राशी भविष्य -१ नोव्हेंबर- बऱ्याच काळापासून अडकून पडलेली कामे…

राशी भविष्य -१ नोव्हेंबर- बऱ्याच काळापासून अडकून पडलेली कामे…

राशी भविष्य

मेष : आज आपणांस संयमाची गरज आहे. कोणत्याही कामी केलेला उतावळेपणा दुःखाच्या खाईत ढकलणारा असेल. मानसिक अस्थिरता तुमच्या उत्कृष्ट कलागुणांना देखील बदनाम करू शकते. खरेदी विक्री आदी व्यवहार पूर्वी होते तसेच रहातील. नोकरदारांना अधिक मेहनतीची आवश्यकता आहे. महिलांनी कौटुंबिक ऐक्य टिकवण्याचा प्रयत्न करावा.

वृषभ : तुमच्या ज्येष्ठतेचा आदर केला जाईल. तुमच्या जीवनकार्याचा गौरव केला जाऊ शकेल. तुमचे मत कित्येकांचे जीवन परिवर्तित करणारे असेल. अध्यात्मिक कथांचे वाचन-मनन-चिंतन केल्याने अनेक समस्यांवर मार्ग सापडेल. सामाजिक न्यायासाठी केलेला लढा अंतिम टप्यापर्यंत नेण्यात यशस्वी व्हाल. दोन समूहाचे ऐक्य घडविण्याचे कार्य आज तुमच्या हातून घडू शकते.

मिथुन : महत्वाची कामे दुपारपर्यंत उरकण्याचा प्रयत्न करा. पारिवारिक स्नेहसंबंध वृद्धिंगत कराल. अर्थार्जनासाठी उत्तम संधी उपलब्ध होतील. शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या अन्न धान्याची निगा राखणे अत्यन्त गरजेचे आहे. नवीन-घर-जमीन वाहन खरेदी याविषयावर सकारात्मक चर्चा होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.

कर्क : आजचा दिवस मानसिक अस्थिरतेचा आहे. कोणाशीही संवाद साधताना कमीतकमी शब्दप्रयोग करा. आज घडलेल्या चुका तुम्हाला पुढील बऱ्याच काळापर्यंत मनस्ताप करायला लावू शकतात. समुद्रात व्यवसायासाठी जाणाऱ्या मंडळींनी सतर्क असणे जरुरी आहे. आपली संगत आपणासच घातक ठरू शकते. सरकारी मदत मिळू शकेल.

सिंह : बऱ्याच काळापासून अडकून पडलेली कामे मार्गी लागतील. वडिलोपार्जित वारसा चालविल्याने आत्मिक समाधान लाभेल. धार्मिक कार्यासाठी अथवा मदत कार्यासाठी खर्च करावा लागेल. संकटातील गरजूना मदत कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषकरून डोकेदुखी सारखे विकार अथवा निद्रानाशाचे विकार असल्यास काळजी घ्यावी .

कन्या : आज आपली लाभाच्या पदावर नियुक्ती केली जाऊ शकते. सामाजिक सन्मान वाढेल. तुमच्या कष्ट मेहनतीला न्याय मिळेल. तुम्ही अंगीकृत केलेला व्यवसाय एका नवीन टप्याकडे झेपावण्यासाठी तयार असेल. व्यावसायिक आर्थिक जबाबदारी यांचे मूल्यमापन करून ते सांभाळण्यासाठी सुयोग्य व्यक्तीची निवड करण्याची गरज भासेल.

तुला : यशाच्या वाटेने चालताना आजचा तुम्हाला मैलाचा टप्पा पार करायचा आहे. तुमची ऊर्जा आणि संकल्प ध्येय पूर्तीसाठी तुम्हाला उत्तेजित करतील. मात्र परावलंबी बनू नका. आपण आपल्या कलागुणांना विकसित करून संकल्पनांना न्याय देण्याचा प्रयत्न करा. नवीन जोडले जाणारे संबंध मांगलिक वातावरणात अधिकची भर टाकतील .

वृश्चिक : आज तुम्हाला सूर्य उपासनेची अत्यन्त आवश्यकता आहे. सामाजिक न्यायासाठी केलेला खटाटोप महत्वपूर्ण टप्यावर येईल. राजकारणात अपेक्षित यश मिळणार नाही. दिवसाचा उत्तरार्ध समस्येवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरेल. पाण्याच्या बदलाने होणारे विकार शारीरिक कमजोरी निर्माण करू शकतात. वयोवृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

धनु : एकमेकांशी समन्वय साधण्यासाठी मांडलेले विचार सकारात्मकता निर्माण करतील. सामाजिक सलोखा राखण्यात महत्वाची कामगिरी बजावाल . देशपरदेशातील हितसंबंध अधिक दृढ होतील. भाग्योदयासाठी पूरक वातावरण तयार होईल त्याला तुमच्या स्कारात्मकतेची जोड आवश्यक आहे. महिलांसाठी आजचा दिवस विशेष प्रेरणादायी असेल.

मकर : आजचे व्यवहार मैत्रीपूर्ण संबंधातून होतील. भागीदारीसाठी विचारणा होऊ शकते. मात्र अशा व्यवहारात विश्वास आवश्यक असतो या गोष्टीची जाणीव असावी. विवाह इच्छूकांना अपेक्षित स्थळ येईल. तुमची विचारशक्ती अधिक क्रियाशील होऊन कामाची गती अधिक वाढू शकेल. आज तुम्ही प्रकट केलेल्या मतातून इतरांना दिलासा मिळून आनंद उत्पन्न होईल.

कुंभ : तुमच्या वैचारिक स्थितीत आमूलाग्र बदल होतील. शाब्दिक वाद टाळावेत. तुमच्या जवळच्या व्य्वक्तीकडून जास्त सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. अपघाताची भीती संभवते. वाहन चालवणे टाळा. तुमच्याकडून घडलेल्या छोट्या चुकाही मनस्ताप वाढविणाऱ्या ठरतील. कोणतेही नवीन विषय तूर्तास न हाताळणे हिताचे ठरेल.

मीन : आज आपण केलेला विचार आणि त्यातून होणारे शुभाशुभ परिणाम यांचा ताळमेळ अचूक असेल. भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अचूक लेखाजोखा मांडू शकाल. व्यावसायिक वृद्धीसाठी तुम्ही केलेले प्रयत्न सफल होतील. भागभांडवल (शेअर) बाजारात केलेली गुंतवणूक फायद्यात राहील. प्राकृतिक कारणाने थोडीशी अस्थिरता निर्माण होऊ शकेल.

हे ही वाचा :

हाडांना मजबूत करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचा समावेश

हिवाळ्यात ‘लवंग’ चहाचे सेवन करा, होतील “हे” फायदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version