राशी भविष्य २१ जानेवारी २०२३ आपण हाती घेतलेलं कोणतेही काम पूर्णत्वास..

राशी भविष्य २१ जानेवारी २०२३ आपण हाती घेतलेलं कोणतेही काम पूर्णत्वास..

मेष :
आपण हाती घेतलेलं कोणतेही काम पूर्णत्वास जाण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील.  विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्वपूर्ण बदल घडवून आणणारा आहे. स्वास्थ्य अधिक बिघडणार नाही याची काळजी घ्या. कर्जाची परतफेड करण्याची गणित जुळत असतील तरच अधिक उधारी अथवा कर्ज घ्या. जवळच्या नातेवाईकांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. कुठल्यातरी कारणाने आरोप लागण्याची शक्यता आहे.
स्त्रीयांसाठी : तुमचे पाऊल तुम्हाला प्रगतीच्या दिशेने जाण्यास मदतगार ठरेल.

वृषभ :
कौटुंबिक वातावरण मनासारखे राहील. गृहउपयोगी गोष्टींसाठी खर्च वाढेल. शिक्षणाला नवी दिशा प्राप्त होईल. मुलाबाळांकडून अपेक्षा वाढतील. शारीरिक असंतुलन दिनचर्या बिघडवू शकेल. जुने येणे वसूल करण्याचा प्रयत्न केल्यास वसुली होऊ शकेल. सामाजिक आरोपातून मुक्तता होईल. चतुराईने मोठमोठे व्यवहार हाताळाल . आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, या म्हणीची आठवण ठेवून कामकाज चालवावे.
स्त्रीयांसाठी : तुमच्या मेहनतीला अभ्यासाची जोड आवश्यकता भासेल.

मिथुन :
आरोग्य विषयक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.  मागणी प्रमाणे उधारी किंवा कर्जाची रक्कम उपलब्ध होऊ शकेल.  कोणत्याही कामी निर्णय घेताना सावधानता बाळगावी.  कामाला होत असलेल्या विलंबाने मनस्थिती विचलीत होऊ शकते.  दुसऱ्याला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. व्यसनाधीनता वाढण्याची शक्यता आहे.
स्त्रीयांसाठी : आरोग्याची काळजी घ्यावी.

कर्क :
व्यवहारात नियोजन करण्याची गरज आहे. जुने देणे परत करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल.  हितशत्रूंचा सुळसुळाट वाढेल. अन्नधान्यातून फायदा होईल. शेती विषयक व्यवहारात नवीन विक्रम स्थापित करू शकाल. मानसिक दुर्बलता कमी करण्यासाठी वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे.
स्त्रीयांसाठी : आपण उद्योजिका म्हणून प्रसिद्धी पावाल.

सिंह :
वयोवृद्ध मंडळींनी आरोग्याची काळजी घ्यावी. काही प्रमाणात विचलित मनस्थितीचा सामना करावा लागेल. खोल पाण्याकडे जाणे टाळावे. सामाजिक असंतोषाला सामोरे जावे लागेल. कर्तव्याची जाणीव ठेवून संयम बाळगावा. शैक्षणिक क्षेत्रातील असंतुलितपणा विचलित करणारा ठरेल. संतती विषयक प्रश्न ऐरणीवर येतील.
स्त्रीयांसाठी : मानसिक संतुलन सांभाळा.

कन्या :
स्नेहीजनांचे उत्तम सहकार्य मिळेल. विवाह इच्छूकांना विवाह विषयक सकारात्मक चर्चा ऐकायला मिळतील . भागीदारीसाठी विचारणा होऊ शकेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. पूर्व वैमस्यांतून निर्माण होणाऱ्या भांडणतंट्याकडे दुर्लक्ष करा. शत्रुभय वाढू शकेल. व्यवसाय उदयॊगासाठी प्रगतिशील लोकांचा सम्बन्ध वाढून प्रगतीकडे वाटचाल सुरु होण्याची स्थिती निर्माण होईल.
स्त्रीयांसाठी : दूरचे नातेवाईक भेटायला येतील.

