spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य – २३ ऑक्टोबर २०२२ – आजचा दिवस मंगलमय वातावरणात…

सर्व वाचक मंडळींना दिवाळी पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा !!! – ज्यो. श्री रवींद्र भगवान पाठक , गुरुजी.

मेष : आजोळच्या लोकांचा सहवास लाभेल. त्यांच्या सहयोगाने दिवाळीतील अडचणी सहज सुलभ होतील. आर्थिक व्यवहारात विचार न करता घेतलेली कोणतीही रक्कम कर्जाचा बोजा बनून राहण्याची शक्यता आहे. सामान्य मनःस्थिती राहील. जुन्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणावाराच्या दिवसात अशाप्रकारच्या विषयापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

वृषभ : आजचा दिवस मंगलमय वातावरणात जाईल. मित्र परिवाराच्या भेटीगाठीत जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. परम्परेच अभिमान बाळगाल. सांस्कृतिक कार्यमात आपल्या मधुर वाणीने प्रेक्षकांची मने जिंकाल. देवदेवतांच्या पूजा – उपासनेने मनाला प्रसन्नता लाभेल. आपण केलेलं आर्जव परमेश्वराच्या कृपाप्रीती संपादनात अनमोल राहील.

मिथुन : घर आणि व्यवसाय यांची सांगड घालताना तारेवरची कसरत करावी लागेल. तुम्ही आज काही ऐतिहासिक घडामोडीचे साक्षीदार बनाल. नोकरदारांना वरिष्ठांकडून उत्तम प्रकारची वागणूक मिळेल. पदोन्नती साठी प्रयत्नशील असाल तर थोड्या संयमाची आवश्यकता आहे, वाहन-गृह सजावटीच्या वस्तू यांची खरेदी कराल.

कर्क : आपण आपल्या भावंडांडोबत आजचा दिवस आनंदाने घालवाल. जुन्या गोष्टींना उजाळा मिळेल. एकमेकांशी घडलेला सुसंवाद कुटुंबाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल. दूरच्या नातेवाईकांच्या देखील भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. कीर्ती दूरवर पसरेल असे कार्य तुमच्या हातून घडून येईल. उच्चाधिकारी म्हणून कार्यरत असाल तर तुमची बदली संभवते.

सिंह : विद्युत क्षेत्रात आपण केलेली कामगिरी कौतुकास पात्र ठरेल.  तुम्हाला तुमच्या कुटुंबातील प्रमुख आधार म्हणून ओळखले जाऊ शकते. आपण आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवूनच सावधगिरीने पावले उचलावीत. खाद्य पदार्थ जिंव्हा तत्सम क्षेत्रात आपण आपले स्थान निर्माण कराल. राजकारणापासून आज दूर रहाणे हिताचे ठरेल.

कन्या: हंगामी व्यवसायात उत्तम अर्थार्जन करून आपण आपली प्रतिमा निर्माण कराल. औषधी क्षेत्र, थंडपेय अशा संबंधी क्षेत्रात कार्यरत असाल तर आजच्या दिवसाची ग्रहस्थिती आपणांस फायद्या करून देत आहे. सिनेमा थियेटर , दुग्धजन्य पदार्थोका अथवा थंडपेय यासारख्या पदार्थाचे व्यापार करत असाल तर त्यातून उत्तम अर्थार्जन कराल.

तुला : कामाची व्याप्ती अधिक वाढल्याने सणाचा आनंद घेण्यास देखील फुरसत मिळणार नाही. फायदा नुकसानीचा विचार न करता आपण अधिकाधिक मेहनत करण्याचा प्रयत्न कराल. आरोग्य विषयक छोट्यामोठ्या तक्रारी येत असल्या तरी औषधोपचाराने लगेच बरे वाटेल. आजोळच्या नातेवाईकांकडून अनमोल सहकार्य मिळेल. त्यांच्या विषयीचा आदरभाव अधिक वृद्धिंगत होईल.

वृश्चिक : थोरामोठ्यांच्या सहवासात आजचा दिवस व्यतीत कराल. त्यांच्याकडून अनमोल सल्ला देखील मिळेल. वाक्युद्ध टाळणे फायद्याचे ठरेल. आपण क्रीडा क्षेत्रामध्ये घेतलेला सहभाग तुम्हास आनंद समाधान देऊन जाईल. पारंपरिक वेषभूशा करण्याकडे आपला कल राहील. पुराणातील विषयावर घडून येणाऱ्या परिसंवादात आपली प्रमुख भूमिका ठरू शकेल.

धनु : कर्तव्यनिष्ठता , कॊणत्याही कामाबाबत असणारा उत्साह हे गुण आपणास आज एक विशिष्ठ दर्जा प्राप्त करून देतील. नवीन नवीन लोकांचे हितसंबंध वृद्धिंगत होतील. धर्मपरायण व्यक्तिमत्वामुळे समाजमध्ये आपल्याबद्दल आदर निर्माण होईल. आज तोतया लोकांपासून सावध रहावे. आपण केलेला पत्रव्यवहार प्रभावी सिद्ध होईल.

मकर : सौजन्याने वागण्याचा प्रयत्न करा. आपण केलेल्या परिश्रमास न्याय मिळण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. अथांग सागरातील एखादा मोती अथवा उपसून घेतलेलं पाणी त्यास काहीच वाटत नाही त्याप्रमाणे जीवन हे अथान्ग सागर समजून एखादा छोटामोठा प्रसंग घडत असला तरी सागराप्रमाणे वृत्ती राखावी. वाहन चालवणे टाळा.

कुंभ : तुमच्यासाठी आजचा दिवस अत्यन्त अनुकूल आहे. कर्म आणि कर्तव्य यांना केंद्रस्थानी ठेवून आजची दिनचर्या आखा. अनेक सकारात्मक गोष्टी घडतील. मात्र आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी संतुलित आहार घेण्याची देखील काळजी घ्यायला हवी. शिल्प विद्या तसेच स्त्री – संतान प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न सफल होतील. तुमच्या नेतृत्व गुणाला सामाजिक मान्यता मिळेल.

मीन : मैत्रीच्या परमोच्च आनंदाचे क्षण तुम्ही अनुभवू शकाल. हास्यरस , शब्दातील माधुर्य, वाणीने होणारी जडणघडण , कलाकौशल्यता अशा अनेकविध गुणांचा प्रत्यय येऊ शकेल. आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपल्याबद्दल इतरांना हेवा वाटेल. काही वेळेला सामाजिक अपेक्षा आपली त्यासाठी असणारी जबाबदारी याचा विचार करता मनावर तसेच मोहावर ताबा ठेवणे ही बाब अनुकूल ठरते याबाबत विशेष काळजी घ्यावी.

हे ही वाचा :

मधुमेहाच्या रुग्णांसाठी घरीच तयार करा शुगर फ्री लाडू…

हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss