spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य, दिनांक १८ जानेवारी २०२३, तुमचा मित्र परिवार तुम्हाला संकटसमयी…

आज आपण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायलाच हवे. कोणत्याही प्रकारच्या शाश्त्रास्त्राचा वापर टाळावा. महिलांनी जळणे भाजणे यासारख्या घटनांपासून स्वतःचा बचाव होण्यासाठी सावध पवित्र घेण्याची आवश्यकता आहे.

ज्यो. श्री रविंद्र भगवान पाठक , गुरुजी, ठाणे.

मेष : आज आपण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायलाच हवे. कोणत्याही प्रकारच्या शाश्त्रास्त्राचा वापर टाळावा. महिलांनी जळणे भाजणे यासारख्या घटनांपासून स्वतःचा बचाव होण्यासाठी सावध पवित्र घेण्याची आवश्यकता आहे. आज आगजनीच्या घटना देखील घडू शकतात. सीमेवर संरक्षण करणाऱ्या बांधवानी सतर्कतेन पाऊल उचलण्याची गरज वाटते.
स्त्रीयांसाठी: स्फोटक वक्तव्ये टाळावीत.

वृषभ : तुमचा मित्र परिवार तुम्हाला संकटसमयी मदतीस धावून येईल. काही भावनिक नातेसंबंध जपताना मन दुखावली जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करायला हवा. हॉटेल व्यावसायिकांसाठी आजचा दिवस अत्यन्त लाभाचा आहे. स्त्रीपुरुषामधील मतभेद चव्हाट्यावर येऊ नयेत यासाठी काळजी घ्यायला हवी. बौद्धिक पातळीवर महत्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील.
स्त्रीयांसाठी : तुमच्या भावनांशी खेळले जाऊ शकते.

मिथुन : आजच्या दिवसात तुम्हाला न्यायिक भूमिका निभवावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत तुमच्या पदाची ग्रिम कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. व्यावहारिक बाबतीत आज तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकेल. राजदरबारात तुमचे चारित्र्य हनन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्रदयविकार असलेल्यांची त्वरित वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे.
स्त्रीयांसाठी टोकाची भूमिका घेऊ नका.

कर्क : आजचा दिवस प्रत्येक पाऊल सांभाळून टाकण्याचा आहे. कुणाचीही मध्यस्थी बिलकुल करू नका. तुमची वक्तव्ये प्रसार माध्यमासाठी ठळक घडामोडी ठरू शकतात. तुमच्या भाग्यातील गोष्टी तुम्हाला सजतेने प्राप्त होतील. न्यायालयीन कामकाजात प्रगती दिसून येईल . काही प्रकरणात निकाल सुद्धा लागू शकेल. तुमच्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ पदावरील अधिकारी तुमच्या बाबतीत अनुकूल रहातील.
स्त्रीयांसाठी : अनेकांचा सल्ला तुम्हाला मानसिक संतुलन बिघडवणारा ठरू शकेल.

सिंह: पितापुत्रांमधील संवाद इष्ट ध्येयप्राप्तीकडे घेऊन जाणारा असेल. नवनवीन विषयात रस घेऊन ते समर्थपणे पेलवण्याची हतवटी तुमच्यात निर्माण होईल. तुमच्या वरिष्ठाना तुम्ही केलेलं सहकार्य अत्यन्त महत्वपूर्ण असेल. घर खरेदीसारख्या विषयात तुम्ही ठोस निर्णयापर्यंत पोहोचाल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल.
स्त्रीयांसाठी : नवीन उत्साह निर्माण होईल.

कन्या : तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढत असतानाच तुमच्या नावाची दहशत देखील निर्माण होण्यासारखी स्थिती आज दर्शवत अशे. कायदेशीर बाबीचा अभ्यास करूनच त्यादिशेने पावलं उचला. विवाह इच्छूकांसाठी आजचा दिवस मनोमिलन घडवून आणणारा आहे. दोन पक्षमधील समेट घडवून आणण्यासाठी तुम्ही केलेली मध्यस्थी यशस्वी ठरेल.
स्त्रीयांसाठी : जीवनसाथीची उत्तम साथ लाभेल.

तूळ : तुमचे पारिवारिक स्नेह संबंध सुधारत असतानाच स्रियांनी केलेली मध्यस्थी फाटाफुटीकडे घेऊन जाण्याची शक्यता आहे. तुमच्याशी भावनिक नटे वाढवून त्याचा गैरफायदा देखील घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणतेही जोखिमेचे कामात सहभाग घेताना त्याविषयीची सर्वांगाने शहानिशा करणे अत्यावश्यक आहे. कौटुंबिक विषयात वाद वाढण्याची शक्यता आहे.
स्त्रीयांसाठी : कोणत्याही परिस्थितीत कर्ज किंवा उसनवारी वाढू नये याची काळजी घ्यायलाच हवी.

वृश्चिक : तुम्ही आज उचललेलं पाऊल क्रांतिकारक ठरू शकेल. तुमच्या शब्दाच्या प्रभावाने अनेक अभ्यासू किंवा वरिष्ठ लोक देखील अवाक होण्याची शक्यता आहे. तुमची कारकीर्द अधिक वादातीत ठरण्याची शक्यता आहे. सौजन्याने वागण्याचा प्रयत्न फसण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. दिलेल्या शब्दाला जगल्यास त्यातून अनेक प्रकारचे फायदे वाढू शकतील.
स्त्रीयांसाठी: कौटुंबिक विषयाला धरून न्यायाल्याची पायरी चढावी लागण्याची शक्यता आहे.

धनु :
पूर्वीच्या निष्काळजीपणामुळे आज तुम्हाला मनस्ताप भोगावा लागू शकतो. आर्थिक चणचण मोठया प्रमाणात भासेल. मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला आराम मिळवून देईल. नवी भागीदारी आशाजनक असेल. सावधानतेने वाहन चालवले पाहिजे अथवा दुर्घटना होऊ शकते. कठीण परिस्थितीत तुमचा जोडीदार साथ देईलच या भरवशावर राहू नका.
स्त्रीयांसाठी : अकारण स्वतःला गुंतवून घेऊ नका.

मकर:
कल्पनाविलास दुःखाच्या गर्तेत घेऊन जाऊ शकेल.  त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंदवार्ता मिळेल. प्रेमाचा आनंद घेता येईल.
स्त्रीयांसाठी : कामास अपेक्षित गती मिळेल.

कुंभ:
आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास वाढवेल. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. मुले ही अमर्यादित आनंदाचे स्रोत असतात. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी राहील. ब-याच काळापासून ते वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल.
स्त्रीयांसाठी : शब्द प्रहाराने विरोधी धार बोथट कराल.

मीन :
अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे उत्साहाचे वातावरण तयार होईल. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. चांगले आर्थिक जीवन सुधारण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.
इतरांसाठी वेळ द्यावा लागेल.
स्त्रीयांसाठी : आर्थिक उन्नती साधाल.

हे ही वाचा:

तर धनुष्यबाण कायमच गोठू शकतं, शिवसेनेच्या वादावर उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रिया

रितेश-जिनीलिया अनोख्या पद्धतीनं मानणार प्रेक्षकांचे आभार, ‘वेड तुझे’ गाण्याचं नवं व्हर्जन येणार भेटीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss