राशी भविष्य – 26 DECEMBER 2022, सातत्याने सकारात्मक विचार…

राशी भविष्य – 26 DECEMBER 2022, सातत्याने सकारात्मक विचार…

मेष : तुम्हाला दीर्घकालीन  प्रवासाची योजना फायदेशीर ठरेल. फिरते व्यापारी अथवा एजंट अशा व्यावसायिक मंडळींना आजचा दिवस फायद्याचा राहील. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. सासरवाडीकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे. नित्याच्या धावपळीतुन आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमच्या कर्तृत्वाला न्याय मिळेल. स्त्रियांसाठी : घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. विद्यार्थ्यांसाठी : अभ्यासात अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.

वृषभ : सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती उत्तम फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. जर तुम्ही विद्यार्थी आहेत आणि परदेशात जाऊन शिक्षण इच्छा आहे तर तुम्हाला तुमच्या संकल्प पूर्तीचा आनंद प्राप्त होईल. घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असेल. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस राहील. स्त्रियांसाठी : कुटुंबात आदराचे स्थान प्राप्त होईल. विद्यार्थ्यांसाठी : अनेक रहस्य उलगण्यात यशस्वी व्हाल.

मिथुन : घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे आनंददायी वातावरण तयार होईल. कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बेदरकारपणे वाहन चालवणे धोक्याचे ठरेल. वैवाहिक जीवनात कोणीतरी मिठाचा खडा टाकू शकतो. त्यामुळे आपण आपल्या लोकांबद्दलचा विश्वास टिकवून ठेवणे हिताचे ठरेल. आरोग्यविषयक काळजी घ्यावी. स्रियांसाठी : तुमच्या कठोर बोलण्याने तुम्ही आजवर जपलेली नाती दुखावली जातील. विद्यार्थ्यांसाठी :अभ्यासाचा अधिक टॅन जाणवेल.

कर्क : सर्वाशी सौजन्याने वागण्याची मनोवृत्ती तयार होईल. आज घडलेला गुरुशिष्य संवाद जीवन पथावर उपयुक्त ठरेल. शैक्षणिक क्षेत्रात अनमोल योगदान द्याल. यज्ञयाग अथवा धार्मिक कर्माच्या बाबतीत होणाऱ्या चर्चेमध्ये सहभागी व्हाल. संतती विषयक असणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी केलेली उपाय योजना लागू पडेल. प्रवासाचे बेत आखले जातील. स्रियांसाठी : पारिवारिक स्नेह वाढेल . विद्यार्थ्यांसाठी : चांगल्या मित्रांशी मैत्री होईल.

सिंह : तुमच्या उद्योग व्यवसायाला नवीन दिशा देण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल.आईच्या प्रकृतीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कौटुंबिक विषयामुळे थोड्याप्रमाणात मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. औद्योगिकरण विषयात आमूलाग्र बदल करण्यात यशस्वी व्हाल. रोग प्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता आहे. स्रियांसाठी : स्त्रीविकार वाढू शकतात. विद्यार्थ्यांसाठी :पारंपरिक शिक्षणाकडे कल राहील.

कन्या : आपणांस आज दैवी उपासना करण्याची आवश्यकता आहे. विशेष करून हनुमान चालीसा पठण केल्याने मानसिक दुर्बलता कमी होण्यास मदत मिळेल. कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करताना विश्वासार्हता पडताळूनच मगच निर्णय घ्यावा. परदेश गमनासाठी प्रयत्नशील असाल तर समोरून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. स्रियांसाठी : मनाचा सल्ला मोलाचा ठरेल. विद्यार्थ्यांसाठी : अभ्यासात प्रगती दिसून येईल.

तुला : आज आपण मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग धर्मकार्यात खर्च कराल. तुमच्या वाणीतून इतरांना आनंद होईल अशा वाक्प्रचाराचा उपयोग केला जाईल. चेहऱ्यावर प्रसन्न भाव उमटतील. आपणास मिळालेल्या पारिवारिक संस्काराचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात अनुभवता येईल. आपण आज चतुष्पाद प्राण्याविषयी अत्यन्त भावुक व्हाल. स्रियांसाठी : कुटुंबातील व्यवस्थापन राखण्यात अधिक कष्ट सहन करावे लागतील. विद्यार्थ्यांसाठी : अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक : आज आपणांस विविध आणि चवदार अन्नपदार्थ खाण्याविषयी रुची वाढेल. शेतकऱ्यांसाठी आज समाधानाचा दिवस आहे. आपणांस आपले पद टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तुम्ही आज घेतलेल्या निर्णयात काही त्रुटी राहू शकतात त्यामुळे कोणत्याही विषयाची शहानिशा केल्याशिवाय निर्णयाप्रत पोहोचू नये. स्रियांसाठी : तुमच्या कर्तबगारीमुळे कुटुंबात कुतूहल निर्माण होईल. विद्यार्थ्यांसाठी :स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात प्रगती कराल.

धनु : आजचा दिवस थोडा ओढाताणीचा आहे. आर्थिक व्यवहारात जुळवाजुळव करताना थोडी तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. कर्जाऊ रक्कम न घेणे हिताचे ठरेल. दूरच्या नातेवाईकांकडून अप्रिय बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात अनबणी होऊ शकते. आपल्या बोलण्याने कोणी दुःखी होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. स्रियांसाठी : पारिवारिक स्नेहसंबंध अधिक घट्ट होतील. विद्यार्थ्यांसाठी :अनावश्यक किंवा तात्पुरत्या गरज भागविण्यासाठी अवास्तव खर्च टाळा.

मकर : आज आपण इतरांच्या तुलनात्मक अधिक उत्तम कामगिरी करू शकाल. जनसामान्यात तुमच्याबद्दल आदरभावना निर्माण होईल.  अनेकजण शर्यतीत असताना देखील आपण सहजतेने यश पदरात पाडून घेण्यात यशस्वी व्हाल. धोरणात्मक महत्वाची कामे आजच निश्चित करा जेणेकरून योग्य वेळी ठोस  निर्णय घेण्यास मदतगार ठरेल. स्रियांसाठी : मनाला आनंद मिळेल असे वातावरण निर्माण होईल. विद्यार्थ्यांसाठी : योग्य मार्गदर्शन लाभेल.

कुंभ : कर्ज मागणी केली असेल तर ती मागणी पूर्ण होईल. आज मिळालेला संदेश हा संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी असेल. दिवसाची सुरवात जरी थोडी थकणारी राहील . आजचा दिवस हा वैवाहिक जीवनातील वेगळा दिवस असेल.  तुम्हाला आज काहीतरी विचित्र वेगळा अनुभव अनुभवायला मिळेल. आज तुम्ही स्वप्नांच्या दुनियेत रमाल .  स्रियांसाठी :माहेरचे नातेवाईक भेटायला येतील. विद्यार्थ्यांसाठी :गूढ विद्येचा अभ्यास करण्यात स्वारस्य निर्माण होईल.

मीन : आज आपणास निद्रानाशाने शारीरिक कमजोरी जाणवेल. मौल्यवान वस्तूची चोरी होण्याची शक्यता आहे. समूह भोजनाचा आनंद लुटाल . अनेक लोक  तुमचे कौतुक करतील. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसाचा उत्तरार्ध तणावपूर्ण जाईल. तरुण मुली आणि प्रतिष्ठित महिलांचा सन्मान केला जाईल. स्रियांसाठी : भौतिक सुखाचा लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी : स्पर्धा परीक्षेबाबत सकारात्मकता वाढेल.

हे ही वाचा : 

Magh Chaturthi 2023 जाणून घ्या, नवीन वर्षात काेणत्या तारखेला असणार माघ चतुर्थी?

जर तुम्हालाही Natural makeup ने वाढवायचे असेल तुमचे सौंदर्य तर फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version