल.

तुळ : तुम्ही आज अधिक भावनिक बनाल. कोणाच्या तरी साध्याबोलण्याने देखील आपले मानसिक संतुलन ढळू शकेल. इतरांच्या हेवेदाव्यात आपला कामाचा महत्वपूर्णवेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. आपण आजच्या दिवशी एक उत्तम सल्लागार म्हणून देखील भूमिका पार पाडू शकाल. पित्ताचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.

व्रुश्चिक : आज अनेक कामात प्रगती दिसून येईल. उत्पन्न वाढीसाठी केलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळून नवीन आर्थिक श्रोत निर्माण होतील . छोट्यामोठ्या अपघाताची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घेणे गरजेचे आहे. चुकून वापरलेल्या वाक्प्रचाराचा गैर अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे मोजक्या शब्दात आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करा.

धनु : स्वकतृत्वाने उभारलेल्या डोलाऱ्यास कोणीतरी सुरुंग लावण्याचा प्रयत्न करील. तुमच्या कामाच्या शैलीवर काहीप्रमाणात अपवाद देखील लागू शकेल. तुम्ही उत्तम मार्गदर्शक असल्याने अनेक विषयाच्या शंका निरसन करू शकाल. विद्यार्थ्यांना त्याचा पूर्ण लाभ मिळू शकेल. विज्ञान विषयी काही संशोधन करीत असाल तर त्यात प्रगती दिसून येईल.

मकर : आपल्या जबाबदाऱ्या आपणच कशा पार पाडू शकू यासाठी प्रयत्नशील रहाल. जवळच्याच व्यक्तीवर अवलंबून रहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. वडिलोपार्जित स्थावर इस्टेटीच्या वाटाघाटी सफल होऊ शकतील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्यासाठी प्रयत्नशील असाल तर तुम्हाला दिलासादायक बातमी ऐकायला मिळेल.

कुंभ : सामाजिक जबाबदारी म्हणून अनेक ठिकाणी स्नेह वर्धन करताना आर्थिक बोजा देखील सहन करावा लागेल. आज जर आर्थिक देणे घेणे केले तर हा व्यापार नुकसानीचा ठरू शकतो. कोणतीही गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करावी. जुने वाहन खरेदी केल्याने मनस्ताप सहन करावा लागेल. किडनी सारखे विकार असल्यास शस्त्रक्रिया करावी लागेल.

मीन: आज आपणास इतरांसाठी काहीतरी करावे असा भाव निर्माण होईल. कृतिशील बनाल. छोट्याकरणाने विवाद वाढणार नाही याची काळजी घ्या. तुही केलेले लेखन प्रभावी ठरू शकेल. विद्यार्थ्यां निबंध लेखन किंवा तत्सम विषयात केलेला अभ्यास एक उत्तम संधी ठरू शकेल. सांगोपांग विषयावर अधिक विश्वास न ठेवता आपण प्रत्यक्ष अनुभवाचा वापर करणे श्रेयस्कर ठरेल.

हे ही वाचा :

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत शरद पवार सहभागी होणार ?

Marathi Rangbhumi Din 2022 : मराठी रंगभूमी दिनी नाट्यरसिकांना मनोरंजनाची मेजवानी; जाणून घ्या कोणत्या नाट्यगृहात कोणते नाटक…

Gujarat Elections 2022 : गुजरात विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version