राशी भविष्य,२५ जानेवारी २०२३, शेअर बाजार , लॉटरी यासारख्या क्षेत्रातून उत्पन्न वाढेल

राशी भविष्य,२५ जानेवारी २०२३, शेअर बाजार , लॉटरी यासारख्या क्षेत्रातून उत्पन्न वाढेल

मेष : आज मंगल कार्यासाठी खर्च करावा लागेल. तीर्थ क्षेत्राची वारी घडून येईल . धार्मिकता अधिक वृद्धिंगत होईल. पत्रकार वकील किंवा तत्सम लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्वपूर्ण आहे. आपली कोर्ट दरबारी सुरु असलेली लढाई अंतिम चरणात येईल. वारसा हक्कातील वाद संपुष्ठात येण्यासाठी मध्यस्थांकडून केलेला प्रयत्न तुम्हाला फायद्याचा ठरेल.
स्त्रीयांसाठी : महत्वपूर्ण व्यवहारात तुमचा सहभाग अनमोल ठरू शकतो.

वृषभ : तुमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत सौख्याचा आहे. आज तुम्ही नवा कीर्तिमान स्थापित करू शकाल. जमिनीच्या खरेदीचे व्यवहार होऊ शकतील. कौटुंबिक जीवनात थोडीशी अस्वस्थता जाणवेल, आपण स्वीकारलेल्या उद्योग व्यवसायास उच्च पातळीवर नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नास यश मिळेल. पुढील शैक्षणिक ध्येय धोरणाविषयी विशेष आकर्षण निर्माण होईल.
स्त्रीयांसाठी : उत्कृष्ठ कलाकौशल्याचे सादरीकरण करू शकाल.

मिथुन : आपल्याविषयी समाजात आदर निर्माण होईल . घरच्या मंडळींकडून दिलेल्या धोरणात्मक कार्यक्रमास समर्थपणे चालना द्याल, परदेशगमनासाठी प्रयत्नशील असाल तर आज त्यासंबंधीचे व्यवहार प्रगतीपथावर रहातील. बालपणीच्या मित्रांच्या भेटीगाठी जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या ठरतील. आपण सौभाग्यशाली असल्याची प्रचिती येईल.
स्त्रीयांसाठी : घर-कुटुंब यांच्या सॊबत आनंद साजरा कराल.

कर्क : आज आपणांस अचानक अस्वस्थ वाटू शकते. तुमचे विरोधक तुम्हाला नामोहरण करण्याची एकही संधी सोडणार नाहीत. आपण जर एखाद्या कंपनीत महत्वाच्या पदावर कार्यरत असाल तर तेथील सुरक्षाविषयक काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. वादविवादातून स्फोटक वातावरण देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. जुन्या रखडलेल्या विषयाला अधिक महत्व निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.
स्त्रीयांसाठी : भक्तीमय वातावरणाचा सुखद अनुभव येईल.

सिंह : आजचा दिवस काहीसा आनंदाचा तर काहीसा खटास निर्माण करणारा असा असेल. व्यवहारात थोडाफार कडवट भाषेचा देखील वापर करावा लागू शकतो. आजचा दिवस अत्यन्त लाभदायक आहे. पारिवारिक स्नेहसंबंध अधिक घट्ट बनतील. कर्जाची परतफेड करण्यासाठी आवश्यक तेवढी आवक होईल . प्रयत्न केल्यास जुने येणे वसूल होण्याची शक्यता आहे.
स्त्रीयांसाठी : आपल्या उणीवा दिसणार नाहीत याची काळजी घ्या.

कन्या : मंगलकार्य ठरण्यासाठी आजचा दिवस अत्यन्त अनुकूल आहे. तुमच्या वाणीला गोडवा निर्माण होईल. आजचा सुचलेला विचार तुमच्या जीवनासाठी अत्यन्त महत्वाचा बदल घडवून आणणारा ठरेल. तुमचा मित्रपरिवार मदतगार ठरू शकेल . आल्हाददायक वातावरणाचा सुखद अनुभव घ्याल. भागीदारीतील व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
स्त्रीयांसाठी : तुमच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतील.

तुला :तुमचे विचार सर्वानाच पटावे असा दुराग्रह नसावा. अकारण अनावश्यक विषयात रस दाखविल्याने तुमचे मन आणि शरीर थकवा अनुभवतील. तुम्ही मांडलेल्या विचारास विरोध होण्याची शक्यता आहे, कर्जाची मागणी केली असल्यास ती सकारात्मक दृष्टीने एका महत्वपूर्ण टप्प्यापर्यंत मजल गाठू शकेल. कुणावरही अति विसंबून राहू नका.
स्त्रीयांसाठी : खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

वृश्चिक : विज्ञानवादी लोकांसाठी आज अनमोल संधी प्राप्त होतील. जीवनात तुम्ही आज एका महत्वपूर्ण टप्याला ओलांडून पुढे जाणार आहात. शिक्षण क्षेत्रातील मंडळींसाठी आत्मिक समाधान लाभण्याचा आजचा दिवस आहे. गणितातील सिद्धांत मांडताना त्यात अचूकता असेल. तुमच्या लेखणीतून लोकोपयोगी लेखन होऊ शकेल. एखाद्या संस्थेवर तुम्हाला सदस्यपदी नियुक्त केले जाऊ शकते.
स्त्रीयांसाठी : दानधर्म केल्याने मनाला आनंद प्राप्त होईल.

धनु : आज तुम्ही जनसामान्यांना न्याय देण्यासाठी उत्स्फूर्त लढा द्याल. कृतज्ञता भाव जागृत ठेवूनच आपले आचरण राहील याची काळजी घ्यावी. आपण आपली बाजू सख्तपणे मांडाल. जनसामान्याचा विश्वास अधिक वृद्धिंगत होईल. तुमची कर्तव्ये – जबाबदाऱ्या समर्थपणे पेलवाल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण बनून राहील. न्यायालयीन क्षेत्रात महत्वपूर्ण निर्णय होईल.
स्त्रीयांसाठी: धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल.

मकर : आज तुम्ही यशस्वी मध्यस्थी कराल. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. वाचासिद्धीचा देखील अनुभव येईल. इतरांना समजून घेण्यासाठी सहजता प्राप्त होईल. सामाजिक जीवनात आदर्श रहावा असे वर्तन आपणाकडून घडेल. दूरगामी परिणामाचा विचार करून घेतलेले निर्णय हे भविष्यासाठी अत्यंत दिलासादायक रहातील.
स्त्रीयांसाठी : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल.

कुंभ : वैचारिक दिवाळखोरी वाढू नये अथवा आपल्या प्रतिमेला हानी पोहोचू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. नेत्र विकारांनी त्रस्त व्हाल. आर्थिक उत्पन्न वाढीसाठी व्यवहारातील तुमचा दृष्टीकोन तुम्हाला फायदा मिळवून देईल. चांगल्या मित्रांचा सहवास लाभेल. तुमचे साथीदार तुम्हाला उत्तमप्रकारे साथ देतील. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील.
स्त्रीयांसाठी : पारिवारिक स्नेहवर्धन होईल.

मीन : रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी आजचा दिवस समाधानकारक राहील. काही प्रमाणात शारीरिक थकवा जाणवू शकेल. शेअर बाजार , लॉटरी यासारख्या क्षेत्रातून उत्पन्न वाढेल. व्यावहारिक जीवनात होणाऱ्या आर्थिक गळतीस थांबवण्यात्त यश मिळेल. तुमच्या विचाराशी जुळून घेण्याऱ्या लोकांच्या सहवासात तुम्ही आजचा दिवस व्यतीत कराल.
स्त्रीयांसाठी : मैत्रिणींच्या सहवासाने आनंद मिळेल.

हे ही वाचा:

Maghi Ganesh Jayanti 2023 माघी गणेश जयंतीला बाप्पाला दाखवा पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा तिळाच्या मोदकांचा नैवैद्य

Maghi Ganesh Jayanti 2023, माघी गणेश जयंतीसाठी उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version