तुला :
मनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. व्यावहारिक गणित जुळवताना सहज जुळतील.  मित्र परिवारावर अतिविश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकेल. आपण घेत असलेल्या कोणत्याही निर्णयाबाबत गुप्तता राखणे यशाच्या पुढच्या पायरीवर घेऊन जाण्यास मदतगार ठरेल. तोडून – टाकून बोलणे टाळावे. पोटाचे विकार असल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत.
स्त्रीयांसाठी : मैत्रिणीच्या सहयोगाने आज कार्यगती सुरु ठेवाल.

वृश्चिक : आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता आहे.  पारिवारिक स्नेह जपण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल.  काही प्रमाणात दिलासादायक बातमी ऐकायला मिळून मानसिक ताण कमी होऊ शकेल.  प्राकृतिक कारणाने तणाव बनून राहील. तुमचे भाऊक होणे नुकसानीच सौदा ठरू शकेल. कलागुणांना समाजात स्थान निर्माण होईल.  दूर देशात जाण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर थोडे थांबा.
स्त्रीयांसाठी : आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडाल .

धनु : उपजीविका चालवण्यासा आवश्यक तरतूद होऊ शकेल.  पारिवारिक स्नेह जपण्याचा प्रयत्न करा.  आर्थिक व्यवहाराबाबतीत कोणतेही पाऊल उचलताना काळजीपूर्वक उचलावे. बदलत्या वातावरणात समरस होण्याचा प्रयत्न करा. घर बांधणे-खरेदी करणे अथवा जमिनीचे व्यवहार या विषयावर सकारात्मक चर्चा होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मानसिक तणाव अथवा रक्तदाब यासारख्या विकारावर उपचार करून घेण्याची आवश्यकता आहे.
स्त्रीयांसाठी : परिवारासाठी वेळ द्यावा लागेल.

मकर  :
आपण पूर्वी केलेली बचत कामाला येईल. कठोर निर्णय घ्यावे लागतील. व्यावहारिक गणित जुळवताना तारेवरची कसरत करावी लागेल.  घरच्या मंडळींची साथ मिळेल. कलागुणांना संधी मिळेल. आपण आपल्या कृतीतून दिलेला सामाजिक संदेश प्रेरणादायी ठरेल. व्यापार उद्योगात  गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. हृदय रोगाच्या तक्रारी असतील तर त्वरित वैद्यकीय उपचार  घ्यावेत. साथीच्या विकारापासून रक्षणासाठी उचित दक्षता घ्यावी.
स्त्रीयांसाठी : दुसऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घ्याल.

कुंभ  :
राजकीय क्षेत्रात कार्यरत असाल तर जनप्रक्षोभाचे कारण बनणार नाहीत याची काळजी घ्या. सरकार दरबारी नोकरी करीत असाल तर अति तणावात कामकाज सुरु ठेवावे लागेल. सामाजिक न्यायाची अपेक्षा ठेवून भावनिक निर्णय घेतल्यास त्यात फसगत होऊ शकते. थोरामोठ्यांचा सन्मान राखण्याची परंपरा पाळा. शारीरिक कमजोरी निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्त्रीयांसाठी : मनाची विचलितता मानसिक संतुलन बिघडवू शकेल.

मीन  :
तुमचे प्रत्येक पाऊल हे जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारे असेल. समाजमनात स्वतःचा नावलौकिक वाढेल. राजकरणात लौकिक वाढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतील. भावंडांकडून तसेच आप्तस्वकीयांकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकेलं. आर्थिक सौख्य लाभेल. नोकरीसाठी प्रयत्नशील असाल तर थोड्या संयमाची आवश्यकता आहे.
स्त्रीयांसाठी : भावनिक नाती जोपासल्याने मानसिक आनंद प्राप्त होईल.

हे ही वाचा:

Union Budget 2023, ‘या’ अर्थमंत्र्यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प केले सादर, घ्या जाणून

अनिल पराबांमुळेच शिवसेना फुटली, रामदास कदमांचा हल्लाबोल

पुढची सुनावणी ३० जानेवारीला 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version