राशी भविष्य,३० जानेवारी २०२३, जुने व्यवहार सुरळीत होण्यासाठी…

राशी भविष्य,३० जानेवारी २०२३, जुने व्यवहार सुरळीत होण्यासाठी…

मेष :
शेतकऱ्यांनी शेतात काम करताना सरपटणाऱ्या प्राण्यांपासून सावध रहावे. बदलत्या वातावरणाचा परिणाम किंवा साथीचे रोग यापासून आपले आरोग्य सांभाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमच्या मुखातून कोणीतरी अशा विषय वदवून घेईल की त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकाल. मोठा निर्णय घेण्यासाठी थोडे थांबणे हितकारक ठरेल.

वृषभ :
जुने व्यवहार सुरळीत होण्यासाठी आजचा दिवस अत्यन्त महत्वाचा आहे. तुम्ही करीत असलेल्या मेहनतीला यश मिळेल. व्यवसाय उद्योगातून उत्तम आर्थिक लाभ होतील. शेअर बाजार किंवा तत्सम क्षेत्रात प्रगतीची घोडदौड सुरूच राहील. गृह सजावटीसाठीच्या वस्तूंची खरेदी करणे, वाहन खरेदीचा निर्णय घेऊन भौतिक सुखाचा लाभ घेऊ शकाल.

मिथुन :
तुम्हाला आज कौटुंबिक सौख्य लाभेल. मनासारख्या घटना घडल्याने आनंदी राहाल. अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. नवीन व्यवहार सुरु करणे, भागीदारासोबत तडजोडीबाबत चर्चा करणे अशा व्यवहारासाठी आजचा दिवस महत्वपूर्ण ठरेल. एका व्यवसायाला दुसरा जोड व्यवसाय सुरु करणे भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.

कर्क :
भावनेच्या आधीन जाऊन हातून चुकीची कामे होऊ देऊ नका. बहुधा आज आपणाला प्रलोभन देखील दाखवली जातील मात्र या व्यवहारातून आपली बदनामी होणे किंवा कायदेशीर जाचात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवा, भविष्याची दिशा चुकवणारा आजचा दिवस आहे.

सिंह :
आपण आपले कर्तृत्व म्हणून एकएक जबाबदारी वाढवून घेत आले आहात . मात्र आजचा दिवस शारीरिक दुर्बलता जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच कामाचा ताण देखील जाणवेल. आपण आपली स्वतःची काळजी घ्या तुम्हाला आराम करण्याची अत्यन्त गरज आहे. कितीही तणाव वाढला तरी मन स्थिर ठेवा.

कन्या :
उत्तमप्रकारे आर्थिक नियोजन झाल्याने प्रगती पथावर वाटचाल कराल. व्यावसायिक भागीदारीत यश मिळेल. आजचा दिवस मित्र परिवारासोबत आनंदाने व्यतीत कराल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तुमच्या मनपसन्त मौल्यवान खरेदी करू शकाल. अनेक दिवसापासून मनात घर करून बसलेल्या गोष्टींचा आज सहज उलगडा होईल.

तुला :
तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा यांचा समन्वय साधला जाईल असा उत्तम कालावधी आहे. भविष्यातील होणाऱ्या शुभाशुभ घटनांच्या सूचक घटना घडतील. सामाजिक अनुकूलता वाढेल. थोरामोठ्यांचा सल्ला उपयोगी पडेल. दूरदेशातील नातेवाईक भेटणे तसेच अचानक घरी पाहुणे येणे अशा घटनाक्रमाने आजचे दिनचक्र व्यस्त राहील.

वृश्चिक :
विद्यार्थ्यांना स्पर्धा- परीक्षेत यश मिळेल. तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल. आर्थिक सौख्य लाभेल. मनासारख्या अनेक घटना घडल्याने प्रसन्न वाटेल. अचानक प्रवास घडतील. कला क्षेत्राशी निगडित आपले कार्यक्षेत्र असेल तर जनमानसात तुमच्या भेटीबद्दल कुतूहल निर्माण होईल.

धनु :
आपला आत्मविश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे. ज्याविषयाचा तुमच्या जीवनाशी सुतराम संबंध नाही अशा गोष्टींचे अकारण भय जाणवेल. ध्यानधारणा – उपासना केल्याने न मिळालेले त्वरित प्राप्त होण्यासाठी मदतगार ठरेल.  वाहन चालविणे टाळा आणि आरोग्य सांभाळा.

मकर :
गेली काही दिवस ज्या विवंचनेत आहात ती संपून आता तुमच्यासाठी  उत्तम दिवस येत आहेत . व्यवसाय उद्योगात प्रगती होईल. कल्पनेपेक्षा अधिक आर्थिक लाभ होतील. ग्राहक आणि मृत्यू कधीही विचारून येत नाही त्यामुळे जीवनात आलेली वेळ दवडू नका.

कुंभ :
घाई घाई कोणताही निर्णय घेऊ नका. किंवा तत्सम कामात आपण सह्भागीदेखील होऊ नका. आज कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यासाठी अनुकूल कालावधी नाही. तुमची फगत होऊ शकते म्हणून कोणत्याही कामी बिलकुल  घाई करू नका.  बोलताना संयम ठेवा.

मीन :
भावनिक होऊन दिलेला शब्द अथवा आश्वासन कायमची डोकेदुखी बनू शकते. व्यसनाच्या आधिन जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. महत्वाच्या चर्चाना तरी साक्षीदार असावा ही बाब ध्यानात ठेऊन सावधानता बाळगा . कायदेशीर बाबतीत योग्य सल्ला घ्या. मनाच्या उधळणाऱ्या वारूळ वेळीच आवर घाला.

हे ही वाचा:

अशा सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार करा मेयोनीज

तुम्ही पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर करत आहात ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version