राशी भविष्य, २ फेब्रुवारी २०२३, आज तुमच्या जीवनातील मोठ्या निर्णयाचा..

राशी भविष्य,  २ फेब्रुवारी २०२३, आज तुमच्या जीवनातील मोठ्या निर्णयाचा..

मेष  : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन त्यांच्या सकारात्मक परिणामांचा अनुभव  घ्या. जीवनातील अडचणीच्या वेळी बचत केला पैसा तुमच्या कामी येईल म्हणून, आज पासूनच आपल्या पैश्याची बचत करण्याचा विचार करा.  दैवी उपासनेने आत्मिक बळ वाढेल. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या.

वृषभ  : त्रयस्थ व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल.  कौटुंबिक जीवनात काही समस्या उदभवू शकतात. कौटुंबिक जबाबदा-यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कुटुंबाच्या रागाला आमंत्रण देण्यासारखे आहे. भावनिक होऊन अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आपले मन द्विधा मनस्थितीत राहील.

मिथुन  : आज तुमचा वेळ सत्कारणी लागल्याने तसेच दैवी अनुभूतीने मन प्रसन्न होईल. तुम्हास आज तुमच्या जवळची व्यक्ती महत्वपूर्ण सल्ला देऊ शकेल. त्याने दिलेला हा सल्ला जीवनाचा कायापालट करणारा असेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. घर शेती यांच्या वाटण्याचा विषय चर्चेला येऊ शकेल.

कर्क : नावीन्य पूर्ण विषय हाताळण्याबाबत रुची वाढेल. आज विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याबद्दल विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

सिंह  : तुमच्यासाठी मनाप्रमाणे स्थळ येईल .  जवळच्या व्यक्तीच्या मध्यस्थीमुळे मनस्ताप वाढू शकेल. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला उच्च पातळीवर नेण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबाच्या बाबतीत सर्व काही सुरळित असेल,

कन्या   : आज मिळालेले शिक्षण जीवनाची दशा आणि दिशा बदलविणारे असेल. आज तुमच्या जीवनातील मोठ्या निर्णयाचा दिवस आहे. तुम्ही करीत असलेली स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल.

तुला : नवं तेजाने उजळून निघण्याचा दिवस आहे. सामाजिक प्रतिष्ठानांशी जोडून अनेक विधायक कामांना गती द्याल. तुमच्या वाणीचा प्रभाव आणि उपजत कलागुणांना समाज मान्यता मिळेल. कोणत्याही कामाबाबत दुराग्रह किंवा हट्ट करू नका. ऊर्जा क्षेत्रात प्रगती कराल. राजकारणी मंडळींना अत्यन्त दिलासादायक बातम्या ऐकायला मिळतील.

वृश्चिक : कुटुंबातील मंडळींचा उत्तम सहयोग  लाभेल. आजचा दिवस खरेदीसाठी उत्तम आहे. पगार वाढ -पदोन्नती यासारखे मनाला समाधान देणाऱ्या घटना घडतील. राजकीय क्षेत्रात निर्माण होणाऱ्या समस्यांना सहजपणे सामोरे जाल. जीवनाला कलाटणी देणारा आजचा दिवस असणार आहे. त्यामुळे घडणारी प्रत्येक घटना सकारात्मकतेने घ्या.

धनु : परिवारासोबत सहलीचा आनंद लुटू शकाल. नवीन हितसंबंध जुळून येतील. तुमच्या कलागुणांना सामाजिक अधिष्ठान लाभेल. आपले कर्तव्य बजावण्यात उणिवा ठेवू नका. विशेषकरून संरक्षण क्षेत्रात आपण कार्यरत असाल तर ठोस भूमिका आणि कठोर निर्णय घ्यावे लागतील. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनू शकाल.

मकर : आजचा दिवस धनलाभाचा आहे. कीर्द लेखन व्यवस्थित ठेवा. कदाचित आर्थिक व्यवहारात गफलत होण्याची शक्यता आहे. सावकारी उधारी वाढु नये याविषयी काळजी घावी. नेत्रविकार असल्यास आज आपणांस वैद्यकीय उपचाराची गरज भासू शकते. प्रवास टाळणे हिताचे ठरेल. कलाक्षेत्रामध्ये नवा कीर्तिमान स्थापित करू शकाल.

कुंभ : दिवाळीचा सण अगदी आनंदात पार पाडू शकाल. तुमच्या प्रत्येक निर्णयास सादप्रतिसाद देणाऱ्या मंडळींचा सहवास लाभेल. विशेष म्हणजे पतिपत्नी मधील स्नेह द्विगुणित होईल. वरिष्ठांकडून तुमच्यावर स्तुतीसुमने उधळली जातील. दैवी कृपाप्रसादाचा लाभ झाल्याचा मनोमन आनंद होईल. सात्विक भाव जागृत होईल.

मीन : तुम्ही स्वीकारलेल्या व्यसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न आणि कौटुंबिक जीवनातील जरुरी या बाजू पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत हि बाब तुम्हास आज अग्निपरीक्षेचे दिव्य परीक्षा द्यायला भाग पडेल. अनुभवी किंवा तज्ज्ञ लोकांचा सहवास लाभेल. अश्या स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या.

Exit mobile version