spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य ६ जुलै २०२२

मेष – व्यावसायिक उद्दीष्टे गाठण्यासाठी आपली ऊर्जा योग्य प्रकारे वळविण्यास अत्यंत योग्य काळ आहे.  तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. कोणताही आर्थिक व्यवहार करताना जपून पाऊल उचला.
 वृषभ – तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. आजच्या दिवशी नवे मित्र जोडले जातील.  घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणावाचे मळभ असेल.
 मिथुन – तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल.  तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे कठीण होऊन बसेल.
 कर्क – आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील.
 
सिंह– आरोग्याच्या भल्यासाठी उगा त्रागा करु नका. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा.  चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी.
 कन्या – असे काम करा कीं,  ज्यामुळे तुमची मिळकतीची क्षमता वाढू शकेल. अनपेक्षितपणे गोड बातमी समजल्याने तुमचा उत्साह वाढेल. तुमचया कुटुंबातील सदस्यांना ही बातमी सांगून तुम्ही आनंद द्विगुणित कराल. आज तुमच्या कामाची आज स्तुती होईल.
 तूळ – प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडी मुक्ती मिळेल.  सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक स्थिती सुधारेल.
  वृश्चिक – आज तब्येत एकदम उत्तम असेल.  इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल.
 धनु – अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. मित्रांच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील.  कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल.
 मकर –  पैशांची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील.  तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. तुमच्या मेहनतीचे चीज होऊन तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे.
 कुंभ – उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खासकरून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा.
 मीन – आपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. अधिक काही खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील.
 –  रविंद्र भगवान पाठक गुरुजी ठाणे ८१०८२६६६७२

Latest Posts

Don't Miss