spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वयात येणाऱ्या मुलींनी नेमकी कोणती ब्रा परिधान करावी? जाणून घ्या थोडक्यात माहिती…

आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या ब्रा पाहायला मिळतात. पण असा प्रश्न पडतो की, १० ते ११ वयोगटातील मुलींनी कोणती ब्रा घालावी? तिच्यासाठी कोणती ब्रा योग्य आहे? मुलींनी नेमकी कोणत्या वर्षी ब्रा घालावी? या व अशा काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहिती नसतात.

प्रत्येक मुलगी जेव्हा तारुण्यात पदार्पण करते तेव्हा तिच्या आईचे तिच्याकडे बारकाईने लक्ष असते. तेव्हा आईच्या मनात आपल्या मुलीच्या शरीरात होणाऱ्या बदलांबाबत काही प्रश्न निर्माण होत असतात. त्यापैंकी एक प्रश्न म्हणजे मुलीला योग्य ब्रेसिअरबद्दल माहिती देणे होय. ब्रेसिअर हे एक स्त्रियांचे महत्वाचे वस्त्र आहे. हे वस्त्र स्त्रियांना नेहमी परिधान करावे लागते. ज्यामुळे स्त्रियांचे स्तन आकारात येतात.

आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या ब्रा पाहायला मिळतात. पण असा प्रश्न पडतो की, १० ते ११ वयोगटातील मुलींनी कोणती ब्रा घालावी? तिच्यासाठी कोणती ब्रा योग्य आहे? मुलींनी नेमकी कोणत्या वर्षी ब्रा घालावी? या व अशा काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहिती नसतात. आज आपण अशाच काही प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. काही तज्ञांच्या मते, जेव्हा मुलींची वाढ होते तेव्हा ब्रेस्टच्या टिशूमध्ये असलेली कॅप्सूल ब्रेक होते आणि ब्रेस्ट वाढायला सुरुवात होते. अशावेळी छातीत थोडा जडपणा येऊन छाती दुखायला लागते. हळूहळू जेव्हा दुखण्याची प्रोसेस कमी होते तेव्हा ब्रेस्टचा आकार वाढतो. अशावेळी मुलींना आपण क्रॉप टॉप ब्रा परिधान करायला देऊ शकता. त्याचे मटेरियल होजिअरी असल्यामुळे मुलींना ते आरामदायक असते. ब्रा खरेदी करण्यापूर्वी कापड नेहमी तपासून पहा. कापड हे नेहमी सिंथेटिक नसून कॉटन किंवा होजिअरी मटेरिअलच्या ब्रा खरेदी करा. ब्रेसिअरचे कापड हे नेहमी मऊ असावे. जोपर्यंत ब्रा ची पूर्णपणे वाढ होत नाही तोवर त्यांना क्रॉप टॉप परिधान करायला देणे कधीही योग्य.

जेव्हा मुली या पहिल्यांदा ब्रा घालतात तेव्हा काही गोष्टी या नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. मुलींनीच नाही तर महिलांनीदेखील ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, बाहेर जाताना नेहमी ब्रेसिअर घाला. नेहमी झोपण्यापूर्वी ब्रेसिअर काढून ठेवावी. कारण ब्रेस्ट ब्रीदिंगला सोपं पडत. शिवाय ब्रेस्टला सतत ब्रेसिअरद्वारे आवळून धरल्यामुळे दुखू शकतं. जर आपल्याला घरी ब्रा घालण्याचा कंटाळा आला असेल तर आपण स्पोर्ट्स ब्रा चा देखील पर्याय घेऊ शकता. शिवाय ज्या स्तनपान करणाऱ्या महिला आहेत त्यांनी फिडींग करणाऱ्या पहिल्या दिवसापासूनच फिडींग ब्रा घालणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामुळे ब्रेस्टच्या समस्या टाळू शकतात.

हे ही वाचा:

Sanskruti Balgude चा बहारदार लुक, त्या फुलराणीची होतेय सोशल मीडियावर चर्चा

तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss