spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चमचाभर धणे ठरणार आरोग्यासाठी गुणकारी,अनेक समस्यांपासून होईल सुटका

छातीत जळजळ होणे म्हणजेच ऍसिडिटी सारख्या पचन समस्या होतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण नैसर्गिक उपाय शोधत असतात. त्यातील एक उपाय म्हणजे धणे, ज्याला आपण कोथिंबीर असेही म्हणतो, हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

आजकाल धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. सकाळी लवकर उठून ऑफिसला जाणे ते रात्री उशीरा घरी परत येणे त्यामुळे रोजच्या जीवनशैलीवर त्याचा वाईट परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे छातीत जळजळ होणे म्हणजेच ऍसिडिटी सारख्या पचन समस्या होतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण नैसर्गिक उपाय शोधत असतात. त्यातील एक उपाय म्हणजे धणे, ज्याला आपण कोथिंबीर असेही म्हणतो, हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. छातीत होणारी जळजळ किंवा कोणत्याही प्रकारचे अपचन होत असेल तर एक चमचा धने पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी पिल्यास त्याचा आरोग्याला खूप फायदा होऊ शकतो. धण्याच्या बियांचा वापर मसाला म्हणून तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. त्याचे काही महत्त्वाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

  • पचनशक्ती सुधारते- धण्याचे बी पोटाच्या समस्या, अपचन, गॅस आणि आम्लपित्ताच्या उपचारासाठी उपयुक्त आहे. धणे पाण्यात उकळवून घेतल्यास पचनक्रिया सुधारते.
  • रक्तशुद्धीकरण- धणे रक्तशुद्धीकरणासाठी उत्तम मानले जाते. धण्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील विषारी पदार्थांचे उच्चाटन करतात आणि रक्त शुद्ध करतात.
  • कफ आणि सर्दीवर उपाय- धण्याचे काढा किंवा चहा घेतल्याने सर्दी, कफ आणि खोकल्याच्या तक्रारींमध्ये आराम मिळतो.
  • डायबिटीज नियंत्रित करते- धणे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना याचा नियमित वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
  • चमकदार त्वचा- धण्याच्या बी मध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार बनते. यामुळे त्वचेवरील दाणे, मुरुम आणि पिंपल्स कमी होतात.
  • मूत्रवर्धक गुणधर्म- धणे मूत्रवर्धक असते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. हे मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त आहे.
  • हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त- धण्यात असलेले कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नियमित धण्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.
  • ताण कमी करते- धण्यामध्ये असलेल्या विशेष गुणधर्मांमुळे मानसिक ताण कमी होतो. यामुळे झोपेत सुधारणा होते आणि मन शांत राहते.
  • धण्याचा नियमित वापर आहारात केल्यास याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
हे ही वाचा:

Kolkata लैंगिक अत्याचार प्रकरणी हावडा ब्रिजवर विद्यार्थ्यांचे ‘नबन्ना आंदोलन’; काहीही झालं तरीही विद्यार्थी आंदोलनावर राहणार ठाम

“पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे.”; Raj Thackeray यांचा मालवण घटनेवर प्रक्षोभ

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss