राशी भविष्य : २१ सप्टेंबर २०२२- तुमचे ध्येय आणि दातृत्व याची सांगड घालण्यासाठी……

राशी भविष्य : २१ सप्टेंबर २०२२- तुमचे ध्येय आणि दातृत्व याची सांगड घालण्यासाठी……

मेष : आपण जर नोकरीसाठी प्रयत्नशील असाल तर आज तुम्हाला आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. मुलाखतीसाठी जाणार असाल तर तिथंही उत्तम प्रतिसाद मिळेल. कौटुंबिक वातावरण आनन्दाचे राहील. सरकारी कामे अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण होतील. राहत्या घरी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आर्थिक विवंचना जाणवत असल्यास कुलदेवीची उपासना करावी.

वृषभ : नोकरीमध्ये होणाऱ्या भाग्योदयास कुणाची तरी नजर लागू शकते. आपल्या कामकाजाबाबत गुप्तता बाळगणे हितकारक राहील. व्यवहारिक हितसंबंध कसे टिकून रहातील याची काळजी घ्या. न्यायालयीन प्रक्रियेत यश प्राप्ती होईल. मोठ्या भावन्डाकडून सहकार्य मिळेल. आपण जर स्पर्धा परीक्षेत भाग घेतला असेल तर तुम्हाला यश प्राप्त होईल.

मिथुन : उपजीविकेसाठी कुणाशी केलेली चर्चा अथवा संवाद ही याचना नसून ती तुमच्यासाठी काळाची गरज आहे असे समजून राहणे जरुरी आहे. आर्थिक व्यवहारात आपण केलेली गुंतवणूक आपणास उपयोगी पडेल. नेत्र विकार असल्यास जरूर काळजी घ्यावी. पारिवारिक स्नेहसंबंध जुळून येतील. उसणवारी करू नका.

कर्क : गेल्या काही काळापासून करीत असलेल्या अथक मेहनतीचे शुभ परिणाम दिसू शकतील. तुमच्यात परोपकाराची भावना जागृत होईल. तुमच्या व्यवसायिक ठिकाणावर आनंद साजरा करावा अशा घटना घडतील. नवीन जमिनीची खरेदीबाबत सुरुवात होईल. तुमच्या वडिलोपार्जित स्थावर इस्टेटीविषयी महत्वपूर्ण निर्णय घडून येतील.

सिंह : आपण जर पूर्वीच कर्ज घेतले असतील तर अशाप्रकारच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आज तारेवरची कसरत करावी लागेल. हितचिंतकांच्या विश्वासावर कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. तुमचा लौकिक वाढत असतानाच इतर विरोधकही वाढत जात आहेत याचेही भान ठेवायलाच हवे. आरोग्य विषयक तक्रारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कन्या : समाजामध्ये तुमचे एक विशिष्ठ स्थान निर्माण होऊन कीर्ती सर्वत्र पसरेल. तुमचे शब्द सामर्थ्य वाढेल त्याच बरोबर अभ्यासाला देखील नवीन दिशा प्राप्त होतील. धार्मिक शिक्षणाबाबत रुची वाढेल. तुमच्या कलागुणांना विकसित करणाऱ्या संधी उपलब्ध होतील. तुमच्यापेक्षा वरिष्ठांची मर्जी राखाल. नोकरदारांना सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल.

तुला : तरुणांनी मिळालेल्या संधीचा जरूर लाभ घ्यावा. आळस झटकून कामाला लागा. तुमच्या कौशल्याने विकसित केलेल्या विज्ञाननिष्ठ संशोधनास सामाजिक अधिष्ठान लाभेल. व्यावसायिकांना उत्सव आणि प्रदर्शनातून आर्थिक उत्पन्नांचा श्रोत वाढवता येईल. संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळणे हिताचे ठरेल.

वृश्चिक : घरामध्ये गृहउपयोगी वस्तूंची खरेदी कराल. तुमचे ध्येय आणि दातृत्व याची सांगड घालण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. पूर्वजांचे शुभाशीर्वाद कामाला येतील. शूभ ग्रहांचे बळ तुम्हाला यशकीर्ती प्रदान करतील. दीर्घकालीन विचार प्रणालीचा तुम्ही आता नाद सोडून सामाजिक – व्यावहारिक स्थितीचे भान ठेवून आपले कार्य करत रहा.

धनु : आजचा दिवस धावपळीत जाण्याची शक्यता आहे. घाई गडबडीत चुकीचे निर्णय देखील होऊ शकतात. वयोवृद्ध मंडळींच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जुने येणे वसूल होण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रयत्न केल्यास त्यात यश मिळू शकेलं. पूर्वजांच्या संतुष्टीसाठी श्रध्द विधीसारखे विधी विधिवत पद्धतीने करणे हितकारक ठरेल.

मकर : तुमच्या मित्र परिवाराकडून अनमोल सहकार्य मिळेल. भागीदारीतील व्यवसायास नवे रंगरूप देण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. आज तुम्हाला सुचलेले विचार भविष्यातील घटनाक्रमासाठी अत्यन्त उपयुक्त तसेच प्रेरणादायी ठरेल. राजकारणात अकारण शत्रुत्व वाढून घेऊ नका. जवळचे नातेवाईक भट्टीत.

कुंभ : तुमच्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी तुम्हाला कायदेशीर बाबींचा उपयोग होईल. थकलेल्या शरीराची तसेच कमजोर मनाची अवस्था सुधारण्यासाठी तुम्हाला दैवी उपासनेची आवश्यकता भासेल. आरोग्य बिषयक समस्या दूर करण्यासाठी अनुभवी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. पीडितांना आश्रय प्राप्त होऊ शकेल .

मीन : आजचा दिवस विद्यार्थी दशेतील गोड अविस्मरणीय घटना आज घडतील. तुमचा कीर्तिमान नोंदवला जाऊ शकतो. अध्यात्मिक उपासना , ज्ञानदानाचे कर्म यासारख्या घटना आहेत त्या फायद्याच्या आहेत. भाग्योदयासाठी आजचा दिवस अत्यन्त उपयुक्त आहे. नोकरी – शिक्षण अशा दोन्ही बाजू सांभाळणं तुमच्या जीवनदशेला न्याय दिल्याखेरीज रहाणार नाहीत.

हे ही वाचा:

के एल राहुलने स्लो – स्ट्राईक रेटवर मौन सोडले म्हणाला,’कोणीही परिपूर्ण नसतं’

Nana Patole : राज्यातील १७५ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपाचा दावा खोटा असलयाचे नाना पटोल्यांचे व्यक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version