spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ऑनलाइन वस्तू खरेदी करताना फसवणूक होते?, ग्राहकांनी अशी घ्या काळजी

ऑनलाइन (online) खरेदी करताना ग्राहकांनी घेतली पाहिजे काळजी. आजकाल ऑनलाइन वस्तू खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होत आहे. आणि फसवणुकीचे प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. तसेच कोरोनानंतर ऑनलाइन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी विविध कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर देत आहे. आणि या संधीचा फायदा घेऊन मोबाईलवर लिंक पाठवून ऑनलाइन खरेदीच्या नावावर ग्राहकांची फसवणूक होत आहे.

हे ही वाचा : सणासुदीच्या काळात तंदुरुस्त राहायचे असेल तर प्या हे ‘पेय’

 

ऑनलाइन खरेदीसंदर्भातील माहिती तपासणे आवश्‍यक आहे. खरेदी करण्याचा अगोदर सुरक्षित खरेदी कशी करावी याबाबत थोडी माहिती असली पाहिजे. तुम्ही ज्या कंपनीचे वस्तू खरेदी करत आहात. तर त्या कंपनीची ऑनलाइन खरेदी संदर्भातील माहिती तपासणे गरजेचे आहे. आणि ऑनलाइन खरेदी झाल्यानंतर आर्थिक माहिती भरताना काळजी घेतली पाहिजे. खरेदीच्या अगोदर वेबसाइटवर ग्राहकांची तक्रार नोंदवण्याची सोय उपलब्द आहे की नाही हे आधी चेक करून घेणे. काही वेळा वस्तूंचा फोटो , व्हिडिओ , ऑनलाइन साइटवर अपलोड केला जातो. पण काहीवेळा पत्ता , नंबर न देता केवळ मेसेज स्वरूपात बोलण्यासाठी हा नंबर दिला जातो. त्यानंतर वस्तूच्या किमतीच्या आर्धी किंमत आधी द्यावी आणि त्यानंतर वस्तू हातात आल्यानंतर उरलेली रक्कम द्यावी. असे मेसेजद्वारे सांगितले जाते. पण आर्धी रक्कम भरल्यानंतर दिलेला नंबर ब्लॉक केला जातो अशाप्रकारे देखील तुमची फसवणूक होऊ शकते.

 

ऑनलाइन खरेदी करताना पेमेंटची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर तुम्ही पोर्टलवर एकच पासवर्ड वापरत नाहीना याची काळजी घ्या. तुमचा पासवर्ड जास्त शब्दांचा ठेवा. ऑनलाइन खरेदी साठी तुम्ही डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड , असे आपण वापरतो. पण तुम्ही दर तीन महिन्यानंतर त्याचा पिन बदला पाहिजे. याशिवाय वेगवेगळे यूजर आयडी तुम्ही वापरू शकता. यामुळे डेटा चोरी आणि फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.

खरेदी करण्याचा अगोदर संकेतस्थळ नीट तपासून घेणे. आजकाल ऑनलाइन खरेदीसाठी मोबाईलवर ऑर्डर दिली जाते पाहिजे. आणि मोबाईलवर अनेक लिंक येतात. किंवा अधिक ऑफर असलेल्या लिंक सोशल मिडीयावर अपलोड केल्या जातात. आणि त्यावर माहिती भरणे टाळा. सुरक्षित असलेल्या वेबसाइटवर जाऊनच त्या वस्तूची ऑर्डर दिली पाहिजे. तसेच वस्तू मिळाल्यावर ती उघडताना त्याचे व्हिडिओ काढून घ्यावे. एखाद्या वेळेस हवी ती वस्तू नाही मिळाली किंवा चुकीची वस्तू आल्यास तुम्ही तो व्हिडिओ दाखवू शकता.

हे ही वाचा :

तुम्ही लठ्ठ आहात तर जाणून घ्या आजाराबद्दल माहिती

 

Latest Posts

Don't Miss