जेवणानंतर लगेचच करु नका या गोष्टी नाहीतर होतील गंभीर परिणाम

काही जणांना दिवसातून किमान तीन वेळा चहा पिण्याची सवय असते.

जेवणानंतर लगेचच करु नका या गोष्टी नाहीतर होतील गंभीर परिणाम

After lunch or Dinner don't do this thing harmful for your body

आजकाल धावपळीच्या जवनशैलीमुळे आरोग्यावर बरेच परिणाम होत आहेत. त्यात जर जेवणानंतर तुम्ही नकळत काही चुकीच्या गोष्टी केल्यातर त्यांचे भयंकर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्यामुळे जेवणानंतर लगेच काही गोष्टी करणं टाळा. आज आपण पाहणार आहेत उत्तम आरोग्यासाठी जेवणानंतर टाळायच्या गोष्टी.
१) खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ
आपल्याकडे सर्वसाधारणपणे आंघोळ केल्यावर जेवण्याची परंपरा आहे. कारण आयुर्वेदातही आंघोळीनंतर जेवण्याचे महत्त्व सांगितले आहे. आपण अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केली तर त्याचा आपल्या पचनक्रियेवर परिणाम होतो आणि आपल्याला अपचनाचा त्रास होऊ शकतो.
२) जेवल्यानंतर लगेच झोपणे
बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर लगेच झोपतात. हे आरोग्यासाठी योग्य नाही, रात्री जेवल्यानंतर सुमारे 2 ते 3 तासांनीच झोपावे. जर तुम्ही अन्न खाल्ल्याबरोबर झोपी गेलात तर तुमचे अन्न लवकर पचणार नाही. त्याव्यतिरिक्त तुम्हाला लठ्ठपणा व्यतिरिक्त अॅसिडिटी, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
३) रात्रीच्या जेवणानंतर चहा पिणे
काही जणांना दिवसातून किमान तीन वेळा चहा पिण्याची सवय असते. अनेकांना त्याहून ही अधिक. जेवणानंतर चहा प्यायल्याने त्यात असलेले निकोटीन आपल्या शरीरातील प्रथिने शोषून घेते, ज्यामुळे लाल रक्तपेशींची कमतरता होऊ शकते.
tea immidiatly after lunch or dinner
४) पाणी पिणे – 
काहींना जेवताना पाणी प्यायची सवय असते. जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायला हरकत नाही.
Drink-water-while-eating
५) जेवणानंतर निकोटीन –
अनेकांना जेवणानंतर चहा, कॉफी किंवा सिगारेट प्यायला आवडते. ही सवय आरोग्याला हानी पोहोचवते. असे केल्याने शरीरात निकोटीनचे प्रमाण अधिक वाढते आणि सिझल लेव्हलवर परिणाम होतो, त्यामुळे अन्नाच्या पोषणावर शरीरावर परिणाम होत नाही.
६) व्यायाम करणे –
खाल्ल्यानंतर लगेच व्यायाम केल्याने त्याचा आपल्या पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपल्याला उलट्या किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेवणानंतर लगेच व्यायाम करणे टाळावे.
excercise after lunch or dinner
Exit mobile version