तुम्ही चाहप्रेमी आहात का? तर चहासोबत या पदार्थाचे सेवन करू नका

तुम्ही चाहप्रेमी आहात का? तर चहासोबत या पदार्थाचे सेवन करू नका

चहा हा आळस, कंटाळा दूर करण्याचा रामबाण उपाय आहे. आजकाल अनेक चहाप्रेमी पाहायला मिळतात. काही लोकांची सुरुवात तर चहापासून होते. काहीजणांना चहा इतका आवडतो की ते दिवसांतून जास्त प्रमाणात चहा पितात. जास्त प्रमाणात चहाचे सेवन करू नये. सेवन केल्याने आरोग्यावर परिणाम होतात. जसे की गॅस , चयापचय अशा समस्या उद्भवतात. मात्र काही जणांना चहा सोबत काही तरी खाण्याची सवय असते. पण चहासोबत कोणतेही पदार्थ सेवन करू नये. तर आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत जे चहा सोबत सेवन नाही केले पाहिजे.

 

हे ही वाचा : किविचा ज्यूस पिण्याचे फायदे

 

चहासोबत काहीजण बेसनाचे पदार्थ देखील वापरतात. पण चहासोबत बेसनाचे पदार्थ सेवन करू नये. जसे की भाजी , बेसनाचा पोळा , असे पदार्थ सेवन करतात. पण हे पदार्थ सेवन केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात. आणि तसेच पचनक्रिया देखील बिघडते. म्हणून चहा सोबत बेसनाचे पदार्थ वापरू नये.

चहा सोबत चुकून ही थंड पदार्थाचे सेवन करू नका. जर तुम्ही चहा सोबत चुकूनही थंड पदार्थाचे सेवन केले तर तुमची पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकते. कारण एकाच वेळी वेगवेगळ्या तापमानाचे पदार्थ खाल्याने पचनक्रिया बिगडते.

 

चहा सोबत आंबट पदार्थचे सेवन करू नका. चहापिल्यानंतर लिबांचे सेवन करू नये. लिंबातील ऍसिडीचा परिणाम होईल आणि हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

चहा सोबत हिरव्या पालेभाज्याचा समावेश करू करू नका. अनेकांना चहा सोबत भाजी चपाती किंवा सॅलेड खाण्याची सवय असते. पण असे करू नये. जर तुम्हाला हिरव्या पालेभाज्याचा समावेश कराच्या असेल तर चहा मध्ये आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये निधान १ तासाचा तरी फरक असला पाहिजे.

लोहयुक्त पदार्थ चहासोबत खाऊ नयेत. चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट असतात जे लोहयुक्त पदार्थ शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करतात.

चहासोबत सुका मेवा , तृणधान्ये, कडधान्ये, असे पदार्थ देखील खाणे टाळणे.

हे ही वाचा :

रोज ‘या’ पदार्थाचे सेवन करा… बिपीचा त्रास होईल गायब

 

Exit mobile version