spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य , ३ फेब्रुवारी २०२३, वृषभ राशींच्या व्यक्तींचं आर्थिक नुकसान…

कौटुंबिक सुख मिळू शकेल. आरोग्य विषयक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.  मागणी प्रमाणे उधारी किंवा कर्जाची रक्कम उपलब्ध होऊ शकेल.  

ज्यो. श्री. रविंद्र भगवान पाठक, गुरुजी, ठाणे

मेष : कौटुंबिक सुख मिळू शकेल. आरोग्य विषयक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.  मागणी प्रमाणे उधारी किंवा कर्जाची रक्कम उपलब्ध होऊ शकेल.  कोणत्याही कामाचा निर्णय घेताना सावधानता बाळगावी.  कामाला होत असलेल्या विलंबाने मनस्थिती विचलीत होऊ शकते. दुसऱ्याला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये.  वैवाहिक विषयावर सकारात्मक चर्चा घडण्याची शक्यता आहे.  भागीदारीत समाधान मानावे लागेल.  

वृषभ : आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता आहे.  पारिवारिक स्नेह जपण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल.  काही प्रमाणात दिलासादायक बातमी ऐकायला मिळून मानसिक ताण कमी होऊ शकेल.  प्राकृतिक कारणाने तणाव बनून राहील. तुमचा भावनिक स्वभाव नुकसान वाढवू शकतो.  कलागुणांना समाजात स्थान निर्माण होईल.  दूर देशात जाण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर थोडे थांबा.  भविष्यातील घटनांचा अचूक अंदाज मांडण्यात यशस्वी व्हाल.  

मिथुन : उपजीविका चालवण्यासाठी आवश्यक तरतूद होऊ शकेल.  पारिवारिक स्नेह जपण्याचा प्रयत्न करा.  आर्थिक बाबतीत कोणतेही पाऊल उचलताना काळजीपूर्वक उचलावे.  बदलत्या वातावरणात समरस होण्याचा प्रयत्न करा, घर बांधणे-खरेदी करणे अथवा जमिनीचे व्यवहार या विषयावर सकारात्मक चर्चा होईल. मानसिक तणाव अथवा रक्तदाब यासारख्या विकारावर उपचार करून घेण्याची आवश्यकता आहे.  संगतीचे दुष्परिणाम भोगावे लागतील. 

कर्क :  व्यवहारात नियोजन करण्याची गरज आहे.  जुने देणे परत करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल.  हित शत्रूंचा सुळसुळाट वाढेल.  अन्न धान्यातून फायदा होईल.  शेती विषयक व्यवहारात नवीन विक्रम स्थापित करू शकाल.  आंदण आलेलं धन टिकून राहण्यासाठी दैवी उपासना वाढवावी.  मानसिक दुर्बलता कमी करण्यासाठी वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे.

सिंह : पूर्वार्जित कामाला येईल. कठोर निर्णय घ्यावे लागतील. व्यावहारिक गणित जुळवताना तारेवरची कसरत करावी लागेल.  घरच्या मंडळींची साथ मिळेल. कलागुणांना संधी मिळेल. सामाजिक संदेश प्रेरणादायी ठरेल. व्यापार उद्योगात गुंतवणूक करताना विचार पूर्वक करा. हृदय रोगाच्या तक्रारी असतील तर त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत. साथीच्या विकारापासून रक्षणासाठी उचित दक्षता घ्यावी. घर खरेदी विक्रीच्या व्यवहारास तूर्तास स्थगिती देणें हितकारक ठरेल.

कन्या : राजकीय क्षेत्रात कार्यरत असाल तर जनप्रक्षोभाचे कारण बनु नये याची काळजी घ्या. सरकार दरबारी नोकरी करीत असाल तर अति तणावात कामकाज सुरु ठेवावे लागेल. सामाजिक न्यायाची अपेक्षा ठेवून भावनिक निर्णय घेतल्यास त्यात फसगत होऊ शकते. थोरामोठ्यांचा सन्मान राखण्याची परंपरा पाळा. शारीरिक कमजोरी निर्माण होण्याची शक्यता आहे. वैज्ञानिक पातळीवर केलेलं संशोधन सिद्ध होऊ शकेल. भविष्यातील घटनांची पूर्वकल्पना मिळू शकेल.

तूळ : तुमचे प्रत्येक पाऊल हे जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारे असेल. समाजमनात आपला नावलौकिक वाढेल. राजकरणात लौकिक वाढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतील. भावंडांकडून तसेच आप्तस्वकीयांकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकेलं. आर्थिक सौख्य लाभेल. स्थानांतर संभवते. नोकरीसाठी प्रयत्नशील असाल तर थोड्या संयमाची आवश्यकता आहे. पित्त प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. सूर्य उपासनेनें यश प्राप्ती होईल.

वृश्चिक  : वयोवृद्ध मंडळींनी आरोग्याची काळजी घ्यावी. काही प्रमाणात विचलित मनस्थितीचा सामना करावा लागेल. खोल पाण्याकडे जाणे टाळावे. सामाजिक असंतोषाला सामोरे जावे लागेल. कर्तव्याची जाणीव ठेवून संयम बाळगावा. शैक्षणिक क्षेत्रातील असंतुलितपणा विचलित करणारा ठरेल. संतती विषयक प्रश्न ऐरणीवर येतील. शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

धनु : स्नेही जणांचे उत्तम सहकार्य मिळेल. विवाह इच्छूकांच्या विवाह विषयक सकारात्मक चर्चा ऐकायला मिळतील. भागीदारीसाठी विचारणा होऊ शकेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. पूर्व वैमस्यांतून निर्माण होणाऱ्या भांडण तंट्याकडे दुर्लक्ष करा. शत्रुभय वाढू शकेल. व्यवसाय उदयॊगासाठी प्रगतिशील लोकांचा सम्बन्ध वाढून प्रगतीकडे वाटचाल सुरु होण्याची स्थिती निर्माण होईल. आळसामुळे धरलेले उद्दिष्ठ गाठण्यास विलम्ब होण्याची शक्यता आहे.

मकर : मनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. व्यावहारिक गणित जुळवताना सहज जुळतील.  मित्र परिवारावर अतिविश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकेल. यशाची पुढची पायरी चढण्यासाठी कोणत्याही निर्णयाबाबत गुप्तता राखणे उपयुक्त ठरेल. तोडून – टाकून बोलणे टाळावे. पोटाचे विकार असल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत. राजकीय प्रतिष्ठा – मानसन्मान वाढेल.

कुंभ : आज हाती घेतलेलं कोणतेही काम पूर्णत्वास जाण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील.  विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्वपूर्ण बदल घडवून आणणारा आहे. स्वास्थ्य अधिक बिघडणार नाही याची काळजी घ्या. कर्जाची परतफेड करण्याची गणित जुळत असतील तरच अधिक उधारी अथवा कर्ज घ्या. जवळच्या नातेवाईकांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. कुठल्यातरी कारणाने आरोप लागण्याची शक्यता आहे. व्यवहारात आपण भरडले जाणार नाहीत याची काळजी घ्या.

मीन : कौटुंबिक वातावरण मनासारखे राहील. गृहउपयोगी गोष्टींसाठी खर्च वाढेल . शिक्षणाला नवी दिशा प्राप्त होईल. मुलाबाळांकडून अपेक्षा वाढतील. शारीरिक असंतुलन दिनचर्या बिघडवू शकेल. जुने येणे वसूल करण्याचा प्रयत्न केल्यास वसुली होऊ शकेल. सामाजिक आरोपातून मुक्तता होईल. चतुराईने मोठमोठे व्यवहार हाताळाल.आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, या म्हणीची आठवण ठेवून कामकाज चालवावे . कोणताही विकार वाढणार नाही याबाबत सतर्क असावे.

Latest Posts

Don't Miss