spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य – 7 August 2022

मेष: आजचा दिवस अनिश्चिततेचा आहे. तुम्ही तुमच्या मतावर ठाम भूमिका घेतली पाहिजे. आपण आपले आर्थिक गणित बिघडु नये यासाठी काळजी घ्यावी.

वृषभ : आज तुमचे मित्र तुम्हला उपयोगी पड़तील. पति पत्नी मधील स्नेह वाढेल. तुम्ही तुमच्या संकल्पनेला मूर्त रूप देऊ शकाल. अचानक उद्भवलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न करा.

मिथुन: आज‌ वेळेचा‌ अपव्यय होण्याची शक्यता आहे. बदलत्या काळानुसार बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा. खर्चाचे अंदाजपत्रक चुकू शकते. घडत आलेल्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

कर्क : उपासना मार्गाने अडचणींवर मात करू शकाल. आज तुम्ही सुंदर काव्य करू शकाल. थोरा मोठ्यांचे अनमोल मार्गदर्शन मिलेल. वडिलोपार्जित स्थावर मालमतेच्या वाटाघाटी करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

सिंह :  कुटुंबातील व्यक्तिच्या जबाबदार्या घ्याव्या लागतील. आज कामकाजात महत्वपूर्ण योगदान द्यावे लागेल। तीर्थ यात्रा घडून येतील. नामस्मरण केल्याने आत्मबल वाढेल. क्रीडा क्षेत्रात नवा कीर्तिमान स्थापित कराल.

कन्या : बरयाच कालापासून प्रतीक्षेत असलेली कामे प्रगतिकडे वाटचाल करतील. भाग्योदयातील अड़चनी देखील दूर होतील. परदेशातुन अपेक्षित संदेश प्राप्त होऊन दिलासा मिलेल. भावांची अपेक्षित साथ मिलेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

तुळ : जवळच्या नातेवाईकांच्या आरोग्याची कालजी घ्यावी. अपघात भय संभवते. आर्थिक गुंतवनुकिसाठी आजचा दिवस उत्तम आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या कामकाजास सुरुवात होऊ शकेल. आपल्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या प्रकल्पांना सामाजिक स्तरांवर मान्यता प्राप्त होईल. विशेषतः शेती विषयक केलेली संशोधन लोकोपयोगी ठरतील.

वृश्चिक: कोणीतरी वापरलेल्या धक्का तंत्रामुळे मानसिक कमजोरी निर्माण होईल. रक्तदाब किंवा मांसपेशींच्या संबंधीत विकार वाढण्याची शक्यता आहे. वयोवृद्ध मंडळींनी आरोग्यविषयक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मित्र परिवाराकडून अपेक्षित सहकार्य मिळाल्याने कमीअधिक प्रमाणात दिलासादायक स्थिती निर्माण होईल.

धनु : आपला स्वभाव अधिक भावनिक बनण्याची शक्यता आहे। आप्तेष्ट मंडळींसाठी केलेले कार्य सन्मान वाढवणारं ठरेल. या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या घेतलेले कोणतेही निर्णय नुकसानीचा सौदा ठरण्याची शक्यता आहे. विविध खाद्य पदार्थाविषयी आवड निर्माण होईल। समाज मनावर अधिराज्य गाजवाल.

मकर : आपण आपल्या कामाबद्दल केलेली वाच्यता घातक ठरण्याची शक्यता आहे. छोटी चूक सुद्धा मोठे दुष्परिणाम देण्याची शक्यता नाकारता येत नाही. परदेशातील हितसंबंध सांभाळून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य प्राप्त होईल.

कुंभ : राजकीय क्षेत्रात सन्मान प्राप्त होऊन पदभार दिला जाऊ शकतो. विजयश्री प्राप्त करू शकाल. पारिवारिक स्नेहसंबंध सुधारतील.  मोठी गुंतवणूक करू शकाल.  मात्र तेल, इमारत निर्माण या क्षेत्रात गुंतवणूक करणे टाळावे. इतरांना केलेले मार्गदर्शन त्याच्या जीवनात परिवर्तन करणारे ठरेल.

मीन: धर्म जागृति सारख्या विषयासाठी वेळ द्याल. अन्नदान अथवा लोकोपयोगी कार्यात खर्च कराल. आत्मिक शांति साठी विविध उपाय योग -याग-नामस्मरण यासारख्या गोष्टीकडे कल वाढेल. मंदिर जीर्णोद्धार अथवा समाज मंदिराच्या निर्मिती सारखे विषयांत रस निर्माण होईल. आपल्या कामातील सहकारी मित्रांचे अनमोल सहकार्य लाभेल.

Latest Posts

Don't Miss