spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आजचे राशिभविष्य, ०७ जुन २०२३, आरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या

आजच्या दिवशी आपल्या पराक्रमाने,मेहनतीने मनात असलेल्या सर्व इच्छांची पूर्तता कराल.

माझी रास

मेष
आजच्या दिवशी आपल्या पराक्रमाने,मेहनतीने मनात असलेल्या सर्व इच्छांची पूर्तता कराल. आज आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.आज कुटुंबियांचे उत्तम सहकार्य लाभेल.

वृषभ
आजचा आपला दिवस कर्म प्रधान असेल. आज संपूर्ण दिवस कामात व्यस्त असाल.आपले कसब पणाला लावून आज आपले काम पूर्ण कराल.वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

मिथुन
आजचा दिवस आपल्यासाठी भाग्यप्राप्ती, यशप्राप्तीचा असेल. आज काही दूरचे प्रवास संभवतात. मात्र प्रवासात काळजी घ्यावी लागेल.काही अनोळखी व्यक्तींच्या गाठीभेटी संभवतात.

कर्क
आज काही समस्या,संकटे,अडचणी यांचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक भीती, चिंता सतावतील. कोणावरही विश्वास ठेवू नये.वाहने जरा जपून चालवावीत.

सिंह
आज वैवाहिक जोडीदारासह अमूल्य वेळ व्यतीत कराल. मात्र जोडीदाराशी काही मतभेद व गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. जोडीदाराच्या आरोग्याचीही काळजी घ्या.

कन्या
आज शारीरिक, मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. नोकरदार मंडळी प्रामाणिकपणे आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. काहीसा तणाव जाणवेल.

तुळ
आजचा संपूर्ण दिवस उत्साहाचा, आनंदाचा असेल. आज स्वतःच्या आवडीनिवडी जपाल. संततीसोबत आज अमूल्य वेळ व्यतीत कराल.आजच्या दिवसाचा सदुपयोग कराल.

वृश्चिक
आज घरातच वेळ व्यतीत कराल. ज्येष्ठांची सेवा कराल. घरातील सदस्यांसमवेत जास्तीत जास्त वेळ आनंदात घालवाल.ज्येष्ठांची सेवा कराल.

धनु
आज काही धाडसी निर्णय घ्याल. आजची आपली मानसिकता पराक्रमातून आनंद प्राप्त करण्याची असेल.आज कुटुंबासमवेत बाहेर फिरायला जाण्याचे योग संभवतात.

मकर
आज कौटुंबिक सौख्याचा आस्वाद घ्याल.पाहुण्यांची रेलचेल संभवते. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. आज कुटुंबीयांवर काही खर्च संभवतात.

कुंभ
आजचा आपला दिवस अतिशय सुंदर व महत्त्वाचा असेल. आज आपली बुद्धिमत्ता व वाक्चातुर्याने. योग्य कर्तृत्व गाजवून नावलौकिक मिळवाल.

मीन
आज काहीसा मनस्तापकारक दिवस असेल. आज काही अनपेक्षित खर्च उद्भवतील. कोणाशीही वाद-विवाद, कटकटी सारखे प्रसंग उद्भवणार नाहीत, याची काळजी घ्या.

माऊली ज्योतिष कार्यालय
पं. केतन पाठक गुरुजी
९८९२४१३८६०

Latest Posts

Don't Miss