लॅक्टोस इंटॉलरंट आहात? मग हे विगन दुधाचे पर्याय तुमच्याचसाठी आहेत.

जगभरातील 65% प्रौढ लैक्टोज असहिष्णुतेमुळे ग्रस्त असल्याने वनस्पती-आधारित दुधाची मागणी वाढली आहे.

लॅक्टोस इंटॉलरंट आहात? मग हे विगन दुधाचे पर्याय तुमच्याचसाठी आहेत.

विगन दुधाचे पर्याय

जरी अनेक संस्कृतींमध्ये वनस्पती-आधारित किंवा विगन दूध ही नवीन संकल्पना नसली तरी गेल्या काही वर्षांत त्याची मागणी गगनाला भिडली आहे. जे लोक स्वतःहून विगन बनत आहेत, ते अनेक कारणांसाठी डेअरी दुधापेक्षा वनस्पती-आधारित दूध निवडतात.मग त्याचे कारण एकतर गायीच्या दुधाची ऍलर्जी किंवा प्राण्यांप्रतीचे प्रेम असू शकते. आजकाल, वाढत्या संशोधनामुळे भरपूर वनस्पती-आधारित दुधाचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. जगभरातील 65% प्रौढ लैक्टोज असहिष्णुतेमुळे ग्रस्त असल्याने वनस्पती-आधारित दुधाची मागणी वाढली आहे. आता आपण अशाच काही विगन दुधाच्या पर्यायांबाबत जाणून घेणार आहोत.

बदामाचे दूध
बदामाचे दूध हा उत्तम विगन दूध पर्याय आहे. हे दूध नैसर्गिकरित्या अँटिऑक्सिडेंट व्हिटॅमिन ई मध्ये समृद्ध आहे, जे त्वचा आणि केस निरोगी ठेवते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते. बदामाच्या दुधात कॅलरीज कमी असतात. जर तुम्ही कॅलरी कॉन्शियस व्यक्ती असाल, तर स्किम्ड डेअरी दुधापेक्षा 40% कमी कॅलरीज असणारे हे बदामाचे दूध तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

ओटसचे दूध
ओटस दूध किंचित गोड आणि पातळ असते. हे दूध फायबरने भरलेले असते, त्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, रिबोफ्लेविन यांसारखे पुरेसे जीवनसत्त्वे असतात जे डोळे आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. एका संशोधयानुसार ओट्सचे सेवन योग्यरीत्या केल्यास गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांवर चांगला परिणाम होऊ शकतो. तसेच ओट दूध शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकते.

सोया दूध
सोया दूध हे सर्वात लोकप्रिय वनस्पती-आधारित दूध आहे, हा एकमेव वनस्पती-आधारित दुधाचा पर्याय आहे ज्यामध्ये प्रथिने पातळी गायीच्या दुधाइतकीच असते. हे गाईच्या दुधाइतके पौष्टिक असते. सोया दुधात कॅल्शियम आणि B12, B2, D, आणि A या सारखे इतर जीवनसत्त्वे असतात. सोया दूध हे व्हॅनिला, चॉकलेट आणि केळी यांसारख्या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्येही येते.

काजूचे दूध
काजूच्या दुधाला खमंग चव असते आणि ते बहुतांशवेळा एखादी डिश बनवण्यासाठी आणि बेकिंगमध्ये वापरले जाते. काजूच्या दुधात असलेले फॅट उच्च कोलेस्टेरॉल असलेल्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. काजूच्या दुधात प्रति कप फक्त 2 ग्रॅम कार्बोहायड्रेट असते.

नारळाचे दूध
नारळाच्या दुधाला त्याच्या गोड वासामुळे ते स्वयंपाकासाठी उत्तम पर्याय ठरले आहे. हे वेगवेगळ्या पाककृतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते – करीपासून भाज्या सूप आणि अगदी आईस्क्रीम, कॉफीपर्यंत विविध पदार्थामध्ये वापरले जाते. तसेच नारळाच्या दुधात चरबीदेखील कमी असते.

हे ही वाचा:

हाऊस द ऑफ ड्रॅगन: भारतात GOT चा प्रिक्वेल कुठे पाहायचा?

Exit mobile version