spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य – 4 September 2022 – कामाच्या गतीमध्ये परिवर्तन दिसून…

मेष :आपल्या अपेक्षित कामाच्या गतीमध्ये परिवर्तन दिसून येऊ लागेल. काही मंडळी दबाव तयार करण्याचा प्रयत्न करतील. समाजामध्ये आपल्याबद्दल आदरभाव निर्माण होईल. पीडितांना न्याय मिळवून द्याल. राजदरबारात सन्मानित केले जाईल. आपण आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून सामाजिक घडी सुस्थितीत आणण्यासाठी केलेले प्रयत्न प्रभावी ठरतील.

वृषभ : मनोव्यथेचा भार काहीसा हलका होईल. तापाचा विकार उद्भवण्याची शक्यता आहे. तुमच्या धार्मिक वृत्तीमुळे अनेक संकटांवर मात करण्याची ऊर्जा प्राप्त होईल. आपल्या हातून सत्कर्म घडेल. राजाश्रय मिळेल. नोकरदारांना वरिष्ठाकडून सन्मानाची वागणूक मिळेल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावी. भाग्योदय होण्यासाठी अनुकूल ग्रहस्थिती आहे.

मिथुन : विवाह इच्छूकांसाठी आनंददायी काळ आहे. नववराला साजेशी वधू तर नववधूला साजेसा वर प्राप्त होऊ शकेल. आरोग्यविषयक तक्रारी चालूच रहातील. मनाला वेदनादायक घटना ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक सण व्रतामध्ये सहभागी व्हाल. विरोधकांच्या कारवाया विचलित करू शकतात.आर्थिक मदत मिळू शकेल.

कर्क :
मामा- मावशी किंवा आजोळचे नातेवाईक सहकार्य करतील .शरीर पीडा मानसिक चलबिचल वाढवणारी ठरेल. कोणाशीही अकारण शत्रुत्व वाढवून घेऊ नका. बदलीचे योग संभवतात. राजकीय क्षेत्रात अधिक जबाबदाऱ्या वाढतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मित्रपरिवाराच्या भेटीगाठी होतील. पाठ-कंबर दुखीचे विकार वाढणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी .

सिंह :
विद्यार्थ्यांसाठी अत्यन्त सकारात्मक वातावरण तयार होईल. नवीन पद्धतीचा अभ्यासक्रम सुलभतेने हाताळाल. संतती विषयक समस्या दूर होतील. काही प्रमाणात पोटाच्या विकाराने मनाला उद्विग्नता येऊ शकते. जलमार्गाने केलेल्या प्रवासातून लाभ होईल. विवाह इच्छूकांसाठी योग्य स्थळ येण्याची शक्यता आहे. घरातील आनंदी वातावरण बनेल. तुमच्याकडून धर्म संस्कृती बद्दल अभिमानास्पद कार्ये घडतील.

कन्या : वाहन खरेदी करताना दूरगामी परिणामांचा विचार जरूर करावा. संततीच्या कर्तृत्वाने आत्मिक समाधान लाभेल. विविधांगी वाचनाची आवड वाढेल . तीर्थयात्रा आदींचे प्रसंगवर्णन उत्तमप्रकारे करू शकाल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन भक्ती वृद्धिंगत होण्यासाठी कीर्तन प्रवचनादी प्रबोधनात्मक अनमोल मार्गदर्शन करू शकाल.

तुला : जमिनीपासून फायदा होईल. स्वकर्तुत्वाने मोठे होण्याचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी करीत असलेले प्रयत्न यश मिळवून देतील. वयोवृद्ध मंडळींनी प्रकृतीची काळजी घेण्याची अत्यन्त आवश्यकता वाटते. शारीरिक विकारावर मात करण्यासाठी भगवान महामृत्युंजयाची साधना करावी.

वृश्चिक :
कितीही जवळची व्यक्ती असली तरी त्यांच्या आर्थिक व्यवहाराची बिलकुल हमी घेऊ नका. पारिवारिक सौख्य उत्तम लाभेल. लहान भावंडांकडून काही आदर्श शिकायला मिळतील. आर्थिक व्यवहारात नियोजन करावे लागेल. संगत गुणाचे दुष्परिणाम अनुभवायला मिळतील. त्यामुळे कोणतेही पाऊल टाकताना काळजीपूर्वक टाका.

धनु : आपले मत आणि निर्णयावर ठाम रहा . मात्र बदलत्या विचार सरणीचा इतर लोक गैर फायदा घेऊ शकतात. आप्तेष्टांचे सहकार्य लाभेल. नेत्र विकारापासून त्रास वाढू शकतो. कामानिमित्त ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचे नियोजन ठरू शकते. साहसी निर्णय घ्याल. कोणत्याही विषयाची खातर जमा केल्याशिवाय व्यक्त होऊ नका.

मकर : न्यायालयीन प्रक्रियेत यश संपादन करू शकाल. कायदेविषयक प्रकरणात आपली बाजू सबळ राहील. कोणत्याही व्यवहारात गुप्तता राखणे हिताचे ठरेल. अन्नधान्याची भरभराट होईल. काम करताना उत्साह वाढेल. भावंडांच्या संगोपनाची जबाबदारी वाढू शकेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.

कुंभ : आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. खर्चाचे प्रमाण वाढेल. आपणावर अकारण होणाऱ्या दोषारोपामुळे मानसिक संतुलन ढळण्याची शक्यता आहे. व्यसनाधीनतेकडे वळत तर नाही ना याबाबत सतर्क रहा. प्राण्यांच्या खरेदी विक्रीत फायदा होईल. शेतीतील उत्पादनाच्या सुरक्षेची काळजी घ्या. पारंपरिक उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करा.

मीन : पदोन्नती – पगारवाढ यासारख्या समाधानकारक गोष्टी घडायला सुरुवात होईल. परदेशातील व्यवहार सुरळीत होतील. कामकाजासाठी प्रवास करावा लागेल. स्वधर्मावर निष्ठा वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक येणाऱ्या जबाबदाऱ्या सहज पेलवू शकाल. काही अप्रिय घटना कानावर येऊ शकतात.
गुडघे दुखीचे विकार त्रासदायक ठरतील.

हे ही वाचा:

पनीर कचोरी आवडते ?तर नक्की करून पाहा

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Latest Posts

Don't Miss