spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आज होणार Apple iPhone 14 लॉन्च

Apple चा 'Far Out' लॉन्च इव्हेंट आज म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी रात्री होणार आहे. अँपलचा हा कार्यक्रम आज रात्री १०. ३० वाजता सुरू होईल, जो अँपलच्या यूट्यूब चॅनल आणि वेबसाइटवर पाहू शकाल.

Apple चा ‘Far Out’ लॉन्च इव्हेंट आज म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी रात्री होणार आहे. अँपलचा हा कार्यक्रम आज रात्री १०. ३० वाजता सुरू होईल, जो अँपलच्या यूट्यूब चॅनल आणि वेबसाइटवर पाहू शकाल. अँपलने गेल्या महिन्यातच या कार्यक्रमासाठी मीडिया आमंत्रण पाठवले होते.

Apple iPhone 14 सीरीजचे फीचर्स अनेक महिन्यांपासून लीक होत आहेत. आयफोन १४ आणि आयफोन १४ मॅक्सच्या डिझाइनमध्ये काही बदल दिसत नाहीत, परंतु आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्स नवीन डिझाइनसह ऑफर केले जाऊ शकतात. असे म्हटले जात आहे की iPhone 14 Pro मॉडेलला दोन कटआउट्स मिळतील ज्यामध्ये एक टॅबलेटसारखा असेल आणि दुसरा पंचहोल कटआउट असेल. या नॉचमध्ये कॅमेरा आणि मायक्रोफोनसाठी प्रायव्हसी इंडिकेटर असेल.

Apple च्या या इव्हेंटमध्ये iPhone 14 सीरीज लॉन्च होणार आहे, ज्या अंतर्गत iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max लॉन्च केले जातील. असे म्हटले जात आहे की Apple यावेळी iPhone 14 Mini लॉन्च करणार नाही. या इव्हेंटमध्ये Apple Watch Series 8, Watch Pro आणि AirPods Pro 2 देखील लॉन्च होणार आहेत. iPhone 14 आणि iPhone 14 Pro या दोन्ही फोनमध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले मिळेल, तर iPhone 14 Pro Max आणि iPhone 14 Max 6.7-इंचाच्या टच स्क्रीनसह ऑफर केला जाईल. असे सांगितले जात आहे की आयफोन 14 चे रेग्युलर मॉडेल मागील वर्षीच्या Apple A15 प्रोसेसरसह ऑफर केले जाईल तर iPhone 14 Pro मॉडेल Apple A16 चिपसेटसह ऑफर केले जाईल. 30W वायर चार्जिंग iPhone 14 मालिकेसह मिळू शकते. आयफोन 14 सीरीजमध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा उपलब्ध असेल. याशिवाय नवीन आयफोनमध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी मिळण्याचीही चर्चा आहे.

हे ही वाचा :- 

आज नीट युजी २०२२ चा निकाल होणार जाहीर

अँम्ब्युलन्सला देखील अमित शाहांच्या जाण्याची पहावी लागली वाट; व्हिडिओ मोठ्या प्रमाणत व्हायरल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss