Saturday, September 28, 2024

Latest Posts

महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे आधीच दिसून येतात? कसे ते जाणून घ्या

आजच्या काळात हृदयविकाराचा झटका येणे ही सामान्य बाब झाली आहे . आजकाल तरुणांमध्ये देखील हृदयविकाराची झटके येण्याची लक्षणे दिसून येतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जीवनशैली, शारीरिक हालचालींचा प्रभाव यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयाचा धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होणे आणि रक्त प्रवाह अचानक मध्ये थांबणे. महिल्यांमध्ये हृदयविकाराची लक्षणे असू शकतात . महिलांनी जर लक्षणांची काळजी घेतली तर येणाऱ्या भविष्यात जीवाला होणारा धोका टाळता येऊ शकतो . जाणून घेऊयात महिलांमध्ये हृदयविकाराच्या सुरुवातीला कोणती लक्षणे दिसून येतात .

हे ही वाचा : गर्भपात झालेल्या महिलांसाठी ‘खास’ बातमी

 

मळमळ सारखे होणे हे लक्षण महिल्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याआधी दिसून येतात. हृदयविकाराचे झटके महिल्यांमध्ये भरपूर प्रमाणात दिसून येतात. जबडा, मान, पाठ, हात किंवा खांदे दुखणे हे हृदयविकाराच्या लक्षणांपैकी एक चेतावणीचे लक्षण आहे.

हातांना आणि पायांना मुंग्या येणे . किंवा सूज येणे ही लक्षणे देखील असू शकतात. यामध्ये चुकीच्या अवस्थेत झोपणे किंवा हातांचा चुकीचा वापर करणे. एक किंवा दोन्ही हातांमध्ये अचानक सून जाणवणे हे हृदयविकाराचा झटक्याचे लक्षण असू शकते.

 

तसेच छातीत दुखणे , अस्वस्थता जाणवणे, छातीत दाब निर्माण होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डोकेदुखी किंवा श्वास वर खाली होणे.

खोकला जास्त काळ राहू शकतो.

पॅनीक हल्ला घाबरल्यासारखे वाटू शकते.

हे ही वाचा :

पोटावरील चरबी कमी करायची असेल तर या फळांपासून दूर राहणे

 

Latest Posts

Don't Miss