spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तुम्ही पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर करत आहात ?

पाणी हे आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. तसेच डॉक्टर सुद्धा आपल्याला सल्ला देतात की दिवसातून किमान ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये अनेक लोक हे पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर करतात. कारण याचा संभाळ करणे अत्यंत सोपे असते आणि आणि हलके असते. पण जर तुम्ही असाच विचार करून प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर करत असाल तर सावध व्हा. कारण प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बॉटलचे धोके आणि हानिकारक प्रभावांमध्ये मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम तसेच पर्यावरणाला होणारा हानी यांचा समावेश होतो.

अनेक वेळा आपण कुठे बाहेर फिरायला जात असताना प्लॅस्टिकची बॉटल नेणे पसंत करतो. तसेच अनेक लोक हे डिस्पोजेबल प्लास्टिकच्या बाटलीतून मद्यपान देखील करतात. पण हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. हे कर्करोग होण्यासाठी देखील कारणीभूत ठरू शकेल. त्याच बरोबर प्लॅस्टिकच्या बॉटलच्या वापरण्याचे आणखी काय दुष्परिणाम आहेत हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्लास्टिकचे पाण्यात विघटन : बॅक्टेरिया वाढवण्याबरोबरच बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेशीही प्लास्टिकमुळेच तडजोड होऊ शकते. कारण हा लवचिक पदार्थ कालांतराने विघटित होऊ शकतो.

रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते : प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी साठवून ठेवू नये किंवा ते पाणी पिऊ नये असे सांगितले जाते . कारण प्लॅस्टिकमधील रसायने त्या पाण्यामार्फत आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात.

यकृताचा कर्करोग : प्लास्टिकमध्ये असे एक रसायन असते ज्यामुळे यकृताचा कर्करोग होण्याची देखील शक्यता असते.

स्तनाचा कर्कररोग : सूर्याच्या संपर्कात आल्याने, प्लास्टिकच्या बॉटलमधील घटक रसायने पाण्यात मिसळू शकतात. ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर शक्यतो टाळावा. कारण तुमच्या आरोग्यावर होणार्‍या हानिकारक परिणामांव्यतिरिक्त, प्लास्टिकच्या बॉटल पर्यावरणासाठीही घटक आहेत.म्हणूनच शक्यतो प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर करणे टाळावे.

हे ही वाचा:

राहुल गांधी यांनी लाल चौकात फडकळवला तिरंगा

आपण स्वभावाने लोकशाही समाज आहोत, मन की बातमधून पंतप्रधान मोदींनी साधला संवाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss