मुंबईत Mukesh Ambani यांच्यानंतर ‘या’ उद्योगपतीचं आहे सर्वात महागडं आणि मोठं घर …

भारतात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या (Bollywood celebrities) घर-बंगल्यांचे विषय नेहमीच चर्चेत असतात. भारतात असेही काही उद्योगपती (industrialist) आहेत, ज्यांच्या घराच्या किंमतीत अनेक दिग्गज कलाकारांची घरे खरेदी केली जाऊ शकतात.

मुंबईत Mukesh Ambani यांच्यानंतर ‘या’ उद्योगपतीचं आहे सर्वात महागडं आणि मोठं घर …

भारतात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या (Bollywood celebrities) घर-बंगल्यांचे विषय नेहमीच चर्चेत असतात. भारतात असेही काही उद्योगपती (industrialist) आहेत, ज्यांच्या घराच्या किंमतीत अनेक दिग्गज कलाकारांची घरे खरेदी केली जाऊ शकतात. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अॅंटिलीया (Antilia) घराविषयी सर्वांना महितच असेल. अंबानी यांच्या घराची किंमत जवळपास १२००० कोटी रुपये आहे. पण तुम्हाला माहित आहे का, अंबानी यांच्यानंतर कोणत्या व्यक्तीकडे सर्वात महागडं घर आहे? जर नसेल महित, तर जाणून घेऊयात ती व्यक्ती कोण आहे आणि मुंबईत कोणत्या ठिकाणी त्याचं घर आहे.

देशात जवळपास १६० पेक्षा जास्त कोट्याधीशांची घरे आहे. जगातील सर्वात मोठे सूटिंग फॅब्रिक निर्माता रेमंड (Raymond) ग्रुपचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर गौतम सिंघानिया (Gautam Singhania) एक असं नाव आहे, ज्यांच्याकडे कुणीच दुर्लक्ष करू शकत नाही. भारतात अनेक फॅब्रिक ब्रॅंड (Fabric brands) उपलब्ध असतील, परंतु आजही रेमंडच्या कपड्यांवर लोक जास्त विश्वास ठेवतात. गौतम सिंघानिया ज्या घरात राहतात, त्या घराची किंमत जवळपास ६ हजार कोटी रुपये आहे. त्यांचं लक्झरी रेसिडेन्स १६ हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधण्यात आलं आहे. या घरात ३० फ्लोअर आहेत. याशिवाय त्यांच्या घरात एक स्पा, हॅलिपॅड आणि दोन स्विमिंग पूल आहेत. त्यांच्या घरात एक खासगी म्यूझियमही आहे. यामध्ये जुन्या कपड्यांचं प्रदर्शन लावण्यात आलं आहे. गौतम सिंघानियांच्या घरात असलेले पाच फ्लोअर त्यांच्या कार कलेक्शनसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. ज्यामध्ये लॅम्बॉरर्गिनी गॅलार्डो, एलपी ५७० सुपर लेगेरा, लोटस एलिस कन्वर्टिबल, निसान स्कायलाईन जीटीआर, होंडा एस २०००, फरारी ४५८ इटालिया आणि ऑडी क्यू ७ सह अन्य कारचा समावेश आहे.

९ सप्टेंबर १९६५ ला जन्म झालेल्या गौतम सिंघानिया यांची बिजनेस स्ट्रॅटेजी आणि व्हिजनमुळे आज रेमंड ग्रुपने भारत आणि विदेशात छाप टाकली असून मार्केट मजबूत केलं आहे. कोट्यावधी रुपयांची संपत्ती असलेले मालक गौतम सिंघानिया शाही जीवनशैलीत राहतात आणि मुंबईत ते जे के हाऊस (J. K. House) नावाच्या बिल्डिंगचे मालक आहेत.

हे ही वाचा:

संविधान बदलासंदर्भातील वक्तव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुलासा करावा, नाना पटोले

पुण्यातील ‘या’ रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्पेशल वॉर्ड…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version