राशी भविष्य, ५ जानेवारी २०२३, सिंह राशीतील व्यक्तींना कामानिमित्ताने…

आजच्या दिवसाची सुरुवात मंगलमय विचारांनी होत आहे. तुमच्याविषयी आदरभाव असणारी मंडळी आज भेटण्यासाठी येण्याची शक्यता आहे. पारंपरिक विषयांना अधिक महत्व दिल्याने संवाद बिघडण्याची शक्यता आहे.

राशी भविष्य, ५ जानेवारी २०२३, सिंह राशीतील व्यक्तींना कामानिमित्ताने…

ज्यो. श्री रविंद्र भगवान पाठक, गुरुजी , ठाणे.

मेष : आजच्या दिवसाची सुरुवात मंगलमय विचारांनी होत आहे. तुमच्याविषयी आदरभाव असणारी मंडळी आज भेटण्यासाठी येण्याची शक्यता आहे. पारंपरिक विषयांना अधिक महत्व दिल्याने संवाद बिघडण्याची शक्यता आहे. धनस्थानातील चंद्र मंगल युती आर्थिक उन्नती बरोबरच पारिवारिक स्नेह संबंध सुधारवण्यास देखील मदतगार ठरेल. जमिनीच्या व्यवहारातून फायदा होईल.
स्त्रीयांसाठी : कुटुंबाला वेळ देताना तारेवरची कसरत करावी लागेल.

वृषभ : तुमची बौद्धिक चलाखी कामाला येईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या क्षेत्रातील अनुभव आज इतरांना सामायिक करताना त्यांच्या अनेक समस्या निवारण होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास टाळणे हिताचे राहील. राजकारणापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा. धार्मिक विधीमध्ये सहभागी होण्याची संधी चालून येईल. परदेश ग्मनसाठी प्रयत्न करीत असाल तर कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
स्त्रीयांसाठी : सलगी होईल.

मिथुन : तुमचे विचार अनुभवाच्या कसोटीत उतरण्यास अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे. कोणतेही आर्थिक व्यवहार हाताळताना केलेली घाई तुम्हाला नुकसानीची ठरू शकते. आरोग्यविषयक तक्रारी दूर होण्यास मदत होईल. विरोधकांना नामोहरण कराल. अनेक अडचणींना सामोरे जात केलेल्या अथक प्रयत्नांना यश प्राप्त होईल. भावनिक होऊन दिलेली प्रतिक्रिया तुम्हास मनस्ताप करायला लावू शकते.
स्रियांसाठी : संतती विषयी सुखद बातमी ऐकायला मिळेल.

कर्क : आज तुम्हास समुद्र किनारा किंवा जलाशयाच्या जवळ पर्यटनाला जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल. जलमार्गाने वाहतूक करणाऱ्या व्यासायिकांना आजचा दिवस अत्यन्त फायद्याचा असेल. मात्र कोणताही मित्र अथवा भागीदार यांच्यावर परस्पर अवलंबून राहून कामे केल्यास त्यात दगाबाजी होण्याची शक्यता आहे. गृहकर्जाची परतफेड करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. वाणीवर नियंत्रण ठेवावे.
स्त्रीयांसाठी : मंगल कार्यासाठी केलेली मध्यस्थीला  सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

सिंह : संतती विषयक समस्यांवर मार्ग सापडेल. वाणिज्य विषयक अभ्यासात प्रगती होईल. कामानिमित्ताने जवळचे प्रवास करावे लागतील. देवावरील विश्वास अधिक दृढ होईल. आपण जर वाहन व्यवसाय करीत असाल तर आजचा दिवस तुम्हाला लाभाचा राहील. घरच्या मंडळींकडून कौतुकाची थाप मिळेल. तसेच आपण केलेली कामगिरी कुतूहलाचा विषय बनेल. तुमच्या अधिकारावर कोणीतरी अकारण दावा ठोकू शकेल. अशा हितशत्रूंपासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
स्त्रीयांसाठी : कुटुंबासाठी वेळ द्याल.

कन्या : तुमच्या भाग्यातील गोष्टी आज तुम्हाला सहजतेनं प्राप्त होतील. धर्म-धार्मिकता याविषयी विशेष रुची तयार होऊन त्यामार्गाने चालण्याचा आत्मिक आनंद देखील उपभोगू शकाल. तुमची कारकीर्द चर्चेत येण्याची शक्यता आहे. पत्नीची भावंडं तुम्हाला अपेक्षित कामकाजात योग्य असे सहकार्य करू शकतील. शेतीमालाचे घाऊक व्यापारी यांच्यासाठी आजचा दिवस फायद्याचा आहे. स्रियांसापासून दूर रहावे.
स्त्रीयांसाठी : सात्विक लोकांचा सहवास लाभेल.

