spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजीतले जास्तीचे तेल काढण्याच्या ३ सोप्या टीप्स

भाजी किंवा आमटीला फोडणी देताना आपण सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घालतो. परंतु काही वेळा आपला अंदाज चुकतो आणि तेल चुकून जास्त पडते.

भाजी किंवा आमटीला फोडणी देताना आपण सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घालतो. परंतु काही वेळा आपला अंदाज चुकतो आणि तेल चुकून जास्त पडते. काही वेळा वाटण आणि मसाले घातल्यावर आणखी तेल सुटते. मग आपण भाजी करतो. पण नंतर त्यावर तेलाचा तवंग येतो. भाजीवर तेल आले की आपल्याला तेलकट भाजी खायला आवडत नाही. इतके तेल पोटात जाणे हे आरोग्यासाठीही चांगले नसते. अनेकदा अशी तेलकट भाजी घशाशी आल्यासारखे होते, छातीत जळजळते, तेलामुळे तुमचे कोलेस्टेरॉल वाढते आणि वजन वाढते ते वेगळेच. त्यामुळे भाजीला चुकून तेल जास्त पडले तर ते काढून टाकण्यासाठी नेमके काय करायचे याच्या काही सोप्या ट्रिक्स आपण जाणुन घेऊया.

भाजी ही फ्रिज मध्ये ठेवा
भाजीमध्ये चुकून तेल जास्त झालं तर ती भाजी फ्रिजमध्ये ठेवायची. यामुळे तेल भाजीच्या वरती जमा होते. फॅटस असल्याने त्या भाजीला थंडावा लागला की ती आपोआप घट्टसर होते. तेल पातळ असेल तर ते ग्रेव्हीपासून वेगळे करणे हे अवघड जाते. पण फ्रिजमध्ये ठेवल्यावर ते घट्ट होत असल्याने चमचा किंवा डावाने ते काढून टाकणे ही शक्य होते.

बर्फाच्या खाड्याचा वापर करा
भाजीच्या किंवा आमटीमधले जास्तीचे तेल काढून टाकण्यासाठी आपण बर्फाच्या खड्यांचाही वापर करु शकतो. यासाठी हे तुकडे तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकावेत. यामुळे नकळत तेलाचे फॅटस या खड्यावर चिकटले जातील. मग हे बर्फाचे खडे बाहेर काढले की आपोआप फॅटस म्हणजेच तेल हे बाहेर निघून यायला मदत होईल.

ब्रेड
ब्रेडमध्ये एखादी द्रव गोष्ट ही शोषून घेण्याचा एक गुणधर्म असतो. म्हणूनच आपण मटार उसळ, मिसळ किंवा आमटी यांच्यासोबत ब्रेड खातो. ब्रेडचा स्लाईस भाजीवर टाकला आणि तो बाहेर काढला तर वर आलेले तेल हे टिश्यू पेपरप्रमाणे त्यामध्ये शोषले जाण्यास मदत होते. यासाठी तुम्ही ब्रेडला रोस्ट करा, त्यानंतर ब्रेड भाजीवर अलगद ठेवा आणि एक किंवा दोन मिनिटे ते तसेच राहू द्या; नंतर तो काढून टाका. अशा प्रकारे ब्रेड हा जास्तीचे तेल शोषून घेईल आणि भाजीमध्ये कमी तेल दिसेल.

हे ही वाचा:

जाणून घ्या एक चमचा बेसनाचा फॉर्मुला | Lifestyle | Beauty Tips | Know The Formula Of One Spoon Besan

Ganeshotsav 2023, गॅस ही न पेटवता करा झटपट इंस्टंस्ट Kaju Katali Modak

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss