आजचे राशिभविष्य,०६ ऑक्टोबर २०२३,आरोग्य एकदम चोख असेल.

आरोग्य एकदम चोख असेल.

आजचे राशिभविष्य,०६ ऑक्टोबर २०२३,आरोग्य एकदम चोख असेल.

माझी रास

मेष राशी .
आरोग्य एकदम चोख असेल. धनची आवश्यकता कधी ही पडू शकते म्हणून, आज जितके शक्य असेल आपल्या पैश्याची बचत करण्याचा विचार करा. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल.

वृषभ राशी .
अतिखाणे टाळा, तुमच्या वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. अनपेक्षितपणे गोड बातमी समजल्याने तुमचा उत्साह वाढेल.

मिथुन राशी .
तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे.

कर्क राशी .
विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मधेमधे थोडा आराम करा. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात.

सिंह राशी .
अंगदुखीची दाट शक्यता आहे. शारिरीक ताण घेऊन काम करणे टाळा. कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा.

कन्या राशी .
देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे.

तुळ राशी .
आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. आजच्या दिवशी आपल्या कुंटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे ही तुमची प्राथमिकता असेल.

वृश्चिक राशी .
तुम्ही आहार व्यवस्थित घ्या विशेषत: अर्धशीशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते.

धनु राशी .
आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा अपेक्षा उद्ध्वस्त करुन टाकतात.

मकर राशी .
भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावूकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी .
तुमच्या भांडखोर वागणुकीमुळे तुमचे शत्रू वाढतील. तुम्ही रागावाल असे वर्तन कुणी केले तरी तुम्ही तुम्ही रागावू नका. कारण कदाचित त्याचा तुम्हाला नजिकच्या भव्यिात पश्चात्ताप करावा लागेल.

मीन राशी .
निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील.

Exit mobile version