तूळ : तुम्ही अत्यन्त भावनाशील बनल्याने इतर लोक तुमच्या कमजोरीचा गैरफायदा घेऊ शकतात. व्यवहारिक जीवनात अनेकविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. वाहन किंवा ऐश्वर्यसुखासाठी विवंचना सहन करावी लागेल. आपली आर्थिक पत ओळखूनच गुंतवणूक करा किंवा व्यापारात तशी झेप घ्या . जेणेकरून व्यवहारात अधिक गुंतागुंत वाढण्यापासून तुमचा बचाव होऊ शकेल.
स्रियांसाठी : आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक : तुमच्या मनाला दिलासा देणारा घटनाक्रम अनुभवायला मिळेल. सहकारी उत्तमप्रकारे साथ देतील. भागोदारीतील व्यवहार सक्षमपणे राबविले जाऊन त्यातून फायदा देखील होईल. आज तुमच्या मंगलकार्याबाबत देखील चर्चा होईल. त्यातून सकारात्मक संदेश प्रेषित होऊ शकेल. मित्रमैत्रिणींना संवाद-मौज-मस्ती करत जुन्या आठवणींना उजाळा देण्यास सवड मिळेल. संसर्गजन्य विकारापासून स्वतःला धोका होऊ नये म्हणून विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
स्त्रीयांसाठी : मंगलमय वातावरणाचा सुखद अनुभव येईल.

धनु : तुमच्या संकल्पना आणि त्या राबविण्याचे उद्दिष्ट याचा मेळ घालण्यासाठी अधिक परिश्रमाची आवश्यकता आहे. आज तुम्हाला तुमच्यातील मार्गदर्शक तत्वाचा उपयोग करता येईल. आपणांस अनेक प्रकारच्या कामकाजात गुरु तत्त्वापासून अधिक ऊर्जा प्राप्त होईल. नवा उत्साह वाढत जाईल. इतर लोकही तुमच्या कलागुणांची प्रशंसा करतील. काहींसाठी आपले आपले आदर्श गुण प्रत्यक्ष जीवनात अंगिकाराण्याची रुची निर्माण होईल.
स्त्रीयांसाठी : तुमचे जीवन इतरांना प्रेरणादायी बनेल.

मकर : शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत मंडळींना आजचा दिवस विशेष लाभदायक राहील. मात्र तरीही व्यावहारिक जगातील घडामोडींवर लक्ष ठेवूनच आपली वाटचाल करावी. लेखक – पत्रकार-साहित्यिक यांच्यासाठी आजचा दिवस अनमोल ठेवा संकलन करून संग्रही ठेवण्याचा आहे. विशेष करून कृषी विषयावर केलेलं संशोधनात्मक लेखन संबंधितांना अत्यन्त उपयुक्त ठरू शकेल. शास्त्रज्ञ मंडळींना सिद्ध प्रयोगासाठी केलेले प्रयत्न केल्याने सफलतेकडे जाण्याकडे वाटचाल सुरु करण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल.
स्त्रीयांसाठी : आदर्श जीवनपद्धतीने चालण्याचा विचार दृढ होईल.

कुंभ : आपण गृहसौख्यासाठी करीत असलेल्या मेहनतीला यश प्राप्त होईल. घर बदली करणे किंवा स्थानांतरीत करणे प्रक्रिया पूर्णत्वास जातील. तुमच्या प्रचलित उपजीविकेच्या साधनावर काही प्रमाणात खर्च वाढण्याची शक्यता आहे. डागडुजी-दुरुस्ती यासारख्या गोष्टी तुमच्या व्यावसायिक गणिताच्या बाहेर राहिल्याने त्या पूर्णत्वास यासाठी आर्थिक बोजा सहन करावा लागेल.
स्त्रीयांसाठी : तुमच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडाल.

मीन : अनुभव हा खूप मोठा गुरु असतो. तुमचे पराक्रम हा तुमच्या जीवनातील अनुभव गुरूच्या सहाय्याने घडत असल्याने शास्त्राचे- शास्त्रज्ञाचे संशोधन शोधत बसले तरी जिज्ञासूंना त्याचा संदर्भ लागणे कठीण होईल. अशा कारणाने तुमचे कलागुण जाणून घेण्यासाठी अनेकजण तुमच्याशी जोडून राहण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या वाणीतील मांगल्य आणि सौजन्यशीलता इतरांना प्रेरणादायी ठरेल.
स्त्रीयांसाठी : कौटुंबिक पातळीवर होत असलेल्या प्रगतीत तुमचा सिंहाचा वाटा असेल.

Exit mobile version